IND vs SA 1St test live: सामन्यापूर्वीच टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या; असा असेल संघ पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ..

0

IND vs SA 1St test live: आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या (IND vs SA (test series) कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर, भारतीय संघ कसोटी मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) विराट कोहलीसह (Virat kohli) अनुभवी खेळाडू भारतीय संघात परतले असल्याने चाहतेही कसोटी मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत. चाहते कसोटी मालिका पाहण्यासाठी उत्सुक असले तरी पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कौटुंबिक कारणामुळे विराट कोहली (Virat kohli) सराव सामन्याचा भाग होऊ शकला नव्हता. मात्र काल विराट कोहली भारतीय संघासोबत जोडला गेला असून, पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी सज्जही झाला आहे. वर्ल्डकप फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा पहिल्यादांच मैदानावर पाहायला मिळणार आहेत. फायनलमध्ये झालेला पराभव विसरून कसोटी संघात दमदार कामगिरी करण्याचं मोठं आव्हानही या दोघांपुढे असेल.

भारतीय संघाला अद्याप दक्षिण आफ्रिकामध्ये कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे या मालिकेला विशेष महत्त्व आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकेलं का नाही? याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. एकीकडे कसोटी मालिका जिंकण्याच्या अपेक्षा असतानाच दुसरीकडे पावसामुळे अपेक्षाभंग देखील होण्याची शक्यता आहे.

आज पासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. परंतु पहिल्याच दिवशी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाच दिवसांच्या खेळामधील दोन दिवस पाऊस असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पहिला कसोटी सामना अनिर्णित राहण्याची शक्यता आहे. जर असं झालं, तर भारतीय संघाला मालिका जिंकणं कठीण जाणार आहे.

चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे या अनुभवी फलंदाजांच्या अनुपस्थितीत भारतीय संघापुढे प्लेइंग इलेव्हनचं देखील आव्हान असेल. भारतीय गोलंदाजी मजबूत असली तरी फलंदाज कशी कामगिरी करतात, यावर मालिकेचे गणित अवलंबून असणार आहे. यशस्वी जयस्वाल, केएल राहुल यांना भारताच्या अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.

कसा असेल पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ..

रोहीत शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह

 

हे देखील वाचा Virat Kohli South Africa tour: त्या कारणासाठी विराट मालिका सोडून परतला भारतात; असा असेल आफ्रिकेविरूद्ध पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ..

Rohit Sharma left MI: अखेर रोहितचं ठरलं! रोहीत शर्मासाठी या दोन संघांनी पैसे ठेवले राखून; या पद्धतीने होणार डील..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.