UPI Credit Payment: खात्यावर पैसे नसले तरीही UPI द्वारे करू शकता पेमेंट; जाणून घ्या रिझर्व्ह बँकेचा हा नवीन नियम..

0

UPI Credit Payment: जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा उसने पैसे मागूनही कोणी देत नाही. अशावेळी मोठी पंचायत होते. मात्र आता तुमच्याकडे पैसे नसतील, तरीदेखील तुम्हाला यूपीआय द्वारे पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. होय तुम्ही बरोबर वाचले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या योजनेच्या नियमांतर्गत तुम्ही पैसे नसतानाही UPI द्वारे पेमेंट करू शकता. जाणून घेऊया सविस्तर.

रिझर्व्ह बँकेचे यासंदर्भात अनेक योजना जारी केल्या. त्यापैकीच एक म्हणजे युनिफाइड पेमेंट इंटरफेस. या सुविधेच्या माध्यमातून बँकांमध्ये प्री-सेक्शन क्रेडिट लाइन ऑपरेटची घोषणा आता रिझर्व्ह बँकेने केली आहे. ही एक अशी सुविधा आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे नसले तरी देखील पैसे इतरांना पाठवू शकता. म्हणजेच पेमेंट करू शकणार आहात. यासाठी तुमचे अकाऊंट केवळ UPI शी लिंक असणे आवश्यक आहे.

यासंदर्भात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी घोषणा केली आहे. या सुविधेच्या माध्यमातून नवीन ग्राहकांची संख्या देखील वाढणार आहे. शिवाय ग्राहकांना अडचणीचा सामना देखील करावा लागणार नाही. UPI मुळे भारतामधील पेमेंटची रूपरेषा बदलून गेली आहे. सातत्याने उत्पादने त्याचबरोबर वैशिष्ट्ये विकसित करण्याबाबत तसेच मजबूत UPI करण्याकरिता अनेक पावले उचलली आहेत. रुपे क्रेडिट कार्डला देखील यूपीआयशी लिंक करण्याची आता परवानगी मिळाली आहे.

अशी बदलणार पेमेंटची पद्धत

यापूर्वी ग्राहकांना आपल्या बँक खात्याला UPI लिंक करून इतरांना पैसे ट्रान्सफर, पेमेंट करता येत होते. मात्र आता या संदर्भात एक नियम जारी करून मोठी घोषणा केली आहे. ग्राहकांना बँकेत पैसे नसले तरी देखील आपल्या पेमेंट करण्याची सुविधा RBI कडून देण्यात आली आहे. या बरोबर रुपे क्रेडिट कार्डद्वारे देखील तुम्हाला बँकेत पैसे नसतील तरी देखील पेमेंट करता येणार आहे.

खात्यावर पैसे नसले तरी पेमेंट

आरबीआयने या संदर्भातला प्रस्ताव जारी केला आहे. या प्रस्तावाच्या अंमलबजावणीनंतर ग्राहकांच्या खात्यावर पैसे नसले तरी देखील पेमेंट करता येणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, यूपीआय नेटवर्कच्या माध्यमातून बँकांनी जे क्रेडिट कार्ड अदा केले आहे, त्याचा देखील वापर करता येणार आहे. या सोबतच यूपीआय क्रेडिट लाईनची सुविधा देखील पेमेंट करिता उपलब्ध असणार आहे. साहजिकच यामुळे ग्राहकांना क्रेडिट कार्ड (credit card) जवळ बाळगण्याची आवश्यकता नसणार आहे. आरबीआय या संदर्भात सविस्तर माहिती जारी करणार आहे.

काय आहे UPI क्रेडिट लाइन?

आरबीआयने या सुविधेची ची घोषणा केली आहे या संदर्भात बोलताना गव्हर्नर टी रविशंकर यांनी स्पष्ट केले, लोकांना आता क्रेडिट कार्ड जवळ वापरण्याच्या आवश्यकता नाही. या योजनेमुळे तुम्ही बँकेत पैसे नसतील, तरी देखील यूपीआयच्या माध्यमातून क्रेडिट लाइन योजनेचा वापर म्हणजेच पेमेंट करू शकता.

हे देखील वाचा PAN-Aadhaar Linking: जाणून घ्या PAN-Aadhaar Link आहे की नाही? नसेल तर लगेच जोडा या सोप्या पद्धतीने..

UPI Payment Charges: Google pay, phone pay वापरकर्त्यांचा झाला सत्यानाश; 1 एप्रिपासून तब्बल इतके रुपये शुल्क आकारला जाणार..

MI vs CSK: या तीन कारणामुळे मुंबई इंडियन्सचा उडणार धुव्वा; जाणून घ्या धोनीचा मास्टर प्लॅन..

Dhanashree Verma story: चहलच्या पत्नीची पुन्हा श्रेयस अय्यर सोबत मौज मस्ती; व्हायरल व्हिडिओने खळबळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.