Marriage Tips: लग्नासाठी मुलगी पाहताय? मुलीमध्ये ‘हे’ गुण नसतील तर चुकूनही करू नका लग्न; व्हाल उध्वस्त..

0

Marriage Tips: लग्न (marriage) हा माणसाच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा आणि आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय आहे. योग्य जोडीदार मिळाला नाही, तर आनंदी आणि समाधानी आयुष्य क्षणात उध्वस्त होतं. अलीकडे वैवाहिक जीवनाचा गाडा चालवणं मोठं आव्हान आहे. किरकोळ गोष्टीवरून वादविवाद होऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत देखील गेल्याची अनेक उदाहरणे तुमच्या आसपास पाहायला मिळतात. अनेकदा नात्यांमध्ये तडजोड करून देखील नातं टिकत नसल्याचे अनुभव तुम्हालाही अनेकदा येतात. आता या गोष्टीला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार असता. (Happy Marriage Tips)

जेव्हा तुम्ही लग्न करण्याचा निर्णय घेता, तेव्हा मुली पाहण्याचा कार्यक्रम चालू करता. प्रत्येकाच्या लग्नासंदर्भातल्या कल्पना वेगवेगळ्या असतात. अनेकांना सुंदर पत्नी हवी असते. मात्र तुम्ही बरोबर इथेच गपलत करता. प्रत्येकाला आपली पत्नी सुंदर असावी, असं वाटत असतं, यात काही गैर नाही. मात्र सुंदरतेबरोबर मुलीची बौद्धिक क्षमता देखील पाहणं आवश्यक असतं. वैवाहिक जीवनाचा गाडा यशस्वी चालवायचा असेल, तर जाणून घ्या या गोष्टी.

जेव्हा तुम्ही लग्न करण्याचा निर्णय घेता, तेव्हा मुलींमध्ये समजूतदारपणा आहे की नाही याविषयी जरूर विचार करा. मुलगी समजूतदार असेल, तरच नातं सुंदर बनू शकतं अन्यथा नात्यात अनेक समस्या निर्माण होतात. लग्न हा दोन चाकाचा गाडा आहे. दोन पैकी एक चाक व्यवस्थित चालत नसेल, तर गाडा व्यवस्थित चालत नाही. तुमचा पार्टनर जर समजूतदार असेल, तर तुम्ही अनेक संकटावर मात करू शकता. समजूतदार नसेल तर उध्वस्त व्हायलाही वेळ लागत नाही.

माणसांमधील सर्वात महत्त्वाचा गुण कोणता असेल, तर तो प्रामाणिकपणा. माणसामध्ये प्रामाणिकपणा असेल, तर तो भावनिकरीत्या अधिक घट्ट जोडला जातो. तुमच्या पार्टनरमध्ये प्रामाणिकपणा असेल, तर तुम्ही लग्नाला होकार द्यायला हरकत नाही. मात्र जोडीदारामध्ये प्रामाणिकपणा नसेल, तर मात्र लग्नानंतर तुम्हाला अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

कोणत्याही नात्यात भावनेला प्रचंड महत्त्व आहे. भावनेशिवाय नातं टिकूच शकत नाही. एक वेळ एकमेकांविषयी प्रेम कमी असेल, तरी देखील नातं टिकू शकतं. मात्र नात्यांमध्ये भावना नसेल, तर नातं उध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. एकमेकांच्या भावना समजून घेतल्या तरच समस्यांचे निराकरण होते. मुलींमध्ये जर भावना नसतील, तर लग्न करताना विचार करा.

नात्यांमध्ये प्रेमापेक्षा सन्मानाला प्रचंड महत्त्व आहे. एक वेळ प्रेम नसेल, तरी देखील नातं टिकू शकतं. मात्र एकमेकांचा सन्मान होत नसेल, तर नातं अजिबात टिकू शकत नाही. एकमेकांचा सन्मान केल्याने प्रेमात ओलावा देखील टिकून राहतो. याबरोबरच तुम्ही कुटुंबातील आवडती व्यक्ती बनत असता. तुमचा वैवाहिक जोडीदार एकमेकांचा आदर करत असेल, तर तो उत्कृष्ट साथीदार बनू शकतो. मुलीमध्ये जर हा गुण असेल, तर तुम्ही लगेच होकार द्यायला हरकत नाही. मात्र मुलींमध्ये आदर हा गुण नसेल तर तुम्ही लग्न करताना विचार करा.

तुमची पत्नी स्वतंत्र विचाराची असेल, तर हरकत नाही. स्वतःच्या पायावर ती उभी राहू इच्छित असेल, तर तुम्ही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे. मात्र तुमची जी स्वप्न आहेत, ती स्वप्ने तुमच्या पत्नीची देखील असायला हवीत. तुमची स्वप्ने आपली आहेत, असं जर मुलीला वाटत असेल, तर तुम्ही लग्न करण्यास हरकत नाही.

ज्या माणसांचे रागावर नियंत्रण असतं, अशा लोकांना चांगल्या आणि वाईट गोष्टी समजत असतात. आणि म्हणून लग्न करताना तुम्ही या गुणाचा आवश्य विचार करायला हवा. एखाद्या मुलीमध्ये जर राग सहन करायची ताकद नसेल, तर अशा मुलींबरोबर लग्न करताना तुम्ही विचार करायला हवा. ज्या मुलींचं रागावर नियंत्रण नसतं अशा मुलींना योग्य आणि अयोग्य यातला फरक कळतोच असं नाही.

हे देखील वाचा RCB vs LSG: ..म्हणून सामना जिंकल्यानंतर गौतम गंभीरने दिल्या शिव्या, विराट सोबतही केले..; पाहा दोन्हीं व्हिडिओ..

Shikhar Dhawan Viral video: पहिल्याच भेटीत प्रेम, लगेच हॉटेलमध्ये घेऊन गेलो..; शिखर धवनच्या त्या व्हिडिओने खळबळ..

Dream11 Prediction: ड्रीम11 टीम बनवताना या चार गोष्टी विचारात घेतल्या तरच तुम्ही जिंकू शकता एक कोटी..

Honda Shine 100cc: मायलेज, किंमत, लूक्समध्ये Honda Shine 100cc ने Hero spender plus ला टाकले मागे; जाणून घ्या सविस्तर..

Post Office RD: फक्त दहा हजार गुंतवा, मिळेल 16 लाखांचा परतावा; होय ही आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना..

Viral video: महिलेसमोरच हस्तमैथुन करू लागला चिपांजी; महिला ओरडत राहिली तरीही थांबला नाही, पाहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.