वारस नोंद: आता घरबसल्या करता येणार वारस नोंद; जाणून घ्या अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत..

0

वारस नोंद: यापूर्वी वारस नोंदीसाठी तलाठी कार्यालयात अनेकदा हेलपाटे मारावे लागत होते. मात्र आता वारस नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. आता तुम्ही घरबसल्या महाराष्ट्र सरकारच्या ‘ई-हक्क’ प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकता. जाणून घेऊ सविस्तर.

महाराष्ट्र सरकार महसूल विभागाने शेतकऱ्यांकरिता ‘ई-हक्क’ प्रणाली सुविधा जारी केली आहे. ई-हक्क’ प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता आपल्या सातबाऱ्यावर घरबसल्या ऑनलाईन वारस नोंद करता येणार आहे. याशिवाय सातबाऱ्यावर बोजा चढवणे, कमी करणे, यासारखी महत्वाची कामे घरबसल्या ऑनलाईन अर्ज करून करू करता येणार आहेत. कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर, शेतकऱ्यांना तीन महिन्याच्या आत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो. यासाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही.

असा करा वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्ज

वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचा मोबाईल मधील क्रोमवर जाऊन bhulekh.mahabhumi.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाची अधिकृत वेबसाट ओपन होईल. या वेबसाईटच्या खाली आणखी एक लिंक तुम्हाला पाहायला मिळेल.

https://pdeigr.maharashtra.gov.in अशा प्रकारची ही लिंक असणार आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर, ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ असं एक पेज ओपन होईल. या पेजवर तुम्हाला ‘Proceed to login’ हा पर्याय पाहायला मिळेल. तुम्हाला बरोबर यावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर “Create new user” यावर क्लिक केल्यानंतर “New User Sign Up” हे पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव टाकायचे आहे. त्यांनतर login details या पर्यायामध्ये Username टाकून “check availability” या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे.

त्याचबरोबर ई-मेल आयडी तुमचे पॅन कार्ड नंबर, पिन कोड, मोबाईल नंबर, राज्याचं जिल्ह्याचे, त्यानंतर तुमचं गाव, तालुका इत्यादी माहिती सविस्तर भरायची आहे. नंतर तुम्हाला तुमचा पत्ता, घर क्रमांक टाकायचा आहे. शेवटी तुम्हाला ‘कॅप्चा’ टाकून ‘सबमिट’ पर्यायावर क्लिक करायचं आहे.

इथपर्यंत व्यवस्थित प्रोसेस झाल्यानंतर, तुमच्यासमोर ‘Details’ नावाचं नवीन पेज ओपन होईल. याठिकाणी Registration, Marriage, e-filing, 7/12 mutations इत्यादी पर्याय पाहायला मिळतील. यापैकी तुम्ही ‘7/12 mutations’ यावर क्लिक करा. त्यांनतर तुम्हाला यूझरचा प्रकार निवडायचा आहे. यामध्ये तुम्ही “सामान्य नागरिक” हा पर्याय निवडाल. हा पर्याय निवडल्यानंतर, तुम्ही ‘Process ‘ यावर क्लिक करा.

नंतर “फेरफार अर्ज प्रणाली हक्क” या नावाचे एक नवीन पेज ओपन होईल. आता तुम्हाला या पेजवर तुमच्या गावाची माहिती, जिल्हा त्याचबरोबर तालुका निवडायचा आहे. त्यानंतर तुमच्यासमोर “वारस नोंद” हा पर्याय पाहायला मिळेल. तुम्हाला बरोबर हाच पर्याय निवडायचा आहे.

या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर “वारस फेरफार अर्ज” ओपन होईल. आता या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचे नाव, वडिलांचे नाव, अर्जदाराचा मोबाईल क्रमांक, त्याच बरोबर ई-मेल टाकून, “पुढे जा” या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. इथपर्यंत व्यवस्थित प्रोसेस केल्यानंतर, तुम्हाला तुम्ही केलेला अर्ज पाहायला मिळेल‌‌. आता यामध्ये तुम्हाला मयत व्यक्तीचे नाव किंवा जमिनीचा खाते क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर “खातेदार शोधा” हा पर्याय तुम्हाला दिसेल. तुम्हाला या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

मयताचे नाव, गट क्रमांक निवडल्यानंतर, तुम्हाला मयत व्यक्तीच्या मृत्यूची दिनांक टाकावी लागणार आहे. तारीख टाकल्यानंतर तुमच्यासमोर ”समाविष्ट करा” हा पर्याय ओपन होईल. तुम्हाला बरोबर या पर्यायावर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला अर्जदार वारस आहे का? असा प्रश्न विचारला जाणार आहे. यामध्ये तुम्हाला “हो’ हा पर्याय निवडायचा आहे.

“हो” हा पर्याय निवडल्यानंतर तुमच्यासमोर, “वारसांची नावे भरा” हा पर्याय ओपन होईल. तुम्हाला यावर क्लिक करून, विचारलेल्या प्रश्नांची माहिती तुम्हाला संबंधित रकान्यांमध्ये व्यवस्थित भरायची आहे. यानंतर तुम्हाला पोस्ट ऑफिस निवडावे लागेल. त्याचबरोबर तुमचा पत्ता, घर क्रमांक, सोबतच मयताशी तुमचं नात, हे देखील तुम्हाला टाकावं लागणार आहे. त्यानंतर सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर “साठवा” या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

इथपर्यंत सविस्तर प्रोसेस झाल्यानंतर, तुम्हाला “पुढे जा” हा पर्याय पहिला मिळेल. तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला मयत झाल्याच्या दाखल्याची सत्यप्रत अपलोड करावी लागणार आहे. शिवाय तुम्हाला विचारल्या गेलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.

आता तुम्ही भरलेली सर्व माहिती खरी आहे. या संदर्भात एक स्वयंघोषणापत्र तुम्हाला या पेजवर पाहायला मिळेल. हे स्वयंघोषणापत्र वाचून ‘सहमत आहे’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. या प्रोसेस नंतर तुमचा अर्ज तुमच्या तलाठी कार्यालयात जमा केला जातो. त्यांनतर तलाठी छाननी करून तुमच्या सातबाऱ्यावर वारसाची नोंद करतात.

हे देखील वाचा How to track location: या ट्रिकच्या मदतीने जाणून घ्या जोडीदाराचे लाईव्ह लोकेशन..

PM Kisan Samman Nidhi: १४ व्या हप्त्याची तारीख निश्चित! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार ४ हजाराचा हप्ता; तुम्हाला मिळणार का? जाणून घ्या या पध्दतीने..

Marriage Tips: लग्नासाठी मुलगी पाहताय? मुलीमध्ये हे गुण नसतील तर चुकूनही करू नका लग्न; व्हाल उध्वस्त..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.