Konkan Railway Recruitment 2023: कोकण रेल्वेतमध्ये या उमेदवारांसाठी मोठी भरती; असा करा अर्ज..

0

Konkan Railway Recruitment 2023: जर तुम्ही रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छित असाल, तर कोकण रेल्वेमध्ये काही पदांची भरती निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे असून, उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. कोकण रेल्वे कडून या संदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जाणून घेऊया भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर माहिती..

कोकण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. पदानुसार मुलाखतीची दिनांक विभागाकडून जारी केली गेली आहे. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी मुलाखत दिनांक असणार आहे. 14, 18, 20, 22, 26, 28 आणि 30 डिसेंबर त्याचबरोबर एक जानेवारी, चार जानेवारी, पाच जानेवारी, आणि 8 जानेवारी 2024 ही मुलाखतीची तारीख असणार आहे.

पदे आणि शैक्षणिक पात्रता

कोकण रेल्वे विभागाकडून ही भरती एकूण 32 रिक्त जागांसाठी केली जाणार आहे. सीनियर डिझाईन इंजिनिअर या पदासाठी एक रिक्त जागा आहे. साठी उमेदवार ६० गुणांसह सिविल इंजिनिअरिंग पदवी संपादन केलेला असणे आवश्यक आहे. सोबतच सहा वर्षाचा अनुभव देखील असणे अनिवार्य आहे.

सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर या पदासाठी पाच रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवार सिव्हिल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केलेला असणे आवश्यक आहे. सोबतच उमेदवाराला पाच वर्षाचा अनुभवही असणे आवश्यक आहे.

डिझाईन इंजिनिअर या पदासाठी 2 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवाराने सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी संपादन केलेली असणे आवश्यक आहे. सोबत पाच वर्षाचा अनुभवही अनिवार्य आहे.

“ड्राफ्ट्समन” या पदासाठी एक रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी उमेदवार 60% गुणांसह ड्राफ्ट्समन-सिव्हिलमध्ये ITI पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. सोबतच 8 वर्षाचा अनुभव देखील असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा विषयी सांगायचं झाल्यास, उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2023 रोजी 35 ते 55 वर्षा दरम्यान असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे. जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

अधिवृत वेबसाइट… https://konkanrailway.com/

हे देखील वाचा vijay hazare trophy 2023: 24 चेंडूत 106 धावांची वादळी खेळी साकारत ठोठावले टीम इंडियाचे दार; T20 world Cup मध्ये मिळणार संधी?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.