Realme Narzo N53: 50MP कॅमेरा, 6GB RAM असणारा Realme चा सर्वात पातळ स्मार्टफोन लॉन्च; किंमत केवळ..

0

Realme Narzo N53: प्रत्येकाला कमी किमतीमध्ये दमदार फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करायचा असतो. जर तुमचे देखील बजेट कमी असेल, आणि तुम्हाला दमदार स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुमच्यासाठी ही मोठी संधी आहे. रियल मी कंपनीने आपला नवा Narzo N53 स्मार्टफोन लॉन्च नुकताच लॉन्च केला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन असून, ग्राहकांना हा स्मार्टफोन दहा हजारा पेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे.

Realme Narzo N53 या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे, आतापर्यंतचा हा सर्वात पातळ स्मार्टफोन असणार आहे. जर तुम्ही एक आकर्षक आणि दमदार फिचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे. कंपनीने या स्मार्टफोनची निर्मिती करताना फ्लॅट फ्रेम बरोबर पॉली कार्बोनेट बॉडी देखील दिली आहे. ज्यामुळे या स्मार्टफोनला मजबूती देखील मिळते.

Realme Narzo N53 किंमत

Realme कंपनीने Realme Narzo N53 चे दोन फोन व्हेरीयंट लॉन्च केले आहेत. ज्यामध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजचा समावेश आहे. याशिवाय 128GB स्टोरेजचा स्मार्टफोन देखील लॉन्च करण्यात आला आहे. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर 6GB रॅम असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत 10 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे.

अमेझॉनवर खरेदी करता येईल..

ग्राहकांना 22 मे पासून ॲमेझॉन या ई कॉमर्स वेबसाईटवर हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे, जर ग्राहकांना आणखी ऑफरचा लाभ घ्यायचा असेल, तर एचडीएफसी या कार्डद्वारे स्मार्टफोनचे पेमेंट करावं लागेल. एचडीएफसी कार्डद्वारे पेमेंट केल्यास एक हजार रुपयांची सूट मिळणार आहे. चार जीबी रॅम आणि सहा जीबी रॅममध्ये केवळ एक हजार रुपयांचा फरक असणार आहे. याशिवाय ग्राहकांना “रिअल मी”च्या अधिकृत वेबसाईटवरून देखील हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.

Realme Narzo N53 चे तपशील 

या स्मार्टफोनला दमदार डिस्प्ले देण्यात आला आहे. 720 x 1600 पिक्सेल HD+ रिझोल्यूशन आणि 6.74-इंच IPS LCD डिस्प्ले असणार आहे. स्मूथनेससाठी कंपनीने स्क्रीन 90Hz त्याचबरोबर 180Hz रिफ्रेश रेट दिला आहे. या स्मार्टफोनच्या आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे, फ्रंट कॅमेराच्या सेफ्टीसाठी कंपनीने वॉटरड्रॉप नॉच दिला आहे.

कॅमेरा

जर तुम्ही दर्जेदार कॅमेरा असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचारात असाल, तर तुम्ही डोळे झाकून हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. या स्मार्टफोनला ट्रीपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये मुख्य कॅमेरा 50MP तर 2MP पोर्ट्रेट लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी कंपनीने 8MP फ्रंट कॅमेरा सेन्सर दिली आहे.

दमदार बॅटरी

या स्मार्टफोनला कंपनीने बॅटरी देखील मोठी दिली आहे. कंपनीने या फोनला 5000 mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 33W चार्जिंगला सपोर्ट करते. केवळ 88 मिनिटांमध्ये बॅटरी पूर्ण चार्ज होत असल्याचा कंपनीने दावा केला आहे. या स्मार्टफोन चार्जिंगसाठी कंपनीने टाईप सी पोर्टल USB केबल दिली आहे.

हे देखील वाचा Google search: नवीन लग्न झालेल्या मुली गुगलवर सर्च करतात या पाच धक्कादायक गोष्टी; दुसरी आहे फारच भयानक..

Honda EM1 electric scooter: Honda ची दमदार इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल; जाणून घ्या फीचर्स आणि वैशिष्ट्ये..

IPL 2023: ती आली अन् पृथ्वीने मैदान मारलं; नाशिकच्या तरुणीने असं केलं सेलिब्रेशन, विजयानंतर पृथ्वीही गेला भेटायला..

JioCinema: अखेर JioCinema चा ग्राहकांना दणका! आता JioCinema पाहण्यासाठी वर्षाकाठी मोजावे लागणार 999 रुपये..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.