Hardik Pandya MI captain: मुंबई इंडियन्स नंतर हार्दिक पांड्या भारताच्या T20 संघाचाही कर्णधार; रोहीतच्या वाढल्या या तीन अडचणी..

0

Hardik Pandya MI captain: आयपीएलचा (IPL captain) सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) अखेर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) कर्णधार पदावरून हटवले आहे. यापुढे मुंबई संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) असेल अशी घोषणा मुंबई इंडियन्स कडून अधिकृतरित्या करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सने घेतलेले या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना खास करून रोहित शर्माच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या कोर्टात हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स गोटात सामील झाल्यापासून रोहित शर्माच्या कर्णधार पदावर टांगती तलवार होती. मात्र अनेकांना IPL 2024 मध्ये रोहित शर्मा हात कर्णधार असेल, असं वाटत होतं. मात्र हार्दिक पांड्या या सीजन पासूनच मुंबई संघाचे कर्णधार पद भूषवणारे आहे. त्यामुळे आता रोहित शर्माच्या भविष्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

गुजरात संघाचे कर्णधार पद सोडून हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघात केवळ ऑलराऊंडर म्हणून नक्कीच सामील होणार नव्हता. हे अनेकांना माहिती होतं. मात्र एका वर्षानंतर तो मुंबई इंडियन संघाचे नेतृत्व करेल ipl 2024 मध्ये रोहित शर्मा हाच मुंबई संघाचा कॅप्टन असेल. असेही अनेकांना वाटत होतं. मात्र या सगळ्यांना तिरांजली देत हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने कर्णधार पद घोषित केले आहे.

हार्दिक पांड्या यास सीजन पासून मुंबई इंडियन संघाचे कर्णधार पद भूषवणार आहे, याला खूप महत्त्व आहे. कारण 2024 मध्ये भारतीय संघाला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपही खेळायचा आहे. जर हार्दिक पांड्या यावर्षी कोणत्याही आयपीएल संघाचा कर्णधार नसता तर त्याला टी ट्वेंटी विश्वचषक संघाचे कर्णधार पद देखील मिळाले नसते.

भारताच्या T20 World Cup संघाचे कर्णधारपद पुन्हा रोहित शर्माकडे देण्यात येणार असल्याचं बोललं जात होते. या संदर्भात बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्यांसोबत रोहित शर्माची मीटिंग देखील झाली होती. मात्र आता यावर्षी रोहित शर्माकडे आयपीएलच्या कोणत्याही फ्रेंचाईचे कर्णधारपद नसणार आहे. त्यामुळे तो t20 विश्वचषकामध्ये देखील कर्णधार म्हणून खेळणार नाही.

मुंबई इंडियन्स बरोबर रोहित शर्माला आता भारताच्या t20 संघाचे कर्णधार पद देखील मिळणार नाही. हे आता स्पष्ट झाले आहे. या संदर्भात अधिकृतरित्या अद्याप घोषणा झाली नसली तरी टी-ट्वेंटी संघाचे कर्णधार हार्दिक पांड्याकडे देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यातच रोहित शर्माचे t20 रेकॉर्ड फारच निराशाजनक असल्याने, भारताच्या टी ट्वेंटी विश्वचषक संघातही त्याला संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे देखील वाचा IPL 2024: या पाच दिग्गजांचा IPL 2024 असणार अखेरचा सिझन; दोन नावे चाहत्यांसाठी धक्कादायक..

Konkan Railway Recruitment 2023: कोकण रेल्वेतमध्ये या उमेदवारांसाठी मोठी भरती; असा करा अर्ज..

vijay hazare trophy 2023: 24 चेंडूत 106 धावांची वादळी खेळी साकारत ठोठावले टीम इंडियाचे दार; T20 world Cup मध्ये मिळणार संधी?

Wife husband relationship: का येतो नवरा बायकोच्या नात्यात दुरावा? जाणून घ्या कारणे..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.