#ShameOnMI: हार्दिक पांड्याला कॅप्टन करताच मुंबई इंडियन्सला बसला दणका..

0

#ShameOnMI: आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मुंबई इंडियन्स संघात रोहित शर्मा खेळाडू म्हणून कायम असला, तरी कर्णधार पदावरून हकलपट्टी करण्यात आली आहे. रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढल्यानंतर मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) संघाची धुरा दिली आहे. मात्र या निर्णयाचा फटका आता मुंबई इंडियन्सला बसला आहे.

मुंबई इंडियन संघाच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्याची निवड अनेकांना धक्का देणारी होती. आयपीएलचा (IPL) सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माकडे पाहिले जाते. आतापर्यंत त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन संघाने पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. आयपीएलची सर्वात यशस्वी टीम चेन्नई सुपर किंग संघाची देखील मुंबईने अनेकदा दमछाक केली आहे.

बॅट्समन म्हणून रोहित शर्मा मुंबई कडून खेळताना फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही. मात्र कॅप्टन म्हणून रोहित शर्मा आयपीएलचा सर्वोत्तम कर्णधार बनला. फक्त निकालापुरतेच नाही, तर रोहित शर्माने मुंबई संघात खेळाडूंवर देखील आपली छाप सोडली. रोहित शर्मामुळे मुंबई इंडियन्सचा वेगळा फॅन बेस तयार झाला.

रोहित शर्माचा मोठा चाहता वर्ग आहे. अनेकांची मुंबई इंडियन्स ही फ्रेंचाईज पसंतीची फ्रेंचाईज आहे. मुंबई इंडियन्स अनेकांच्या पसंतीस उतरण्याचे कारण रोहित शर्मा होता. हे देखील आता सिद्ध झाले आहे. रोहित शर्माची कर्णधार पदावरून हकलपट्टी केल्यानंतर, मुंबई इंडियन्सच्या इंस्टाग्राम अकाउंट वरचे अनेक फॉलोअर्स कमी झाले आहेत.

रोहित शर्माला कॅप्टन पदावरून बाजूला केल्यानंतर, मुंबई इंडियन्सचे जवळपास दहा लाख फॉलोवर्स कमी झाले आहेत. कर्णधार पदाचा निर्णय घेण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या इंस्टाग्राम या सोशल मीडिया पेजला तब्बल एक कोटी 36 लाख लोकांनी फॉलो केले होते. मात्र रोहित शर्माला कर्णधार पदावरून बाजूला केल्याची बातमी समोर आल्यानंतर, आता इंस्टाग्राम पेजला 1 कोटी 27 लाख इतकीच फॉलो करणाऱ्यांची संख्या राहिली आहे.

हे देखील वाचा Hardik Pandya MI captain: मुंबई इंडियन्स नंतर हार्दिक पांड्या भारताच्या T20 संघाचाही कर्णधार; रोहीतच्या वाढल्या या तीन अडचणी..

Konkan Railway Recruitment 2023: कोकण रेल्वेतमध्ये या उमेदवारांसाठी मोठी भरती; असा करा अर्ज..

vijay hazare trophy 2023: 24 चेंडूत 106 धावांची वादळी खेळी साकारत ठोठावले टीम इंडियाचे दार; T20 world Cup मध्ये मिळणार संधी?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.