Communication skill : बोलताना या चुका सांगतात तुमच्यात आत्मविश्वास नाही..
Communication skill : जीवनात आत्मविश्वास (Confidence) फार महत्वाचा आहे. आत्मविश्वासाशिवाय कोणतीही गोष्ट करणं अशक्य आहे. मनुष्याच्या चालण्या-बोलण्यात आत्मविश्वास झळकत असतो. जाणून-बुजून कोणीही आपल्यामध्ये आत्मविश्वासाची कमी असल्याचे दाखवत नाही. मात्र तुमच्या बोलण्यामधून समोरच्या व्यक्तींना तुम्ही किती कॉन्फिडन्ट आहात याविषयी स्पष्टता येऊ शकते.
प्रत्येक माणूस सर्वगुण संपन्न नसतो. मात्र तुमच्यामध्ये असणारा आत्मविश्वास तुम्हाला प्रेरणा देतो, तुम्हाला जमत नसलेल्या अनेक गोष्टी आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही मिळवू शकता. कुठेही गेला तरी तुम्ही आत्मविश्वासाने समोरच्या व्यक्तीशी संवाद साधणे गरजेचे असते. तरच तुम्ही कुठल्याही कामात टिकू शकता. संवाद साधत असताना, तुमच्या काही चुका समोरच्याला तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी असल्याची जाणिव करुन देते. जाणून घेऊ अधिक..
इंटरव्यू द्यायला गेल्यानंतर, तुम्ही जे म्हणाल तसं मी करेन, हे वाक्य बहुतांशी लोकांचा तोंडून येते. मात्र हे वाक्य तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी असल्याचे दर्शवते. कारण कुठल्याही कामात तुम्हाला स्वतःचं मत नाही, असा त्याचा अर्थ होतो. समोरचा व्यक्ती जे सांगेल, ते करणे हे तुमच्यामध्ये असणाऱ्या आत्मविश्वासाची कमी दर्शवते.
जर तुम्ही कुठलेही काम किंवा संवाद साधत असाल, तर तुमचं मत मांडणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमचं मत मांडत असाल, तर तुम्ही स्वतंत्र विचाराचे आहात. तुम्हाला विचार आहे, याचा अर्थ तुमच्यामध्ये आत्मविश्वास खचून भरलेला आहे. हे दर्शवते. जोपर्यंत तुम्ही तुमचे मत मांडत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. जो मनुष्य निर्णय घेत नाही, त्याच्यामध्ये आत्मविश्वास नसतो. त्यामुळे तुम्हाला विचार असणे, आणि तो प्रभावीपणे मांडणे फार आवश्यक आहे.
तुम्ही कधीही इतरांजवळ लोकं माझ्याविषयी काय विचार करत असतील, हे वाक्य बोलू नका. कारण लोक तुमच्या विषयी जे बोलतात, तुम्ही त्याच पद्धतीने स्वतःला मोजता. असा त्याचा अर्थ होतो. याशिवाय लोकांच्या मताचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो, याचा अर्थ तुमच्यामध्ये आत्मविश्वास नाही. हे देखील दर्शवणारं असतं. त्यामुळे तुमच्या तोंडात चुकूनही अशा प्रकारचे वाक्य आणि विचार नसायला हवं.
हे देखील वाचा Maratha Reservation: भुजबळ नौटंकी करून समाजात तेढ निर्माण करत आहेत? हे कृत्य करण्यासाठी सरकारचाही पाठिंबा..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम