Wife husband relationship: का येतो नवरा बायकोच्या नात्यात दुरावा? जाणून घ्या कारणे..

0

Wife husband relationship: नातं (relation) कोणतेही असू द्या विश्वास (trust) फार महत्वाचा असतो. विश्वासा शिवाय नवरा-बायकोचे नातं फार काळ टिकू शकत नाही. नात्यांमध्ये प्रेम कमी असेल, तरीदेखील नातं अधिक काळ टिकू शकते. परंतु नात्यामध्ये विश्वास आणि सन्मान नसेल, तर नात्यामध्ये घुसमट होते. पती-पत्नी दोघांनाही नातं टिकवणे आणि सन्मानपूर्वक जीवन जगणे, अलीकडच्या काळात मोठं आव्हान आहे.

कोणतेही नातं परिपूर्ण नसते. नाते कोणतेही असो, नात्यामध्ये मतभेद असतात. मात्र या सगळ्यांमधून दोघांनीही सामंजस्यपणा दाखवणे फार आवश्यक असते. नात्यांमध्ये ओलावा कायम ठेवायचा असेल, तर संवाद फार महत्वाचा आहे. संवादामुळे दोघांमधील मतभेद दूर होतात.

पती-पत्नी दोघांचाही एकमेकांमध्ये संवाद कमी झाला असेल, तुम्हाला तुमच्या मनातल्या गोष्टी एकमेकांना सांगू वाटत नसतील, तर नात्यामध्ये दुरावा निर्माण होत चालला आहे असं समजावे. जर तुमच्या बाबतीत असा प्रकार घडत असेल तर तुम्ही या विषयावर स्पष्टपणे बोलणे आवश्यक आहे.

पती-पत्नीच्या नात्यांमध्ये कमिटमेंटला फार महत्त्व आहे. जर तुम्ही जबाबदारी पासून दूर पळत असाल, तर नात्यात सगळं काही आलबेल नाही. असं समजावे. पती पत्नीच्या नात्यामध्ये जर प्रेम, आणि एकमेकां प्रती आदर ठेवायचा असेल तर तुमची जबाबदारी भक्कमपणे सांभाळणे आवश्यक आहे.

अलीकडच्या काळात धावपळीमुळे अनेकदा जोडीदाराकडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही. हे देखील नात्यामध्ये दुरावा निर्माण होण्याचे कारण आहे. जर तुम्ही तुमच्या पार्टनरला पुरेशा वेळ देत नसलं तर तिला मी तुमची प्रायोरिटी नाही, असं वाटू शकतं. या गैरसमजातून देखील नात्यात दुरावा येऊ शकतो.

पती-पत्नीच्या नात्यांमध्ये शारीरिक संबंधाला देखील प्रचंड महत्त्व आहे. शारीरिक संबंधामुळे पती-पत्नीचे नाते भावनिकरित्या स्ट्रॉंग होते. नात्यांमध्ये कायम ओलावा टिकून ठेवण्यासाठी नेहमी शारीरिक संबंध होणे, फार आवश्यक आहे. या प्रक्रियेदरम्यान जर तुम्ही संवाद साधला तर एकमेकांप्रती प्रेम आणि रिस्पेक्ट वाढत जातो. त्यामुळे पती पत्नीच्या नात्यामध्ये या गोष्टींना तुम्ही महत्व देणे फार आवश्यक आहे.

हे देखील वाचा Communication skill : बोलताना या चुका सांगतात तुमच्यात आत्मविश्वास नाही..

Maratha Reservation: भुजबळ नौटंकी करून समाजात तेढ निर्माण करत आहेत? हे कृत्य करण्यासाठी सरकारचाही पाठिंबा..

Sreesanth vs Gautam Gambhir: श्रीसंतने गंभीरचा मोडला माज; ती जुनी गोष्ट काढल्याने श्रीसंत भडकला; जाणून घ्या वादाचे कारण..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.