JioCinema: अखेर JioCinema चा ग्राहकांना दणका! आता JioCinema पाहण्यासाठी वर्षाकाठी मोजावे लागणार 999 रुपये..

0

JioCinema: ओटीटी प्लॅटफॉर्मची (OTT Platform) प्रचंड मागणी वाढली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या दर्जेदार कंटेंटमुळे ग्राहक ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन मोठ्या प्रमाणात घेत असल्याचे दिसून येतं. अशातच आता जिओने ओटीटी प्लॅटफॉर्म क्षेत्रात आपलं पाऊल ठेवल्याने, अनेकांची गोची झाली आहे. कोरोना कालखंडामध्ये ओटीटी घराघरात पोहचले. याचा पुरेपूर फायदा घेत रिलायन्सने देखील या क्षेत्रात पाऊल ठेवलं. असं असलं तरी JioCinema ने आपले महागडे सबस्क्रीप्शन प्लॅन जाहीर केले आहेत.

आयपीएल क्रिकेट (IPL 2023) स्पर्धेचे प्रक्षेपण मोफत दाखवून जिओ सिनेमा प्रत्येकाच्या मोबाईल फोनमध्ये जाऊन बसला. यापूर्वी क्रिकेट चाहत्यांना ‘डिज्नी प्लस हॉटस्टार’ या प्लॅटफॉर्मवर आयपीएल स्पर्धा पाहता येत होती. यासाठी क्रिकेट चाहत्यांना वर्षाकाठी पाचशे रुपये मोजावे लागत होते. यावर्षी जिओ सिनेमाने आयपीएल स्पर्धा मोफत दाखवण्याचा निर्णय घेतला. साहजिकच यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या फोनमध्ये जिओ सिनेमा हे ओटीटी प्लॅटफॉर्म ॲप्स डाऊनलोड (Download) झाले. जर तुम्हाला देखील हे ॲप हवे असेल तर खालील लिंकवर क्लिक करून डाऊनलोड (Download) करू शकता. https://play.google.com/store/apps/details?id=com.jio.media.ondemand

क्रिकेट चाहत्यांना यावर्षीची आयपीएल स्पर्धा फुकट पाहता येत असली तरी जिओ सिनेमा या ॲपच्या माध्यमातून आपला ‘प्रीमियम पॅक’ (jiocinema premium pack) जारी केला आहे. जो पाहण्यासाठी ग्राहकांना आता वर्षाकाठी 999 रुपये मोजावे लागणार आहेत. पुढच्या वर्षापासून क्रिकेट चाहत्यांना आयपीएल स्पर्धा पाहण्यासाठी देखील 999 रुपयाचा प्लॅन अनिवार्य असणार आहे.

जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मने आयपीएल अगोदर, फिफा वर्ल्ड कप देखील ग्राहकांना मोफत दाखवला होता. नंतर आता सुरू असलेली आयपीएल स्पर्धा देखील मोफत दाखवून जिओ सिनेमाने मोठ्या प्रमाणात प्रमोशन केले. अशातच आता HBO त्याचबरोबर WB या दोन हॉलिवूड स्टुडिओच्या फिल्म आणि वेबसीरिज पाहण्यासाठी ग्राहकांना 999 रुपये मोजावे लागणार आहेत. या प्रीमियम पॅकमध्ये जिओ सिनेमावर असणारा सर्व कंटेंट देखील ग्राहकांना पाहता येईल.

डिज्नी प्लस हॉटस्टार करार संपुष्टात..

स्टार स्पोर्ट त्याचबरोबर HBO यांचा “डिज्नी प्लस हॉटस्टार” सोबतचा करार संपुष्टात आल्यानंतर जिओ सिनेमावर सर्व कंटेंट ग्राहकांना पाहता येईल, अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. या वर्षीचे आयपीएल स्पर्धेतचे प्रक्षेपण जिओ सिनेमा या ओटीपी प्लॅटफॉर्मवर दाखवले जात असल्याने, जिओ सिनेमा अधिक चर्चेत आला. आता द वायर’, ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन,”गेम ऑफ थ्रोन्स’’ यास अनेक बडे चित्रपट आणि वेब सिरीज ग्राहक जिओ सिनेमावर पाहू शकतात. मात्र त्यासाठी वर्षाकाठी 999 रुपये मोजावे लागणार आहेत.

पैसे भरूनही..

जिओ सिनेमाचे सबस्क्रीप्शन घेऊन देखील अनेक महत्त्वाचे चित्रपट दिसत नसल्याने, अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पैसे भरून देखील चित्रपट दिसत नसल्याने, JioCinema ने आपल्याला मूर्ख बनवलं. अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत. ग्राहकांनी कमेंट करताना जिओला टॅग देखील केलं आहे. जिओ सिनेमा सबस्क्रीप्शनची ही सुरुवात आहे. यापुढे अनेक चित्रपट आणि वेब सिरीज प्रेक्षकांना पाहता येणार असल्याचं रिलायन्स कडून सांगण्यात आलं आहे.

हे देखील वाचा  IPL 2023: ती आली अन् पृथ्वीने मैदान मारलं; नाशिकच्या तरुणीने असं केलं सेलिब्रेशन, विजयानंतर पृथ्वीही गेला भेटायला..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.