Chanakya Niti: फक्त ‘या’ पाच गोष्टींचा त्याग करा, ब्रह्मदेव आला तरी ध्येयप्राप्ती पासून थांबवू शकत नाही..

0

Chanakya Niti: समाजात यशस्वी माणसाचे गोडवे सगळेजण गातात. साहजिकच यामुळे जीवनात मनुष्य यशस्वी नसेल, तर त्याला जगण्याच्या असंख्य अडचणी निर्माण होतात. एवढेच नाही, तर समाजात त्याला विशेष असं स्थान देखील प्राप्त होत नाही. साहजिकच यामुळे जीवनात प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं. यासाठी आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) आणि एक गुरु मंत्र दिलाय ज्याचे पालन करुन तुम्ही तुमचे ध्येय प्राप्त करू शकता. (Chanakya Niti)

यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) यांनी आपल्या चाणक्य नीती (chanakya niti) या ग्रंथांमध्ये लिहून ठेवली आहे. जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर काय करायला हवं? यावर त्यांनी भाष्य केले आहे. मनुष्याला जर यशस्वी व्हायचं असेल, तर पाच गोष्टींचा त्याग करावा लागेल, असं आचार्य चाणक्य सांगतात. कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी? वाचा सविस्तर..

जीवनामध्ये यश प्राप्त करायचं असेल, ध्येयापर्यंत पोहचायचं असेल, तर तुम्हाला भयमुक्त व्हावं लागेल. जगात कोणालाही सहजासहजी ध्येय प्राप्त झालेले नाही. यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला अथांग प्रयत्न करावे लागतात. तुमच्या कामात सातत्य ठेवावं लागतं. कोणतीही गोष्ट आपण ज्यावेळी पहिल्यांदा करतो तेव्हा अर्थात मनामध्ये भीती असतेच. तुम्हाला बरोबर हीच भीती संपुष्टात आणायची आहे. तरच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहचू शकता.

माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजाच्या रूढी परंपरा जोपासत त्याला आपल्या जीवनाची वाटचाल करावी लागते. एखाद्या नवीन क्षेत्रात जर तुम्ही पाऊल ठेवलं, तर समाज वेढ्यात काढू शकतो. आणि म्हणून अनेक जण समाज काय म्हणेल? याचा विचार करतात. आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाहीत. लोक काय म्हणतील? याचा विचार करत राहिला, तर तुम्ही तुमच्या ध्येयामध्ये स्वतः अडथळा निर्माण करता, हे लक्षात घ्या.

विचार हा सर्वात बलशाली असतो. विचार जर सकारात्मक असतील, तर तुम्ही जगात कुठेही गेला तरी तुमचं स्वतःचं विश्व निर्माण करू शकता. आणि म्हणून सकारात्मक विचार ठेवावा. स्वतःवर विश्वास असला तर जगातील कोणतीही गोष्ट अशक्य वाटत नाही. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या क्षमतेवर विश्वास बसणार नाही. तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही, असं आचार्य चाणक्य सांगतात.

आचार्य चाणक्य सांगतात यशस्वी लोक हे नेहमी वर्तमानाचा विचार करत असतात. जीवनात यशस्वी व्हायचं असेल, तर भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार न करता तुम्ही वर्तमान काळ जगलं पाहिजे. करण चिंता अशी गोष्ट आहे, जी माणसाला जिवंतपणे जाळते. आणि म्हणून कोणत्याही गोष्टीची फार चिंता न करता प्रॅक्टिकली जीवन जगले पाहिजे.

हे देखील वाचा Chanakya Niti: या लोकांना समाज समजतो मूर्ख; कुठेच मिळत नाही मान-सन्मान.. 

Chanakya Niti: ही तीन कामे केल्यामुळे अफाट कष्ट करूनही लक्ष्मी राहते सदैव नाराज..

husband wife relationship tips: असंतुष्ट पत्नी देते हे इशारे, वेळीच ओळखा अन्यथा..

Lion bull viral video: तिन्हीं सिंहांचा बैलाने केला व्हॉलीबॉल; एकदा व्हिडिओ पाहाच..

Snake rabbit viral video: ससा आणि सापाच्या झुंजीचा थरारक व्हिडिओ; शेवट पाहून..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.