Maharashtra premier league 2023: टीम इंडियाला मिळाला कपिल देव पेक्षाही घातक ऑलराऊंडर; 54 चेंडूत 117 धावा आणि चार विकेट..

0

Maharashtra premier league 2023: सध्या महाराष्ट्र प्रीमियर लिंगमध्ये (Maharashtra premier league) अनेक युवा खेळाडू दर्जेदार कामगिरी करत आहे. महाराष्ट्राचे अनेक नवीन खेळाडूंना आता आपला खेळ दाखवण्याची संधी मिळणारा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. यात अनेक जण आपल्या खेळाची छाप सोडताना दिसत आहेत. कपिल देव नंतर भारतीय क्रिकेटला अजूनही दर्जेदार ऑल राऊंडर मिळाला नाही. मात्र आता भारतीय क्रिकेटला असा एक अष्टपैलू खेळाडू मिळू शकतो जो कपिल देव पेक्षाही घातक आहे. (All rounder performance bye Arshin Kulkarni)

पुणेरी बाप्पा विरुद्ध ईगल नाशिक टायटन्सने (Puneri Bappa vs Eagle Nashik Titans) या दोन संघामध्ये काल महाराष्ट्र प्रीमियर लीग MPL) स्पर्धेचा 7 वा सामना खेळवण्यात आला. पुण्याच्या गेहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात अर्शिन कुलकर्णीने (Arshin Kulkarni) क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे.18 वर्षाच्या या खेळाडूने अनेक क्रिकेट दिगज्जांना आपल्या नावाची ओळख करून दिली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्पर्धा सध्या चांगलीच चर्चेत आहे. ईगल नाशिक टायटन्स संघाने ऋतुराज गायकवाडच्या पुणेरी बाप्पा संघावर मिजय मिळवत या स्पर्धेतला दुसरा विजय साकारला. ईगल नाशिक संघाने प्रथम फलंदाजी करताना 203 धावांचं मोठं आव्हान उभा केले. सलामीवीर अर्शिन कुलकर्णीने आपला झंझावात दाखवत केवळ 54 चेंडूत 117 धावांची खेळी केली.

गेहूंजे मैदानावर सलामीवीर अर्शिन कुलकर्णीने (Arshin Kulkarni) आपल्या नावाचे वादळ निर्माण केले. 54 चेंडूत केलेल्या 117 धावांच्या खेळीत त्याने तब्बल 13 षटकार खेचले. षटकार आणि चौकाराच्या मदतीने त्याने तब्बल 90 धावा कुटक्या. म्हणजेच, त्याने केवळ 16 चेंडूत 90 धावा केल्या. या स्पर्धेतील सर्वात जलद शतक झळकावत त्याने अष्टपैलू खेळ देखील सादर केला.

अर्शिन कुलकर्णीने या सामन्यात अष्टपैलू खेळ करताना, फलंदाजी बरोबर गोलंदाजीमध्ये देखील चमक दाखवली. पुणेरी बाप्पा संघाच्या चार फलंदाजांना त्यांने तंबूत पाठवले. आपल्या चार षटकात त्याने 21 धावा देत पुणेरी बाप्पा संघाच्या चार फलंदाजांना तंबूत पाठवले. अर्शिन कुलकर्णीने केलेल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर त्याला आता भारतीय क्रिकेट संघामध्ये देखील स्थान मिळण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे.

अर्शिन कुलकर्णी हा भारतीय क्रिकेट संघाच्या अष्टपैलू खेळाडूचा शोध पूर्ण करू शकतो. टेक्निकली करेक्ट बॅट्समन आणि गोलंदाजीत देखील उत्तम टप्पा, योग्य स्पीड असल्याने तो आगामी काळात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करू शकतो. पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेमध्ये कुलकर्णीवर मोठी बोली लागण्याची शकता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये जर त्याने दमदार कामगिरी केली, तर त्यांची भारतीय संघात एन्ट्री होण्यापासून कोणालाही रोखता येणार नाही.

204 धावांचा आव्हान घेऊन मैदानात उतरणारे पुणेरी बाप्पा संघाची सुरुवात देखील चांगली झाली. मात्र ठराविक अंतराने विकेट गेल्याने ऋतुराज गायकवाडच्या (Rituraj Gaikwad) संघाला हा सामना गमवावा लागला. ऋतुराज गायकवाडने धावांचा पाठलाग करताना अर्धशतक झळकावले. मात्र महत्त्वाच्या क्षणी तो त्रिफळाचीत झाला. पुणेरी बाप्पा संघाने 20 षटकात 8 बाद 202 धावा करता आल्या. आणि अखेर ईगल नाशिक टायटन्सने संघाने हा सामना एका धावेने जिंकला.

हे देखील वाचा Chanakya Niti: फक्त या पाच गोष्टींचा त्याग करा, ब्रह्मदेव आला तरी ध्येयप्राप्ती पासून थांबवू शकत नाही..

husband wife relationship tips: असंतुष्ट पत्नी देते हे इशारे, वेळीच ओळखा अन्यथा..

Tamannaah Bhatia Virat kohli: विराट कोहलीच्या अफेअर विषयी तमन्नाने ते सगळंच सांगून टाकले..

MPL 2023: केदार जाधव आणि ऋतुराजची आज झुंज, आज पासून MPL चा थरार सुरू; कधी आणि कोठे पाहाल सामने? जाणून घ्या..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.