IND vs SA 1St T20: उद्या रंगणार T20 चा थरार; जाणून घ्या सामन्याची वेळ, प्रक्षेपण आणि संघ..

0

IND vs SA 1St T20: उद्यापासून भारत आणि दक्षिण आफ्रिका (India tour of South Africa) दौऱ्याची सुरुवात होत आहे. या दौऱ्याची सुरुवात T20 मालिकेपासून होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पहिला टी-ट्वेंटी सामना डर्बन मैदानावर खेळवला जाईल. आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकाच्या दृष्टीने या मालिकेला विशेष महत्त्व आहे. सिनियर खेळाडूंच्या अनुपस्थितीत नवीन खेळाडू कशी कामगिरी करतात याकडेही लक्ष असेल.

सूर्यकुमार यादवच्या (suryakunar Yadav) नेतृत्वात नवीन संघ पहिल्यांदा भारताबाहेर एका बलाढ्य संघासोबत टी-ट्वेंटी मालिका खेळणार आहे. आगामी T20 विश्वचषकामध्ये भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी नवीन खेळाडूंकडे ही मोठी संधी आहे. दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर खेळण्याचे मोठे अडवांटेज असेल. भारतासाठी ही मालिका प्रचंड आव्हानात्मक असणार आहे.

टी ट्वेंटी विश्वचषकासाठी हार्दिक पांड्या (hardik Pandya) ऐवजी निवड समितीने रोहित शर्मा (Rohit Sharma) हाच कर्णधार असेल यावर शिक्कामोर्तब केलं आहे. 2022 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकात भारतीय संघाला दारून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभव नंतर बीसीसीआयने (BCCI) हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात T20 संघ बांधायला सुरुवात केली. मात्र दुखापतीच्या कारणामुळे हार्दिक पांड्या ऐवजी रोहित आता शर्मालाच टी ट्वेंटी संघाचे कर्णधार पद देण्यात आले आहे.

रोहित शर्मा भारतीय टी-ट्वेंटी संघाचे नेतृत्व करणार असल्याने, आता तीन सलामीवीरांपैकी केवळ एकाचीच वर्णी लागणार आहे. ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल आणि ईशान किशन या तिघांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे. रोहित शर्मा आणि या तिघांपैकी एक खेळाडू T20 विश्वचषकामध्ये उतरताना दिसेल.

क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून पाहायला मिळेल. हा सामना डर्बन मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्याचे प्रक्षेपण स्टार पोर्ट या वाहिनीवर होणार आहे. त्याचबरोबर हॉटस्टार आणि डिस्ने या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील क्रिकेट चाहत्यांना या मालिकेचे प्रक्षेपण पाहायला मिळेल.

शुभमन गिलचे या मालिकेत पुनरागमन होत असल्याने, ऋतुराज गायकवाड किंवा यशस्वी जयस्वाल या दोघांपैकी एकाला बाहेर बसावं लागणार आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी ईशान किशनला संधी देण्यात येणार आहे. असा असेल अंतिम अकराचा संघ; यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज आणि दीपक चहर

हे देखील वाचाVirat Kohli T20 world Cup: Virat kohli पुन्हा BCCI च्या टार्गेटवर; T20 World Cup साठी विराट ऐवजी तिसऱ्या क्रमांकावर या खेळाडूला संधी..

Rohit Sharma BCCI meeting: रोहित शर्माचा BCCI ला सवाल, अन् हार्दिक पांड्या पुन्हा अडचणी..

T20 World Cup: रोहित शर्माच्या कर्णधार पदाला आव्हान दिले; आता तोच T-20 World Cup मधून आउट..

IPL 2024: या पाच दिग्गजांचा IPL 2024 असणार अखेरचा सिझन; दोन नावे चाहत्यांसाठी धक्कादायक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.