IRCTC Recruitment 2023: B.Sc उत्तीर्ण आहात, असा करा अर्ज नोकरी मिळेल हमखास..

0

IRCTC Recruitment 2023: महागाई बरोबर बेरोजगारी (inflation and unemployment) मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आता नोकरी (nokari) करणे खूप आवश्यक बनलं आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा असेल, तर आता तुमच्या हातात काम असणं खूप आवश्यक बनलं आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती दिवसेंदिवस महाग होत असल्याने, सर्वसामान्यांच्या रोजच्या खर्चामध्ये भर पडली आहे. कुटुंबाचे उत्पन्न आता अधिक असणं गरजेच आहे. मात्र बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असली तरी आता काही विभागांमध्ये नोकरीच्या संधी देखील उपलब्ध होत आहेत. जर तुम्ही B.Sc उत्तीर्ण असाल, तर तुमच्यासाठी ही मोठी संधी आहे.

भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) अंतर्गत बीएससी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती निघाली असून, यासंदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार असून 11 आणि 12 एप्रिलला ही मुलाखत पार पडणार आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) अंतर्गत एकूण 61 रिक्त पदे भरली जाणार आहेत. जाणून घेऊया या भरती विषयी सविस्तर.

या पदासाठी होणार भरती

भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) अंतर्गत ”हॉस्पिटॅलिटी मॉनिटर” या पदासाठी ही भरती होणार आहे. आता आपण हॉस्पिटॅलिटी मॉनिटर या पदासाठी होणाऱ्या भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता काय निश्चित करण्यात आली आहे? हे सविस्तर जाणून घेऊ.

शैक्षणिक पात्रता:

“भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (IRCTC) जर तुम्ही नोकरी करू इच्छित असाल, तर तुमच्याकडे B.Sc पदवी असणे आवश्यक आहे. यामध्ये हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल एडमिनिस्ट्रेशन केलेले असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जर तुमचे BBA असणे आवश्यक आहे.

जर तुमचे MBA पूर्ण असेल, तरी देखील तुम्हाला नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. यामध्ये हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग सायन्स पदवी संपादन केलेली असणे आवश्यक आहे. जर तुम्ही टूरिज्म आणि हॉटेल मॅनेजमेंटमधून M.B.A केलेले असेल, तरी देखील तुम्हाला अर्ज करता येणार आहे. वरील सर्व पदांचा किमान 02 वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा

भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (IRCTC) नोकरी करण्यासाठी उमेदवारांना वयोमर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. 28 मार्च 2023 रोजी उमेदवारांचे कमाल वय 28 वर्ष असणे आवश्यक आहे. जर तुम्ही एससी आणि एसटी या प्रवर्गातून अर्ज करणार असाल, तर तुम्हाला पाच वर्षाच्या अतिरिक्त सूट दिली जाणार आहे. जर तुम्ही ओबीसी प्रवर्गातून अर्ज करणार असाल, तर तुम्हाला तीन वर्षाची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे.

परीक्षा फी आणि पगार

भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (IRCTC) अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. पगाराविषयी जाणून घ्यायचे झाल्यास, तुम्हाला दरमहा 30,000 रुपये पगार मिळणार आहे. दैनंदिन भत्ता म्हणून तुम्हाला साडेतीनशे रुपये दिले जाणार आहेत. जर तुम्ही बाहेरगावी मुक्कामी असाल तर तुम्हाला निवासाचे देखील 240 रुपये मिळणार आहेत. तुम्ही मुक्काम करणार असाल, तरच हे पैसे दिले जाणार आहेत. वैद्यकीय विमा म्हणून तुम्हाला दरमहा आठशे रुपये दिले जाणार आहेत. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात असणार आहे.

निवड पद्धत

भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (IRCTC) अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे होणार होणार आहे. 11 आणि 12 एप्रिल रोजी मुलाखती होणार आहेत. उमेदवारांनी खालील पत्त्यावर त हजर राहायचे आहे.

मुलाखतीचा पत्ता:

इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IHM) IHMCTAN, वीर सावरकर मार्ग, दादर (प), मुंबई 400028, अधिकृत वेबसाईट जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा

हे देखील वाचा KKR vs RCB: शाहरुखने विराटला अस्मान दाखवल्यानंतर सगळ्यांसमोर केले किस; पाहा व्हिडिओ..

PAN Card: पॅन कार्ड हरवलंय? सोडून द्या चिंता! घरबसल्या असा  करा ऑनलाईन अर्ज मिळून जाईल पॅन कार्ड..

CRPF Recruitment 2023: CRPF मध्ये तब्बल 1 लाख 30 हजार पदांची मेगा भरती; 10+12 पोरांनो लगेच जाणून घ्या अपडेट..

Gold Rates Today: ..म्हणून सोन्याने गाठला उच्चांक; या नंबरवर द्या मिस्ड कॉल, अन् जाणून घ्या सोन्याचे दर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.