Mumbai Indians: बुमराह नंतर सूर्यकुमार यादवचाही मुंबई इंडियन्सला दणका; पाहा नेमकं काय घडलं..

0

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या (mumbai Indians) गोटात सध्या खळबळ मजली आहे. रोहित शर्माला कर्णधार पदावरून बाजूला करणारा निर्णय मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना देखील पचला नसल्याचं पाहायला मिळत आहे. हार्दिक पांड्या (Hardik pandya) मुंबई इंडियन्समध्ये परतल्यानंतर अनेक खेळाडूंनी आपली उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे. बुमराह नंतर सूर्यकुमार यादवने (suryakunar Yadav) देखील मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटला चपराक लगावली आहे.

2013 साली मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधार पदाची जबाबदारी दिली. रोहित शर्माने देखील मुंबई इंडियन्सने आपल्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरवत पहिल्याच सीजनमध्ये आयपीएलची ट्रॉफी जिंकून दिली. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वात पाच आयपीएल स्पर्धा जिंकल्या. रोहित शर्मा आयपीएलचा सर्वोत्तम कर्णधार म्हणून, उदयासही आला. मात्र तरीही आता त्याला मुंबईने कर्णधार पदावरून बाजूला केले आहे.

रोहित शर्माने कर्णधार पदाच्या आपल्या कारकिर्दीमध्ये केवळ मुंबईला ट्रॉफीच जिंकून दिल्या नाहीत, तर खेळाडूंच्या मनात देखील आपले वेगळे स्थान निर्माण केले. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतल्यानंतर, काही खेळाडू नाराज झाल्याचे बोलले गेले. जसप्रीत बुमराहने तर उघडपणे आपली नाराज व्यक्त करत आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक स्टोरी देखील पोस्ट केली.

आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून स्टोरी पोस्ट करताना जसप्रीत बुमराहने लिहिले, “कधी-कधी काहीही न बोलणे सगळ्यात चांगले उत्तर असते” जसप्रीत बुमराह नाराज होण्याला कारणही होतं. रोहित शर्मा नंतर तोच मुंबई इंडियन्सचा कर्णधार होणार होता. मात्र हार्दिक मुंबईमध्ये आल्याने, त्याची संधी हुकली. जसप्रीत बुमराह नंतर आता सूर्यकुमार यादवने देखील आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे.

हार्दिक पांद्याच्या कर्णधार पदाची घोषणा होताच सूर्यकुमार यादवने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून एक स्टोरी पोस्ट केली. या स्टोरीमध्ये त्याने हार्ट ब्रेक ईमोजी (SuryaKumar Yadav heart break) (heart break emoji) ठेवला. आपल्या स्टोरीमध्ये त्याने काहीही लिहिले नसले तरी मुंबई इंडियन्सने घेतलेला हा निर्णय आपल्याला पटला नसल्याचे त्याने अप्रत्यक्षरित्या सांगितले आहे. विशेष म्हणजे काही तासांनंतर त्याने ही स्टोरी डिलीट देखील केली.

हे देखील वाचा Shame On MI : हार्दिक पांद्याच्या षडयंत्रात अडकली मुंबई इंडियन्स, अन् बळी गेला रोहीत शर्माचा..

#ShameOnMI: हार्दिक पांड्याला कॅप्टन करताच मुंबई इंडियन्सला बसला दणका..

Hardik Pandya MI captain: मुंबई इंडियन्स नंतर हार्दिक पांड्या भारताच्या T20 संघाचाही कर्णधार; रोहीतच्या वाढल्या या तीन अडचणी..

Konkan Railway Recruitment 2023: कोकण रेल्वेतमध्ये या उमेदवारांसाठी मोठी भरती; असा करा अर्ज..

vijay hazare trophy 2023: 24 चेंडूत 106 धावांची वादळी खेळी साकारत ठोठावले टीम इंडियाचे दार; T20 world Cup मध्ये मिळणार संधी?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.