IPL 2023: ती आली अन् पृथ्वीने मैदान मारलं; नाशिकच्या तरुणीने असं केलं सेलिब्रेशन, विजयानंतर पृथ्वीही गेला भेटायला..

0

IPL 2023: आयपीएल 2023 स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. दोन दिवसांत प्ले ऑफमध्ये (IPL 2023 playoff scenario) कोणते चार संघ पोहचतील, हे स्पष्ट होईल. दिल्ली कॅपिटल संघाने पंजाब किंग संघाचा पराभव केल्याने, या स्पर्धेतील पंजाब संघाचे प्ले ऑफमध्ये पोहचण्याचे आव्हान संपुष्टात आले आहे. या सामनाकडे स्पर्धेतील अनेक संघाचे लक्ष लागून राहिले होते. साहजिकच यामुळे हा सामना चर्चेत होता. मात्र त्याहून अधिक चर्चा सोशल मीडियावर ‘पृथ्वी शॉ’ची (Prithvi Shaw) झाली.

कालच्या सामन्यात ‘पृथ्वी शॉ’ची गर्लफ्रेंड (Prithvi Shaw girlfriend) त्याला सपोर्ट करण्यासाठी मैदानात आली होती. ‘पृथ्वी शॉ’ने ठोकलेल्या दमदार अर्धशतकानंतर तिने केलेले सेलिब्रेशन सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर, ‘पृथ्वी शॉ’ फारशी चमक दाखवू शकला नाही. सुमार कामगिरीनंतर त्याला संघातून डच्चू देखील मिळाला. मात्र कालच्या सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली आणि या संधीचे त्यांनी सोनं केलं.

पृथ्वीची कथित गर्लफ्रेंड निधी तापडिया (nidhi tapadia) सपोर्ट करण्यासाठी मैदानात उपस्थित होती. एकीकडे पृथ्वी आपल्या फॉर्मची झगडत असताना दुसरीकडे निधी तापडियाची उपस्थिती महत्त्वाची होती. निधी तापडियाच्या उपस्थितीचा फायदा पृथ्वीला झाल्याचे दिसून आलं. एक प्रकारे त्याला लेडी लक मिळाला. पृथ्वीने ठोकलेल्या दमदार अर्धशतकानंतर निधी तापडियाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर सेलिब्रेशनची स्टोरी ठेवली आणि सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

‘पृथ्वी शॉ’ ची गर्लफ्रेंड निधी तापडिया हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून स्टोरी ठेवताना लिहिले, “whattaaa showww shaw” अशा प्रकारचे सेलिब्रेशन करताना तिने ‘पृथ्वी शॉला’ टॅग देखील केलं आहे. एवढेच नाही, तर तिने सामना संपल्यानंतर ‘पृथ्वी शॉ’ तिची विचारपूस करत असतानाचा एक फोटो देखील आपल्या स्टोरीवर तिने पोस्ट केला आहे.

पृथ्वी शॉ गेल्या काही महिन्यांपासून कमालीचा चर्चेत आहे. एकीकडे त्याच्या सोबतचे अनेक खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. मात्र पृथ्वी आपल्या फॉर्मशी झगडत आहे. याशिवाय मैदानाबाहेर देखील तो चर्चेत राहिला. एका महिला रीलस्टार सोबत झालेल्या धक्काबुक्कीमुळे त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. या धक्काबुक्कीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

कोण आहे निधी तापडिया? 

निधी तापडिया ही पृथ्वीची गर्लफ्रेंड असल्याचं बोललं जातं. निधी तपाडियाच्या बर्थडे दिवशी पृथ्वीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना “हॅप्पी बर्थडे वाइफी” असा उल्लेख केला होतो. रात्र लगेच ‘पृथ्वी शॉ’ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ही स्टोरी डिलीट केली होती. निधी तापडिया ही मूळची नाशिकची आहे. तिने अनेक मालिकांमधून काम केले आहे. ती अभिनेत्री आणि मॉडेल व्यवसायामध्ये आपले करिअर आजमावत आहे. निधीने सीआयडी या क्राईम मालिकेमध्ये देखील काम केले आहे.

हे देखील वाचा वारस नोंद: आता घरबसल्या करता येणार वारस नोंद; जाणून घ्या अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.