Shikhar Dhawan Viral video: पहिल्याच भेटीत प्रेम, लगेच हॉटेलमध्ये घेऊन गेलो…; शिखर धवनच्या ‘त्या’ व्हिडिओने खळबळ..

0

Shikhar Dhawan Viral video: आयपीएल (IPL season 16) मध्ये शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वात पंजाब किग्स (Punjab kings) संघ उत्कृष्ट कामगिरी करतोय. शिखर धवन देखील कमालीचा फॉर्ममध्ये आहे. नऊ तारखेला झालेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात शिखरने नाबाद 99 धावांची झुंजार खेळी केली. शिखर धवनला इतर फलंदाजांची साथ मिळाली नसल्याने, पंजाब संघाला केवळ 143 धावा करता आल्या. सलग दोन सामन्याच्या विजयानंतर पंजाब संघाने तिसरा सामना गमावला. या दरम्यानच सोशल मीडियावर शिखर धवनचा एक अश्लील संभाषण असणारा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. (Shikhar Dhwan Video Leaked)

काय आहे व्हिडिओत?

शिखर धवनचा अश्लील संभाषण असणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. हा व्हिडिओ नक्की कसला आहे? या संदर्भात सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरू आहेत. शिखर धवनच्या चाहत्यांना देखील धक्का बसला असून, शिखर धवन असं कसं काय बोलू शकतो, यावर त्यांचा विश्वास बसत नसल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओत शिखर धवन आणि आणखी एक व्यक्ती मधील हे अश्लील संभाषण आहे.

सोशल मीडियावर (social media) व्हायरल झालेल्या व्हिडिओत (viral video) शिखर धवन एका पार्टी संदर्भात बोलत आहे. या व्हिडिओत शिखर धवन म्हणत आहे. मी दिल्लीमध्ये एका फार्म हाऊसवर असताना तिला भेटलो. भेटल्यानंतर मी पाहतच राहिलो. एवढेच नाही, तर मी लगेच तिच्याबरोबर जवळील देखील केली. समोरचा व्यक्ती शिखर धवनचे हे संभाषण कॅमेरात कैद करत आहे. शिखर धवनला या संदर्भात बोलतं करून विचारताना देखील या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

तीन दिवस एकत्र घालवले

समोरचा व्यक्ती शिखर धवनला विचारत आहे, लव्ह एट फर्स्ट साईट होतं तर. यावर शिखर धवन म्हणाला, हो अगदीच. शिखर धवन पुढे म्हणत आहे, मी तिला पाहिल्यानंतर पाहतच राहिलो. ऐकायला लागल्यानंतर ऐकतच राहिलो. शिखर धवन एवढ्यावरच थांबला नाही. तो म्हणाला, आम्ही दोन-तीन दिवस एकमेकांसोबत घालवले. पाठीमागचं सगळं विसरून मी मूव्हऑन झालो. इतकं बोलल्यानंतर शिखर धवनला समोरचा व्यक्ती रेकॉर्ड करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने फोन हिसकावून घेतला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ 45 सेकंदाचा आहे. शिखर धवन एका महिलेविषयी बोलत असल्याचं सोशल मीडियावर बोललं जाऊ लागलं आहे. या व्हिडिओ संदर्भातली अधिकृत पुष्टी अद्याप स्पष्ट झालेली नाही. गेल्या काही दिवसापूर्वी एका मुलाखतीमध्ये शिखरने आपल्या लग्नाविषयी देखील भाष्य केलं होतं. भविष्यात मी लग्न करताना मला कसा जोडीदार हवा आहे, याविषयी आज मी स्पष्ट आहे. मला लग्नाचा अनुभव नसल्याने, आमचा घटस्फोट झाल्याचे देखील शिखर धवन आजतकला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला होता.

हे देखील वाचा Dream11 Prediction: ड्रीम11 टीम बनवताना या चार गोष्टी विचारात घेतल्या तरच तुम्ही जिंकू शकता एक कोटी..

Free Silai Machine Yojana: महिलांना मिळतेय मोफत शिलाई मशीन; या पध्दतीने करा अर्ज..

Viral video: महिलेसमोरच हस्तमैथुन करू लागला चिपांजी; महिला ओरडत राहिली तरीही थांबला नाही, पाहा व्हिडिओ..

UPI Credit Payment: खात्यावर पैसे नसले तरीही UPI द्वारे करू शकता पेमेंट; जाणून घ्या रिझर्व्ह बँकेचा हा नवीन नियम..

Honda Shine 100cc: मायलेज, किंमत, लूक्समध्ये Honda Shine 100cc ने Hero spender plus ला टाकले मागे; जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.