Chanakya Niti: या लोकांना समाज समजतो मूर्ख; कुठेच मिळत नाही मान-सन्मान..

0

Chanakya Niti: मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. समाजाशिवाय तो राहू शकत नाही. साहजिकच यामुळे प्रत्येक जण समाजात आपलं देखील वेगळे स्थान असायला हवं. आपल्याला देखील समाजात मान-सन्मान मिळावा, यासाठी अनेक-जण प्रयत्नशील असतात. मात्र प्रत्येकाला हे शक्य होत नाही. आता याला जबाबदार मनुष्य स्वतःच असतो. (Chanakya Niti)

आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) हे थोर विद्वान होते. आपल्या चाणक्य नीति (chanakaya niti) या ग्रंथांमध्ये आचार्य चाणक्य यांनी यशस्वी जीवना संदर्भात मोलाचे उपदेश केले आहेत. समाजात प्रतिष्ठा कमवायची असेल, तर मनुष्याने काय करायला हवं? याविषयी देखील आचार्य चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलंय. जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

आचार्य चाणक्य सांगतात, मनुष्याला समाजात मान सन्मान हा त्याच्या कामामुळे मिळत असतो. जर तो चांगलं काम करत असेल, तर अर्थात समाज समाजाचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. मात्र तो काहीही करत नसेल, तर मात्र अशा लोकांना समाज नावे ठेवतो.

आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, मनुष्य जर एखाद्या क्षेत्रात अपयशी ठरला असेल, तरीदेखील समाजाचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असतो. तुम्ही तुमच्या क्षेत्रात जर यशस्वी झालेला नसाल, तर समाजामध्ये तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होत नाही. तुमच्या मतांना महत्त्व दिलं जात नाही. यश वेळ मागत असतं, हे जरी खरं असलं तरी समाजाला मात्र लगेच रिझल्ट हवा असतो.

आचार्य चाणक्य म्हणतात, ज्या मनुष्याला स्वतःची स्तुती करायची सवय असते. अशा लोकांची देखील समाज मूर्खांमध्ये गणना करतो. तुमची गुणवत्ता ही तुमच्या संवादावरून स्पष्ट होत असते. यासाठी तुम्हाला स्वतःची स्तुती करायची आवश्यकता नसते. आचार्य चाणक्य सांगतात, या उलट तुम्ही चार चौघांमध्ये नेहमी नम्र संवाद साधने गरजेचे असते. त्यामुळे तुमचा मान-सन्मान वाढतो.

जी लोक स्वतःला खूप हुशार, ज्ञानी समजतात आणि इतरांना अज्ञानी अशा लोकांना देखील समाजात मान-सन्मान मिळत नाही. ज्या मनुष्यांमध्ये इतरांचे म्हणणे ऐकून घेण्याची क्षमता असते, अशा लोकांना समज आपलंसं करतो. जी लोक इतरांचा नेहमी अपमान करतात अशा लोकांची देखील समाज मुर्खात गणना करतो.

हे देखील वाचा Lion bull viral video: तिन्हीं सिंहांचा बैलाने केला व्हॉलीबॉल; एकदा व्हिडिओ पाहाच..

Tamannaah Bhatia Virat kohli: विराट कोहलीच्या अफेअर विषयी तमन्नाने ते सगळंच सांगून टाकले..

Snake rabbit viral video: ससा आणि सापाच्या झुंजीचा थरारक व्हिडिओ; शेवट पाहून..

Realme Narzo N53: 50MP कॅमेरा, 6GB RAM असणारा Realme चा सर्वात पातळ स्मार्टफोन लॉन्च; किंमत केवळ..

husband wife relationship tips: असंतुष्ट पत्नी देते हे इशारे, वेळीच ओळखा अन्यथा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.