Sreesanth vs Gautam Gambhir: श्रीसंतने गंभीरचा मोडला माज; ती जुनी गोष्ट काढल्याने श्रीसंत भडकला; जाणून घ्या वादाचे कारण..
Sreesanth vs Gautam Gambhir: आयपीएल प्रमाणे सिनियर खेळाडूंची टी ट्वेंटी स्पर्धा सध्या खेळवली जात आहे. लेजेंड्स लीग क्रिकेट 2023 (LEGENDS LEAGUE CRICKET 2023) असं या स्पर्धेचे नाव आहे. या स्पर्धेत अनेक आंतरराष्ट्रीय माजी स्टार खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. देखील अनेक स्टार खेळाडू या स्पर्धेचा भाग आहेत. आज या स्पर्धेचा फायनल खेळवला जात असून, सुरेश रैना आणि हरभजन सिंग आमने सामने असणार आहेत.
या स्पर्धेत खेळताना दोन दिवसापूर्वी श्रीसंत आणि गौतम गंभीर (Sreesanth Gautam Gambhir fight) या दोघांमध्ये चांगलाच राडा झाला. सामन्या दरम्यान दोघामध्ये शाब्दिक चकमक झाली. या शब्दाचे रूपांतर भांडणात झाले. आणि या दोघांच्या या वादामुळे स्पर्धेत गालबोट देखील लागले. दोघांच्या वादाची इनसाइट स्टोरी आता समोर आली आहे.
गौतम गंभीर (Gautam Gambhir) आहे श्रीसंत (Sreesanth) या दोघांमध्ये बाद झाल्यानंतर, या वादात आणखी एका माजी जलदगती गोलंदाज प्रवीण कुमारने देखील उडी घेतली. श्रीसंत आणि गौतम गंभीर हे दोन्ही खेळाडू अनेकदा इतर खेळाडूंशी भांडताना पाहायला मिळाले आहेत. अगदी 2012 आयपीएल 2022 च्या सीजन मध्ये देखील गौतम गंभीर आणि विराट कोहलीमध्ये मोठा वाद झाला होता.
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण श्रीसंतवर मोठी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर त्याने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. श्रीसंतला लेजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. मात्र या स्पर्धेत गौतम गंभीर आणि श्रीसंत यांच्यामध्ये मोठा राडा झाला. या दोघांचा राडा मैदानात उपस्थित असणाऱ्या अंपायर आणि खेळाडूंच्या मदतीने मिटवण्यात आला.
गौतम गंभीर फलंदाजी करत असताना श्रीसंत गोलंदाजी करत होता. दोघेही मैदानावर आपला आक्रमकपणा दाखवत होते. श्रीसंत दाखवत असलेला आक्रमकपणा गौतम गंभीरला सहन झाला नाही. आणि त्याने फिक्सर फिक्सर म्हणून श्रीसंतला चिडवायला सुरुवात केली. गंभीरच्या या कृत्यामुळे श्रीसंत चांगला संतापला. आणि गंभीरकडे धावत गेला.
Kelesh 🚨 #Cricket#Gautamgambhir vs #Sreesanth
It's Gambhir Realy a Rude person ?
pic.twitter.com/KCyZXAPHnC— Ritikk (@RitikkSaha69759) December 7, 2023
सोशल मीडियावर या संदर्भात खुलासा करताना श्रीसंतने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडिओ त्याने वादाचे कारण स्पष्ट केले आहे. श्रीशांत म्हणाला गौतम गंभीर हा आपल्या जवळच्या खेळाडूंसोबत देखील अशाच प्रकारचे वर्तन करतो. वीरेंद्र सेहवागचा देखील तो सन्मान करत नसल्याचा खुलासा त्याने या व्हिडिओत केला आहे. मला फिक्स फिक्स असं म्हणताना त्याने शिवी देखील दिली असा खुलासा श्रीसंतने केला आहे.
हे देखील वाचा IND vs SA 1St T20: उद्या रंगणार T20 चा थरार; जाणून घ्या सामन्याची वेळ, प्रक्षेपण आणि संघ..
Rohit Sharma BCCI meeting: रोहित शर्माचा BCCI ला सवाल, अन् हार्दिक पांड्या पुन्हा अडचणी..
T20 World Cup: रोहित शर्माच्या कर्णधार पदाला आव्हान दिले; आता तोच T-20 World Cup मधून आउट..
IPL 2024: या पाच दिग्गजांचा IPL 2024 असणार अखेरचा सिझन; दोन नावे चाहत्यांसाठी धक्कादायक..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम