Rohit Sharma left MI: अखेर रोहितचं ठरलं! रोहीत शर्मासाठी या दोन संघांनी पैसे ठेवले राखून; या पद्धतीने होणार डील..
Rohit Sharma left MI: आयपीएल 2024 लिलाव (IPL auction 2024 live) प्रक्रिया सुरू आहे. मात्र अनेक बड्या खेळाडूंची खरेदी करण्यात आली आहे. मिचेल स्टार्कला (Mitchell starc) आयपीएलच्या (IPL) इतिहासात सर्वाधिक बोली लाऊन कोलकाता नाईट रायडर्सने खरेदी केले. मात्र यापेक्षाही मोठी बोली अजूनही बाकी असून, रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू ठरवण्याची शक्यता आहे.
याही आयपीएल मिनी लिलावामध्ये चेन्नई सुपर किंगने आकर्षित खरेदी करत सर्वाधिक प्रभावित केले. एकीकडे अनेक संघ एका-एका खेळाडूसाठी तब्बल 20, 24 कोटी रुपये मोजत असताना, दुसरीकडे चेन्नई सुपर किंग संघाने मात्र वीस कोटी पेक्षा कमी रकमेत तब्बल तीन धमाकेदार खेळाडूंची खरेदी केली. चेन्नई सुपर किंग रचिन रवींद्र, (rachin Ravindra) डॅरिल मिशेल (daryl mitchell) आणि शार्दुल ठाकूर (shardul Thakur) या तिघांना मिळून केवळ 19 कोटी 80 लाख रुपयांमध्ये खरेदी केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला आहे. मिचेल स्टार्क नंतर कमिंन्स (pat Cummins) सर्वाधिक 20.50 कोटींची बोली लागली. आयपीएलच्या इतिहासात हे दोन खेळाडू सर्वाधिक महागडी ठरले असले, तरी आता रोहित शर्माला (Rohit Sharma) या दोघांपेक्षाही अधिक म्हणजेच, रेकॉर्ड ब्रेक बोली लागण्याची शक्यता आहे.
उद्यापासून आयपीएल ट्रेड विंडो (IPL trade window) ओपन होत आहे. हा ट्रेड विंडो आयपीएल सुरू होण्याच्या 30 दिवस अगोदर पर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीमध्ये कोणत्याही खेळाडूंना आयपीएल संघांना ट्रेड करता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार रोहित शर्मा मुंबई इंडियन्समध्ये राहू इच्छित नसल्याचं समोर आले आहे. एवढेच नाही, तर रोहित शर्मानेस्वतः मला इतर संघांकडून खेळायचं असल्याचं, मुंबई इंडियन्स मॅनेजमेंटला सांगितलं असल्याची माहिती आहे.
कधी आणि कशी होणार डिल
रोहित शर्मा लिलाव प्रक्रियेचा भाग नसला तरी ट्रेडच्या माध्यमातून रोहित शर्माला कुठल्याही संघामध्ये खेळण्याची संधी आहे. मुंबई इंडियन्स टीम मॅनेजमेंटला रोहित शर्माने मी मुंबईमध्ये राहू इच्छित नसल्याचे, सांगितल्याची माहिती आहे. ट्रेडच्या नियमानुसार मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला आम्ही ट्रेड करणार नाही, हे सांगितल्यास रोहितला इतर संघाचा भाग होता येणार नाही. हे खरं असलं, तरी रोहितला आणखी नाराज करणं योग्य होणार नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्स देखील रोहित शर्माला ट्रेड करणार आहे.
यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने (Delhi capitals) रोहित शर्माला ट्रेड करण्यासाठी मुंबई सोबत बातचीत केली. मात्र मुंबई इंडियन्सने आम्ही रोहित शर्माची देवान-घेवाण करणार असल्याचे स्पष्ट केलं होते. मात्र आता रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघामध्ये राहू इच्छित नसून, उद्यापासून आयपीएल ट्रेड विंडो ओपन होत आहे. आयपीएल ट्रेड विंडोच्या नियमानुसार रोहित शर्मा दिल्ली संघात जाणार असल्याची माहिती आहे.
दिल्ली कॅपिटल संघाबरोबर गुजरात टआइटन्स (gujrat Titans) संघ देखील रोहित शर्माला आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी उत्सुक आहे. दिल्ली कॅपिटल संघाने यासाठी पैसे देखील राखून ठेवले आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाकडे जवळपास 25 कोटी रुपये शिल्लक आहेत. दिल्ली कॅपिटल्स बरोबर गुजरात टायटन्सने देखील रोहित शर्माला खरेदी करण्यासाठी आपला कोटा कायम ठेवला आहे गुजरात टायटन्सकडे जवळपास 32 कोटी रुपये शिल्लक आहेत.
हे देखील वाचा Pat Cummins Travis Head: रचिन रवींद्र, ट्रॅव्हिस हेड, डॅरिल मिशेल, पॅट कमिन्सची रेकॉर्ड ब्रेक खरेदी; पाहा कोण कुठे गेलं..
Mumbai Indians: बुमराह नंतर सूर्यकुमार यादवचाही मुंबई इंडियन्सला दणका; पाहा नेमकं काय घडलं..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम