Dhanashree Verma story: चहलच्या पत्नीची पुन्हा श्रेयस अय्यर सोबत मौज मस्ती; व्हायरल व्हिडिओने खळबळ..

0

Dhanashree Verma story: भारताचा स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) राजस्थान रॉयल्स (rajsthan royals) संघाकडून उत्कृष्ट कामगिरी करत आहे. संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलत आहे. आयपीएलच्या सोळाव्या (IPL season 16) हंगामातही चहल सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. दरवर्षी चहलची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) चहलला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असते. मात्र यावर्षी आपल्या पतीला सपोर्ट करण्याऐवजी श्रेयस अय्यर (shreyas iyer) सोबत मौज मस्ती करताना पाहायला मिळत आहे.

दुखापतीमुळे आयपीएलच्या सोळाव्या हंगामामध्ये श्रेयस अय्यर खेळू शकणार नाही. सध्या श्रेयस अय्यर सुट्टीचा आनंद घेत असल्याचा पाहायला मिळत आहे. त्याच्या या आनंदात चहलची पत्नी देखील आहे. यासंदर्भातली स्टोरी धनश्री वर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट केल्याने सोशल मीडियावर पुन्हा एकदा धनश्री वर्मा आणि श्रेयस अय्यर जोरदार ट्रोल होताना पाहायला मिळत आहेत.

श्रेयशमुळे धनश्री वर्मा चहलच्या नात्यात दुरावा देखील आल्याच्या बातम्या गेल्या काही महिन्यापूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. एवढेच नाही तर, धनश्रीने आपला इंस्टाग्राम अकाउंट वरून चहल हे आडनाव देखील काढून टाकले होते. याशिवाय चहने देखील आजपासून नवीन आयुष्याची सुरूवात अशी स्टोरी आपल्या इंस्टाग्रामवर ठेवली होती. सूर्यकुमार यादवच्या घरी डिनर पार्टीसाठी चहलची पत्नी धनश्री वर्मा आणि श्रेयस अय्यर पोहोचले होते.

सूर्यकुमार यादवने ठेवलेल्या डिनर पार्टीमध्ये धनश्री वर्मा आणि श्रेयस अय्यर चहलच्या अनुपस्थितीत पोहोचल्याने चहल आणि धनश्री या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. मात्र धनश्री वर्माने या बातमीचं खंडन करताना आम्ही दोघेही खुश असल्याचं सांगितलं. या घटनेनंतर पुन्हा एकदा शार्दुल ठाकूरच्या लग्नामध्ये देखील या दोघांना एकत्र फोटोमध्ये पाहण्यात आले होते.

आता पुन्हा एकदा इफ्तार पार्टी मधील काही फोटो धनश्री वर्माने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर ठेवले आहेत. या फोटोमध्ये तिच्याबरोबर श्रेयस अय्यर देखील पाहायला मिळत आहे. आता या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहिल्यामुळे हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. आपल्या इंस्टाग्राम अकाउंट स्टोरी वरून धनश्रीने इफ्तार पार्टीमधील फक्त फोटो पोस्ट केल्याने या चर्चा होत नाहीत तर या फोटोला कॅप्शन देखील भन्नाट दिल्याने, या चर्चा जर धरू लागल्या आहेत. तिने “माय क्यूटीज’’ असं कॅप्शन दिले आहे.

https://instagram.com/stories/dhanashree9/3076171189788777344?igshid=MDJmNzVkMjY=

धनश्री वर्माने श्रेयस अय्यर सोबतचे काही फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर ठेवले, आणि त्याला माय क्यूटीज’’ असं कॅप्शन दिले. अर्थात या कॅप्शन मुळे त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांमध्ये दोघेही तिसऱ्यांदा एकत्र आले आहेत. साहजिकच यामुळे हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगल्या आहेत. धनश्री चहलला धोका देत आहे. चहल बिचारा तिकडे मॅच खेळण्यात दंग आहे. आणि ही श्रेयस अय्यर सोबत मौज मस्तीत दंग आहे. अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

हे देखील वाचा MI vs CSK: या तीन कारणामुळे मुंबई इंडियन्सचा उडणार धुव्वा; जाणून घ्या धोनीचा मास्टर प्लॅन..

Free OTT platform: या पध्दतीने लॉगिन केल्यास Amazon Prime, Disney+Hotstar सब्सक्रिप्शन मिळतंय मोफत; जाणून घ्या प्रोसेस..

IRCTC Recruitment 2023: B.Sc उत्तीर्ण आहात, असा करा अर्ज नोकरी मिळेल हमखास..

PAN-Aadhaar Linking: जाणून घ्या PAN-Aadhaar Link आहे की नाही? नसेल तर लगेच जोडा या सोप्या पद्धतीने..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.