IPL auction 2024: दिल्ली कॅपिटल्सने रोहीत शर्माला दिली कॅप्टन पदाची ऑफर; पत्नी रितिकाची कमेंटही चर्चेत..

0

IPL auction 2024: हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मुंबई (Mumbai Indians) संघात परतल्यानंतर अनेक खेळाडूंमध्ये नाराजीचा सुरू उमटल्याचे पाहायला मिळाले. हार्दिक पांड्याला कॅप्टन घोषित केल्यानंतर खेळाडूंनी आपली नाराजी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलून देखील दाखवली. हार्दिक पांड्याला कर्णधार पदाची जबाबदारी रोहित शर्माला (Rohit Sharma) विश्वासात न घेता दिली गेली असल्याचं आता उघड झालं आहे. या निर्णयामुळे स्वतः रोहित शर्माही खुश नसून तो आता मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.

गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक पांड्याला ट्रेड करण्याचा निर्णय झाला. तेव्हा दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्ससोबत रोहित शर्माच्या ट्रेड विषयी बोलणी सुरू केली. मात्र मुंबई इंडियन्सने ही ऑफर फेटाळून लावली होती. आता पुन्हा एकदा या चर्चा रंगल्या आहेत. आयपीएल ट्रेडिंगची तारीख 20 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती आहे.

रोहित शर्मा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी इच्छुक नसल्याची माहिती मिळाली आहे. एवढच नाही, तर रोहितची पत्नी रितिका सजदेह हिने देखील सोशल मीडियावर आपली नाराजी बोलून दाखवली आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कॅप्टन पदावरून हटवल्यानंतर चेन्नई सुपर किंगने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून खूप खूप आदर अशा प्रकारचा एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओखाली कमेंटमध्ये रोहित शर्माच्या पत्नीने हार्ट ईमोजी कमेंट केली.

रोहीतची पत्नी रितिकाच्या या कमेंटला फार महत्त्व आहे. कारण मुंबई इंडियन्सने देखील रोहित शर्माला कॅप्टन पदावर काढून टाकल्यानंतर एक व्हिडिओ पोस्ट करत मानवंदना दिली. मात्र या व्हिडिओ खाली कुठल्याही प्रकारची कमेंट तिने केली नाही. त्यामुळे रोहित शर्मा आणि त्याच्या परिवाराला देखील हा निर्णय पटलेला दिसत नाही.

दिल्ली कॅपिटल संघाने कॅप्टन पदाची ऑफर दिली असती तरी, रोहित शर्मा काय निर्णय घेतो, यावर सगळं काही अवलंबून असणार आहे. रोहित शर्माने मुंबई इंडियन्स मालकांना आपण मुंबईकडून खेळू इच्छित नसल्याचे सांगितल्यास, नाईलाजाने मुंबईला देखील रोहितला सोडावं लागेल.

आयपीएल 2024 चा ऑप्शन 19 डिसेंबरला होणार आहे. याच दिवशी कोणता खेळाडू कोणत्या संघात असणार आहे. हे अधिक स्पष्ट होईल. याच बरोबर रोहित शर्मा मुंबई इंडियन्स बरोबरच राहणार की दिल्ली कॅपिटल्स संघा सोबत आपली नवी इनिंग सुरू करणार हेही स्पष्ट होणार आहे. हार्दिक पांड्याला कर्णधार करून रोहित शर्माचा डीसरिस्पेक्ट केला गेला खरं असलं तरी, रोहित शर्मा आपला अपमान पचवून मुंबई कडूनच खेळणार,की दिल्ली कॅपिटल्स संघात सामील होणार? हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.

हे देखील वाचाMumbai Indians: बुमराह नंतर सूर्यकुमार यादवचाही मुंबई इंडियन्सला दणका; पाहा नेमकं काय घडलं.. 

vijay hazare trophy 2023: 24 चेंडूत 106 धावांची वादळी खेळी साकारत ठोठावले टीम इंडियाचे दार; T20 world Cup मध्ये मिळणार संधी?

Shame On MI : हार्दिक पांद्याच्या षडयंत्रात अडकली मुंबई इंडियन्स, अन् बळी गेला रोहीत शर्माचा..

Hardik Pandya MI captain: मुंबई इंडियन्स नंतर हार्दिक पांड्या भारताच्या T20 संघाचाही कर्णधार; रोहीतच्या वाढल्या या तीन अडचणी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.