Chanakya Niti About Parenting : या 10 गोष्टींची काळजी पालकांनी घेतली पाहिजेच, अन्यथा होईल सत्यानाश

Child Success Tips : प्रत्येकाला आपल्या पाल्याने चांगल्या मार्गावरून जावे असे वाटत असते

0

Chanakya Niti About Parenting:  Parenting Tips: आपला मुलगा किंवा मुलगी कशीही असेल तरीदेखील पालकांना त्यांनी योग्य मार्गावरून जायला हवे, आपल्या मुलांना चांगले वळण असावे असे वाटत असते. प्रत्येक आईबापाची अशीच ईच्छा असते. परंतु एकदा का मुलांनी चुकीच्या मार्गावरून जायला सुरुवात केली की मग सर्व काही अवघड होऊन बसते. मुलं आपल्या आई-वडिलांचे देखील ऐकायला तयार नसतात. त्यामुळे मुलांना वेळीच लवकरात लवकर योग्य वळण लावणे गरजेचे असते. आज आपण आर्य चाणक्य (Chankya) यांच्या नीतीशास्त्रातीनुसार मुलांना वळण लावण्यासाठी काय करावे? हे जाणून घेणार आहोत.

1. सद्गुण : आई वडिलांनी (Parenting) आपल्या पाल्यांना सद्गुणांचे पालन करायला लावले पाहिजे. ही बाब जरी तुम्हाला खूप साधी आणि सरळ वाटत असेल, तरी देखील या गोष्टीचे महत्त्व आयुष्यात खूप मोठे आहे. माणसाचे सद्गुण माणसाला आयुष्यात खूप मोठे बनवतात. जी मुले लहानपणापासून सद्गुनी असतात, ती मुले आयुष्यात चमकदार अशी कामगिरी करून दाखवतात.
2. असत्यशी मैत्री नको: बरीच मुले आपल्याला खोटे बोलताना पाहायला मिळतात. लहान मुलांना छोट्या छोट्या गोष्टींपासून खोटं बोलायची लागलेली सवय, ही भविष्यात खूप मोठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे आपल्या मुलांना खरे बोलण्याचे महत्त्व पटवून सांगा. कारण खऱ्या गोष्टींना कधीही मरण नसते.

 

3. मुलांना शिस्त लावा: शिस्त ही माणसाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. च्या मुलांना लहानपणापासूनच शिस्त असते, ती मुले कधीही चुकीच्या मार्गावर जात नाहीत. जसे की कोणाशी कसे बोलावे? सकाळी लवकर उठणे, रात्री लवकर झोपणे, या सवयी मुलांना लावणे गरजेचे आहे.
4. कष्ट करण्याची सवय लावा: बरेच पालक आपल्या मुलांची लहानपणापासून मर्यादेपेक्षा जास्त लाड करतात. त्याचाच परिणाम म्हणून हळूहळू जशी मुले मोठी होतात, तसंतसे मुलांना कष्ट करायला अवघड होऊन जाते. मुलांना मेहनतीचे महत्त्व रहात नाही. कुठलीही गोष्ट करायला गेले, की मुलांना चुटकीसरशी व्हावे असे वाटते.

5. निसर्गाचे रक्षण करण्यास प्रेरणा द्या: निसर्ग माणसाला भरपूर काही देत असतो. आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसत नसल्या तरी देखील निसर्ग आपल्याला निस्वार्थपणे भरपूर काही देत आहे. आपण देखील निसर्गाचे देणे लागतो, हे आपल्या मुलांच्या मनावर बिंबवा. त्यामुळे तुमची मुले निसर्गावर प्रेम करायला शिकतील. याच गोष्टींचा फायदा त्यांना आयुष्यभर होईल.
6. शिक्षणाचे महत्व पटवून द्यायला हवे: पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले पाहिजे. घरी व्यवसाय असल्याने, भरपूर शेती असल्याने, मुलांचे शिक्षणापासून लक्ष विचलित होते. आपण शिक्षण घेतले नाही, तरी चालेल अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. परंतु शिक्षण घेतल्याने प्रत्येक क्षेत्रातच फायदा होतो, हे आपल्याला माहीतच आहे.

7. मैदानी खेळ खेळण्यास प्रेरणा द्या: आजकाल प्रत्येक मुलाला मोबाईल उपलब्ध होत आहे. बरेच पालक आपल्या मुलांना तासंतास मोबाईल वापरायला देतात. या गोष्टीचा खूप वाईट परिणाम मुलांवर होत असतो. त्यामुळे मुलांना जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळण्यास प्रवृत्त करा. मैदानी खेळामुळे मुले नेहमी ऊर्जायुक्त आणि निरोगी राहतील.
8. महान लोकांच्या विचारांचे आचरण करायला सांगा: आपल्या मुलांना महापुरुषांचे विचार सांगा. तसेच त्यांनी लिहिलेली पुस्तके, आपल्या मुलांना वाचनासाठी उपलब्ध करून द्या. मुलांशी बोलताना नेहमी महापुरुषांच्या विचारांची चर्चा करा. त्यामुळे मुलांमध्ये वैचारिक दृष्टिकोन वाढीस लागेल.

9. मुलांना श्रद्धेची जाणीव करून द्या: चाणक्यांच्या नीतिशास्त्रानुसार पालकांनी आपल्या मुलांसोबत धर्म आणि श्रद्धा याविषयी बोलायला हवे. त्यामुळे मुलांच्यात योग्य आणि अयोग्य याची समज येईल.
10. मुलांना आज्ञाधारक बनवा: आई-वडिलांनी आपल्या पाल्यांसमोर योग्य आचरण केले पाहिजे. आपण जसे कुटुंबात वावरत असतो किंवा वागत असतो, तसेच वागण्याचा प्रयत्न आपली मुलेदेखील करत असतात. ज्यांची मुले आज्ञाधारक असतात, अशा पालकांना समाजात देखील चांगला मानसन्मान मिळताना पाहायला मिळतो. त्यामुळे आयुष्यात आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. आपल्या दैनंदिन कामकाजातून मुलांसाठी वेळ काढला पाहिजे.

हेही वाचा: Chanakya Niti: या लोकांना समाज समजतो मूर्ख; कुठेच मिळत नाही मान-सन्मान..

Maharashtra Rojgar Melava 2023: महाराष्ट्र सरकारकडून महाभरती, इथे होणार मेळावा; 10/12वी/ ITI आणि पदवीधरांना नोकरीची मोठी संधी..

Snake rabbit viral video: ससा आणि सापाच्या झुंजीचा थरारक व्हिडिओ; शेवट पाहून..

Maharashtra premier league 2023: टीम इंडियाला मिळाला कपिल देव पेक्षाही घातक ऑलराऊंडर; 54 चेंडूत 117 धावा आणि चार विकेट..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.