Shame On MI : हार्दिक पांद्याच्या षडयंत्रात अडकली मुंबई इंडियन्स, अन् बळी गेला रोहीत शर्माचा..

0

Shame On MI : वन फॅमिली हे ब्रीदवाक्य जोपासणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या एका निर्णयामुळे आता संघात फूट पडली आहे. मुंबई इंडियन्सने (mumbai Indians) रोहित शर्माला (Rohit Sharma) कॅप्टन पदावरून काढण्याचा निर्णय संघातल्या अनेक दिग्गजांच्या आवडला नाही. जसप्रीत बुमराह नंतर सूर्यकुमार यादवने (suryakumar yadav) याविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) आपल्या संघात घेतल्याने आता अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या सगळ्यांमध्ये रोहित शर्माचा देखी बळी गेला आहे.

रोहीत शर्माला कर्णधार पदावरून बाजूला केल्यानंतर, संघातल्या खेळाडूंमध्येच नाराजी आहे. हार्दिक पांड्याला आपल्या संघात घेऊन इतकं वादळ निर्माण होईल, असे मुंबई इंडियन्सला मॅनेजमेंटला वाटलं नसलं तरी याची मोठी ठिणगी पडली आहे. एवढंच नाही तर हार्दिक पांड्याच्या षडयंत्रात मुंबई इंडियन्सचे मालक आणि टीम मॅनेजमेंट अडकले आहे.

मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून घोषित केलं असल्याने, आता रोहित शर्माची t20 कारकीर्द संपुष्टात आली आहे. यापुढे हार्दिक पांड्या हाच भारताचे नेतृत्व करताना दिसेल. 2022 मध्येच हार्दिक पांद्याला मुंबई संघाचे कर्णधारपद हवे होते. मात्र मुंबईने हार्दिक पांड्याची ही मागणी फेटाळली. मुंबईनंतर हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व केले. दोन सीजन कर्णधार पद सांभाळताना, त्याने पहिल्या सीजनमध्ये फायनल जिंकून दिला. तर दुसऱ्या सीजनमध्ये तो गुजरातला फायनल पर्यंत घेऊन गेला.

दुसरीकडे रोहित शर्मा मात्र आयपीएलमध्ये गेले तीन सीजन सातत्याने अपयशी ठरला. फलंदाजी आणि कर्णधार म्हणूनही तो अपयशी ठरल्याने, रोहित शर्मा शिवाय आता मुंबई इंडियन्स संघ आगामी काळासाठी वाटचाल करण्याच्या दृष्टीने पावले टाकू लागला. रोहित शर्मा 2022 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये देखील सपशेल अपयशी ठरला. आणि तेव्हाच हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये संघात परतण्याची आणि कर्णधारपदाची चर्चा सुरू झाली.

एकीकडे रोहित शर्मा कर्णधार आणि फलंदाज म्हणून देखील अपयशी ठरत असल्याने, मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधार पद देण्याचे कबूल केले. हार्दिकचे मुंबई इंडियन्स संघामध्ये परतण्याचे आणखी एक कारण म्हणजे, भारताच्या t20 संघाचे नेतृत्व. जर रोहित शर्मा t20 संघाचे नेतृत्व करत राहिला, तर भारताच्या t20 संघाचे नेतृत्व करण्याचे संधी आपल्याकडून जाऊ शकते. हा विचार करूनच हार्दिक पांड्या मुंबईत परतला. अशी ही चर्चा आता रंगू लागली आहे.

गुजरात संघा पेक्षा मुंबई इंडियन्स हा मोठा ब्रँड आहे. ब्रँड व्हॅल्यू हे एक महत्त्वाचं कारण असलं, तरी मुंबई इंडियन्सचे नेतृत्व आपल्याकडे असावं. जर असं झालं, तर रोहित शर्माला t20 संघाच्या नेतृत्वापासून आपल्याला दूर ठेवता येईल. हा देखील एक विचार हार्दिक पांड्याच्या डोक्यात होता. म्हणूनच तो गुजरात टायटन्स संघाचे कर्णधार पद सोडून मुंबई संघामध्ये परतला. त्याच्या या खेळीत मुंबई इंडियन्स फ्रेंचाईज मालक आणि टीम मॅनेजमेंट देखील अडकली. हार्दिक पांड्या आता आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल.

हे देखील वाचा #ShameOnMI: हार्दिक पांड्याला कॅप्टन करताच मुंबई इंडियन्सला बसला दणका..

Hardik Pandya MI captain: मुंबई इंडियन्स नंतर हार्दिक पांड्या भारताच्या T20 संघाचाही कर्णधार; रोहीतच्या वाढल्या या तीन अडचणी..

Konkan Railway Recruitment 2023: कोकण रेल्वेतमध्ये या उमेदवारांसाठी मोठी भरती; असा करा अर्ज..

vijay hazare trophy 2023: 24 चेंडूत 106 धावांची वादळी खेळी साकारत ठोठावले टीम इंडियाचे दार; T20 world Cup मध्ये मिळणार संधी?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.