IND vs SA 3rd T20: दोन खेळाडूंना T20 World Cup संघात जागा पक्की करण्याची शेवटची संधी; आजचा सामना ठरणार निर्णायक..

0

IND vs SA 3rd T20: आगामी t20 विश्वचषकाचे (T20 World Cup) सध्या ऑडिशन सुरू आहे. भारतीय टी-ट्वेंटी संघात तीन फलंदाजांच्या रिक्त जागा आहेत. या जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडूंमध्ये रस्सीखेच सुरू आहे. टी-ट्वेंटी विश्वचषक संघात जागा निश्चित करण्यासाठी या खेळाडूंकडे केवळ तीनच टी ट्वेंटी सामने शिल्लक आहेत. त्यामुळे आज दक्षिण आफ्रिके विरुद्ध होणारा टी-ट्वेंटी सामना देखील महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

रोहित शर्मा (Rohit Sharma) विराट कोहली (Virat kohli) आणि केएल राहुल (kl Rahul) अनुभवी खेळाडू भारताच्या t20 संघाचा भाग असतील की नाही, याविषयी अद्याप स्पष्टता झाली नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तिन्ही खेळाडूंना भारताच्या t-20 संघात संधी मिळणार नाही. नवीन खेळाडूंना प्राधान्य देण्यात येणार आहे. फारतर या तीन खेळाडूंपैकी रोहित शर्मा कर्णधार म्हणून भारतीय संघाची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे.

3 t20 सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नाही. दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघावर दमदार विजय संपादन केला. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आज या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा ट्वेंटी सामना खेळवला जाणार आहे. हा सामना मालिकेच्या दृष्टीने निर्णायक ठरणार असल्याने, भारतीय संघासाठी हा सामना महत्त्वपूर्ण आहे.

जोहान्सबर्ग मैदानावर हा सामना होणार असल्याने क्रिकेट चाहत्यांना या सामन्यात धावांचा पाऊस पडताना पाहायला मिळू शकतो. जोहान्सबर्गची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. या खेळपट्टीवर आतापर्यंत एकूण 26 सामने खेळले केले आहेत. यामध्ये प्रथम गोलंदाजी करताना 13 आणि धावांचा पाठलाग करताना देखील तितकेच सामने जिंकण्याचा विक्रम आहे. भारतीय संघाने या मैदानावर पाच सामने खेळले आहेत. यामध्ये तीन सामन्यात विजय मिळवला आहे.

सिनियर खेळाडू शिवाय t20 विश्वचषकामध्ये भारतीय संघ उतरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नवीन खेळाडूंना टी-ट्वेंटी संघात संधी मिळण्याची ही मोठी संधी आहे. रिंकू सिंगने फिनिशर म्हणून आपली जागा निश्चित केल्याचे देखील बोलले जात आहे. सातत्यपूर्व दमदार खेळामुळे रिंकू सिंगला भारताच्या टी-ट्वेंटी संघात संधी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

रिंकू सिंगला भारताच्या t20 विश्वचषक संघात संधी मिळण्याचे कारण म्हणजे, भारताकडे निनिशिअर म्हणून खेळणारा फलंदाज नाही. रिंकू सिंगने हा रोल प्रभावीपणे निभावला आहे. त्याचा फायदा त्याला होताना दिसतो आहे. रिंकू सिंग शिवाय सलामीवीर म्हणून शुभमन किंवा यशस्वी जयस्वाल या दोघांपैकी एकाला भारताच्या विश्वचषक संघात संधी मिळणार आहे. उर्वरित तीन सामन्यात यशस्वीने दमदार खेळ केला, तर शुभमन गिलला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असल्याची माहिती आहे.

असा आहे तिसऱ्या T 20 साठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव, शुभमंगल यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, कुलदीप यादव, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज, हर्षदीप सिंह, रविंद्र जडेजा

हे देखील वाचा Wife husband relationship: का येतो नवरा बायकोच्या नात्यात दुरावा? जाणून घ्या कारणे..

Virat Kohli T20 world Cup: Virat kohli पुन्हा BCCI च्या टार्गेटवर; T20 World Cup साठी विराट ऐवजी तिसऱ्या क्रमांकावर या खेळाडूला संधी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.