IPL 2024: कागदावर 15 कोटी पण प्रत्यक्षात तीन आकडी संख्या; पाहा हार्दिक पांड्यासाठी मुंबईने किती आणि कशी रक्कम मोजली..
IPL 2024: ट्रेडच्या (trade) माध्यमातून हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) गुजरातकडून खरेदी केले. गुजरात संघाचे कर्णधारपद सोडून हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघात सामील झाल्याने अनेकांना धक्का बसला. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना जितका मोठा धक्का हार्दिक पांड्या मुंबईत आल्याने झाला, त्याहून अधिक धक्का रोहित शर्माची मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावरून हकालपट्टी केल्यानंतर बसला.
गुजरात कडून हार्दिक पांड्या पंधरा कोटी रुपयांना ट्रेड होऊन मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला हेअनेकांना माहिती आहे. मात्र ही झाली अधिकृत आणि कागदावरची रक्कम. हार्दिक पांड्याला खरेदी करण्यासाठी मुंबई इंडियन्सला केवळ पंधराच कोटी मोजावे लागले असे नाही, तर हार्दिक पांड्याच्या खरेदीची रक्कम जाणून तुमचेही डोळे फिरतील.
गुजरात संघाकडून हार्दिक पांड्या (Hardik pandya) ट्रेड होऊन मुंबई संघात आला हे अनेकांना माहित आहे. मात्र ट्रेड प्रक्रिया आणि त्याचा नेमका नियम काय? हे अनेकांना माहीत नाही. जोपर्यंत ट्रेड प्रक्रिया आणि नियम माहित नाही, तोपर्यंत हार्दिक पांड्याला मुंबई संघात घेण्यासाठी मुंबईने किती पैसे मोजले आणि हार्दिक पांड्याला किती आणि कसे मिळाले? हे समजणार नाही.
ट्रेडच्या माध्यमातून ज्या संघांना एखादा खेळाडू खरेदी करायचा आहे त्या संघाला खेळाडूची मूळ किंमत आपण ज्या फ्रेंचाईजी कडून खेळाडू घेणार आहोत, त्यांना द्यावी लागते. हा व्यवहार ओपन होतो. त्यामुळे हे सगळ्यांना माहीत होते. 15 कोटी ही रक्कम मुंबई इंडियन्सच्या पर्समधून कमी होऊन अधिकृतरित्या गुजरात टाइटन्स संघाच्या पर्समध्ये जमा होते. ज्याचा फायदा ऑक्शन टेबलवर त्या त्या संघाला होतो.
मात्र केवळ पंधरा कोटीला गुजरात टायटन संघ हार्दिक पांड्याला सोडायला तयार नसेल, यापेक्षा जास्त रक्कम त्यांना हवी असेल, तर हा व्यवहार गुपित ठेवला जातो. ज्या खेळाडूला ट्रेडच्या माध्यमातून खरेदी करायचं आहे, त्या खेळाडूची मूळ आणि गुपित व्यवहारातील 50 टक्के रक्कम दिली जाते. तर उर्वरित 50 टक्के रक्कम मूळ संघाला दिली जाते.
जर एखादा संघ विकणाऱ्या खेळाडूला 50 टक्के रक्कम देऊ इच्छित नसेल, आणि जो काही व्यवहार असेल ती सगळी रक्कम स्वतः ठेवू इच्छित असेल, तरीही त्यांना ही रक्कम ठेवण्याचा अधिकार असतो. रिपोर्ट नुसार हार्दिक पांड्याला 50 आणि गुजरात टाइटन्स संघाला 50 टक्के रक्कम देण्यात आली. हा आकडा 100 कोटी असल्याचं समोर आले आहे. म्हणजेच मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला खरेदी करण्यासाठी तब्बल 185 कोटी रुपये मोजले.
हे देखील वाचा Raha pics: रणबीर आणि विराट कोहलीची लेक म्हणजे कार्बन कॉपी; पाहा दोन्ही फोटो..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम