vijay hazare trophy 2023: 24 चेंडूत 106 धावांची वादळी खेळी साकारत ठोठावले टीम इंडियाचे दार; T20 world Cup मध्ये मिळणार संधी?

0

vijay hazare trophy 2023: आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक संघात संधी मिळवण्यासाठी नवीन खेळाडूंमध्ये चढाओढ सुरू आहे. निवड समिती अनेक खेळाडूंना संधी देखील देत आहे. दुसरीकडे विजय हजारे स्पर्धेत देखील अनेक खेळाडू आपले नशीब अजमावताना पाहायला मिळत आहेत. काल विजय हजारे स्पर्धेमधील दुसऱ्या सेमीफायनल सामना राजस्थान आणि कर्नाटक संघामध्ये खेळण्यात आला. या सामन्यात दीपक हुडाने (Deepak Hooda) दमदार खेळी साकारत ट्वेंटी विश्वचषकात आपणही स्पर्धक असल्याची आठवण करून दिली.

दिपक हुडाने राजस्थान संघाल एकहाती विजय मिळवून दिला. या विजया बरोबरच राजस्थान संघाने विजय हजारे स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. विजय हजारे स्पर्धेचा अंतिम सामना उद्या हरियाणा आणि राजस्थान या दोन प्रतिस्पर्धी संघांमध्ये रंगणार आहे. आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून देताना दीपक हुडाने 180 धावांची खेळ साकारली.

दीपक हुडाला भारताच्या t20 संघात संधी मिळाली होती. त्याने एक दमदार शतकही ठोकलं होतं. मात्र त्यानंतर त्याला आपल्या खेळात सातत्य राखता आले नाही. एकीकडे ही वस्तुस्थिती असली तरी दुसरीकडे त्याला फारशी संधी देखील मिळाली नाही. मात्र 2023 आयपीएलमध्ये त्याची कामगिरी फारच सुमार राहिली. त्यामुळे निवड समितीने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. आता तो पुन्हा चमकला असून निवड समितीचे लक्ष आपल्याकडे वेधण्यात सफलही झाला आहे.

282 धावांचा पाठलाग करताना कर्नाटक संघाने राजस्थान संघाची 3 बाद 23 अशी अवस्था केली होती. अशा आव्हानात्मक परिस्थितीतून कर्णधार दीपक हुडाने सामन्याची सगळी सूत्रे आपल्या हातात घेत 128 चे 180 धावांची बहारदार खेळ साकारली. विशेष म्हणजे, या खेळीमध्ये त्याने 106 धावा चौकार आणि षटकारांचा मदतीने केल्या. 180 धावांच्या खेळीत 19 चौकार आणि पाच उत्तुंग षटकार लगावले.

दीपक हुडाने साकारलेल्या या खेळामुळे आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकात आपणही स्पर्धक असल्याचे त्याने दाखवून दिले आहे. 2024 मध्ये होणारे आयपीएल स्पर्धेत दीपक हुडाने जर परफॉर्मन्स केला, तर त्याला देखील टी-20 संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल या तिन्ही अनुभवी खेळाडूंकडे भारताच्या टी-ट्वेंटी संघात प्रथम प्राधान्य म्हणून पाहिले जात नाही.

विराट कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल या तिघांशिवाय निवड समिती भारताचा टी ट्वेंटी संघ तयार करण्याचा विचार करत आहे. याशिवाय ईशान किशनचे आकडेही फारसे चांगले नाहीत. त्यामुळे टी ट्वेंटी संघात कोणाला संधी मिळेल, हे अजूनही ठामपणे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत दीपक हुडा हा देखील एक पर्याय निवड समिती पुढे असणार आहे.

हे देखील वाचा IND vs SA 3rd T20: दोन खेळाडूंना T20 World Cup संघात जागा पक्की करण्याची शेवटची संधी; आजचा सामना ठरणार निर्णायक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.