Pat Cummins Travis Head: रचिन रवींद्र, ट्रॅव्हिस हेड, डॅरिल मिशेल, पॅट कमिन्सची रेकॉर्ड ब्रेक खरेदी; पाहा कोण कुठे गेलं..

0

Pat Cummins Travis Head: दुबईमध्ये (dubai) सुरू असलेल्या आयपीएल २०२४ च्या मिनी लिलावामध्ये (ipl 2024 auction Live) आत्तापर्यंत महत्वाच्या खेळाडूंना खरेदी करण्यात आली आहे. 333 खेळाडून पैकी केवळ 77 खेळाडूंनाच खरेदी केलं जाणार असल्याने, अनेकांचे या लीलावकडे लक्ष लागले आहे. भारतीय संघाकडून वर्ल्डकप हिसकावून घेतलेल्या धाकड फलंदाजाला खरेदी करण्यासाठी तब्बल सहा कोटी 80 लाख रुपये मोजावे लागले आहेत.

विश्वचषक 2023 ची स्पर्धा 50 टक्के पार पडल्यानंतर ट्रॅव्हिस हेड (Travis Head) ऑस्ट्रेलियाच्या संघात सामील झाला. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड आणि कॅप्टन पॅट कमिंन्सने (Pat Cummins) ट्रॅव्हिस हेडवर कमालीचा विश्वास दाखवला. विश्वकप खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ 14 खेळाडूंसह भारतामध्ये आला. ऑस्ट्रेलियाने पंधरा खेळाडूंचा संघ जाहीर केला, मात्र दुखापतीमुळे हेड मायदेशीच थांबला होता. पूर्णपणे फिट झाल्यानंतर तो वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात आला. आणि त्याने भारताच्या हातून वर्ल्ड कप हिसकावून घेतला.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने पॅट कमिन्सला खरेदी करण्यासाठी तब्बल वीस कोटी पन्नास लाख मोजले. आयपीएलच्या इतिहासात 20 कोटी 50 लाखांची बोली लागणार एकही खेळाडू नाही. पॅट कमिन्सने हा एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत न्युझीलंड संघाचा सलामीवीर रचीन रवींद्रला (rachin ravindra) मोठी बोली लागेल, असं बोललं जात होतं. मात्र चेन्नई सुपर किंग संघाने रवींद्रला केवळ एक कोटी 80 लाख रुपयांमध्ये खरेदी केले. चेन्नई सुपर किंग संघाने न्युझीलंडचा डॅरिल मिशेल हा आणखी एक खेळाडू खरेदी केला. डॅरिल मिशेलला (Daryl Mitchell) खरेदी करण्यासाठी चेन्नईने तब्बल 14 कोटी रुपये मोजले.

मुंबई इंडियन्सने मिचेल स्टार्कला खरेदी करण्यासाठी पैसे जपून ठेवले आहेत. मात्र मिचेल स्टार्क मुंबईला मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यांचे कारण म्हणजे, गुजरात आणि कोलकत्ता संघाकडे सर्वाधिक रक्कम आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर देखील मिचेल स्टार्कला खरेदी करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र त्यांच्या कोट्यात देखील अधिक रक्कम नाही.

हे देखील वाचा IPL 2024 captain: मुंबईसह चार संघाच्या कर्णधार पदामध्ये मोठा उलटफेर; जाणून घ्या दहाही संघाचे कर्णधार..

IPL auction Live: IPL auction इतिहासात पहिल्यांदाच कर्णधार राहणार उपस्थित; जाणून घ्या कोणते कर्णधार आहेत लिलावाचा भाग..

IPL auction 2024: दिल्ली कॅपिटल्सने रोहीत शर्माला दिली कॅप्टन पदाची ऑफर; पत्नी रितिकाची कमेंटही चर्चेत..

abram aaradhya Viral video: ऐश्वर्याच्या मुलीची शाहरुख खानच्या मुलाला मारली कडकडून मिठी; पाहा तो व्हायरल व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.