IPL auction Live: IPL auction इतिहासात पहिल्यांदाच कर्णधार राहणार उपस्थित; जाणून घ्या कोणते कर्णधार आहेत लिलावाचा भाग..

0

IPL auction Live: आयपीएल 2024 ची लिलाव प्रक्रिया (ipl auction 2024 live) आज दुबईमध्ये (dubai) पार पडत आहे. एक वाजल्यापासून या लिलावाला सुरुवात होणार आहे. या लीलावामध्ये एकूण 333 खेळाडूंनी भाग घेतला आहे. 333 खेळाडूंपैकी 119 खेळाडू विदेशी तर 234 खेळाडू भारतीय आहेत. 333 खेळाडूंनी या लिलावात भाग घेतला असला तरी, या खेळाडूपैकी केवळ 77 खेळाडूच खरेदी केले जाणार आहेत.

आयपीएल 2024 चा हा मिनी लिलाव आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंची निराशा होणार आहे. लीलावामधून केवळ 77 खेळाडू खरेदी केले जाणार असल्याने, तब्बल 256 खेळाडूंच्या पदरी निराशा पडणार आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत लिलावामध्ये कधीही कोणत्याही संघाच्या कर्णधाराने उपस्थिती दर्शवली नाही. यावेळी मात्र नवा इतिहास घडणार आहे. आतापर्यंत लिलाव टेबलावर केवळ आयपीएल संघ मालक आणि कोच हेच लिलाव प्रक्रियेत सहभागी होताना पाहायला मिळाले आहे.

दुबईच्या कोका कोला एरिना याठिकाणी आयपीएल 2024 ची लिलाव प्रक्रिया पार पडेल. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल संघाचा कर्णधार ऋषभ पंत देखील उपस्थित असणार आहे. ऋषभ पंत बरोबर कोच रिकी पाँटिंग देखील सहभागी होणार आहे. या लीलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी, ऋषभ पंत काल दुबईमध्ये पोहोचला आहे.

कार एक्सीडेंट नंतर ऋषभ पंत 2024 आयपीएलच्या माध्यमातून क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा परतणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ऋषभ पंतचा (rishabh pant) कार एक्सीडेंट झाला होतो. या अपघातातून तो थोडक्यात बचावला होता. अनेक ऑपरेशन नंतर तो आता पुन्हा मैदानात क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अनेकांमध्ये उत्सुकता आहे. ऋषभ पंत कसं कमबॅक करतो, याकडेही अनेकांच्या नजरा आहेत.

अपघातामुळे यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल संघाचा भाग होता आलं नव्हतं. मात्र आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी तो स्टेडियममध्ये पोहचला होता. आता मात्र तो पूर्णपणे फिट झाला असून, आयपीएल खेळण्यासाठी सज्ज देखील झाला आहे. ऋषभ पंत बरोबर भारतीय क्रिकेट संघाचे अनेक माजी खेळाडू, आणि आयपीएलचे माजी कर्णधार देखील संघ व्यवस्थापकाचा भाग म्हणून, लिलावामध्ये उपस्थित राहणार आहेत.

विश्वचॅम्पियन माजी सलामीवीर आणि कोलकत्ता नाईट रायडर्स संघाचा माजी कर्णधार राहिलेला गौतम गंभीर देखील या लीलाव प्रक्रियेमध्ये उपस्थिती दर्शवणार आहे. मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी, नेस वाडिया, जय मेहता हे देखील लिलाव टेबलवर उपस्थित असणार आहेत.

हे देखील वाचा abram aaradhya Viral video: ऐश्वर्याच्या मुलीची शाहरुख खानच्या मुलाला मारली कडकडून मिठी; पाहा तो व्हायरल व्हिडिओ..

IPL auction 2024 Live: उद्या ठरणार रोहित शर्माचं भवितव्य; जाणून घ्या या तीन शक्यता..

Rohit Sharma vs MI: हार्दिक पांड्या, मुंबई इंडियन्सला BCCI ची चपराक; रोहित शर्मावर घेतला हा मोठा निर्णय..

Dawood Ibrahim: अखेर दाऊद इब्राहिमचा विष देऊन खात्मा? कोणी दिले विष? कसा झाला मृत्यु? वाचा सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.