abram aaradhya Viral video: ऐश्वर्याच्या मुलीची शाहरुख खानच्या मुलाला मारली कडकडून मिठी; पाहा तो व्हायरल व्हिडिओ..

0

abram aaradhya Viral video: बॉलीवूडच्या (bollywood) कलाकारांबरोबर त्यांच्या मुलांच्या आयुष्यात काय चाललं आहे, हे देखील जाणून घेण्यात अनेकांना रस असतो. सध्या बॉलीवूड स्टार कीड चांगलेच चर्चेत आहेत. बॉलीवूड सेलिब्रिटींची बहुसंख्य मुलं, ही धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतात. सध्या या स्कूलचा स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुलांनी आपली कला सादर केली, जी सध्या कमालीची चर्चेत आहे.

शाहरुख खानचा मुगला अब्राहम (abram shshrukh khan) आणि ऐश्वर्या राय बच्चन हिची मुलगी आराध्या (aaradhya bacchan) या दोघांनी देखील कला सादर केली. दोघांनी केलेल्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक देखील केले. विशेष म्हणजे, आपल्या परिवारासमोर या दोघांनी कला सादर केल्याने, या कलेचे सादरिकरण चर्चेचा विषय बनला आहे. स्नेहसंमेलनाचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर वायरल झाला आहे.

खरंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. 2000 साली जोश चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटांमध्ये ऐश्वर्या राय आणि शाहरुख खान दोघांनी बहिण भावाची व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटामध्ये ऐश्वर्या राय शाहरुख खानला पाठीमागून मिठी मारते. आता या मिटीची पुनरावृत्ती 23 वर्षांनंतर दोघांच्याही मुलांनी केली आहे.

शाहरुख खानला ऐश्वर्या रायने मिठी मारली होती. अगदी तशीच हुबेहूब मिठी धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या स्नेहसंमेलनामध्ये ऐश्वर्या रायची मुलगी आराध्याने शाहरुख खानचा मुलगा अब्राहमला पाठीमागून मिठी मारली. जी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

आराध्या आणि अब्राहम या दोघांच्या मिठीचा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. दोघांनीही शाळेतील स्नेहसंमेलनमध्ये आपापली कला सादर केले ज्याचं मोठ्या प्रमाणात कौतुकही झालं स्वतः अमिताभ बच्चन यांनी आपल्या नातीसाठी सुंदर पोस्ट देखील लिहिली. शाहरुख देखील समोर उपस्थित राहून आपल्या मुलाचा परफॉर्मन्स पाहताना प्रचंड आनंदित होत असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा Rohit Sharma vs MI: हार्दिक पांड्या, मुंबई इंडियन्सला BCCI ची चपराक; रोहित शर्मावर घेतला हा मोठा निर्णय..

Dawood Ibrahim: अखेर दाऊद इब्राहिमचा विष देऊन खात्मा? कोणी दिले विष? कसा झाला मृत्यु? वाचा सविस्तर..

IPL auction 2024 Live: उद्या ठरणार रोहित शर्माचं भवितव्य; जाणून घ्या या तीन शक्यता..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.