KKR vs RCB: शाहरुखने विराटला अस्मान दाखवल्यानंतर सगळ्यांसमोर केले किस; पाहा व्हिडिओ..

0

KKR vs RCB: काल आयपीएल सिझन १६ चा नववा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये ईडन गार्डन मैदानावर पार पडला. (RCB vs KKR) पहिल्या सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सचा एकतर्फी पराभव केला. आरसीबीच्या दोन्हीं सलामीवीरांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाची पळता भुई थोडी केली. या आयपीएलमध्ये आरसीबीकडे सर्वात आक्रमक आणि आश्वासक सलामी जोडी असल्याचे बोलले जाऊ लागले. मात्र दुसऱ्याच सामन्यात आरसीबीचे सलामीवीर विराट कोहली (Virat kohli) आणि फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) दोघांनीही नांग्या टाकल्या. (Virat Kohli Shahrukh Khan dance video)

रॉयल चॅलेंजर बंगलोर संघाच्या कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या गोलंदाजांनी सुरुवात देखील चांगली केली.‌ मात्र गेल्या अनेक वर्षांपासून रॉयल चॅलेंजर बेंगलोरची डेथ ओव्हरची डोकेदुखी कालच्या सामन्यातही पाहायला मिळाली. एकवेळ कोलकत्ता नाईट रायडर्स संघाची अवस्था ११.३ षटकात पाच बाद ८९ अशी झाली होती.

मात्र त्यानंतर लॉर्ड ठाकूर म्हणून परिचित असणारा शार्दुल ठाकूर (shardul Thakur) नावाचा वादळ ईडन गार्डनवर घोंघावलं. शार्दुल ठाकूरने केलेल्या वादळी खेळापुढे बेंगलोरचे गोलंदाज हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. शार्दुलने केवळ 29 चेंडूचा सामना करताना 68 धावांची वादळी खेळी केली. शार्दुलच्या खेळामुळे कोलकत्ता नाईट रायडरने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघापुढे २०५ धावांचं आव्हान उभा केलं.

बेंगलोरच्या दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या सामन्यात प्रतिस्पर्धींना धडकी भरवणाऱ्या खेळ्या केल्या होत्या. मात्र या सामन्यात दोन्हीं सलामीवीर फिरकीच्या जाळ्यात अडकले. रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाचा एक इतिहास राहिला आहे, प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर हा संघ सामन्यात पुन्हा जिवंत होत नाही. काल देखील याचीच पुनरावृत्ती झाली. कोलकत्ता नाइट रायडर्स संघाच्या फिरकीपटूंनी एका पाठोपाठ एक धक्के देत, रॉयल चॅलेंजर बंगलोर संघाला 20 षटके देखील खेळू दिले नाही. बेंगलोरचा संपूर्ण संघ १२३ धावांत गारद झाला.

ईडन गार्डनच्या मैदानावर (Eden gardens) सामना पाहण्यासाठी कोलकत्ता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खान (shahrukh khan) देखील उपस्थित होता. आपल्या मुली (Suhana Khan) सोबत त्याने हा सामना पाहण्यासाठी हजेरी लावली होती. साहजिकच यामुळे खेळाडूंना एक नवी ऊर्जा मिळाल्याचं पाहायला मिळालं. कोलकत्ता नाईट रायडर्स संघाने हा सामना 81 धावांनी जिंकल्यानंतर, प्रेझेंटेशन कार्यक्रमात विराट कोहली आणि शाहरुख खान आमने-सामने आले. (Virat Kohli Shahrukh Khan video)

विराट कोहलीला पाहताच शाहरुख खानने विराट कोहलीकडे धाव घेत मिठी मारली. दोघांचे एकमेकांविषयी असणारा सन्मान पाहून मैदानावर उपस्थित असणाऱ्या चाहत्यांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे. शाहरुख खानने विराट कोहलीला मिठी मारल्यानंतर, प्रेमाने त्याच्या गालावरुन हात देखील फिरवण्याचा पाहायला मिळत आहे. एवढेच नाही, तर शाहरुख खानने विराट कोहलीच्या हातावर किस देखील केल्याचं तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता.

हे देखील वाचा Gold Rates Today: ..म्हणून सोन्याने गाठला उच्चांक; या नंबरवर द्या मिस्ड कॉल, अन् जाणून घ्या सोन्याचे दर..

RR vs PBKS: ही एक चूक आणि या एका खेळाडूमुळे राजस्थान रॉयल्सने गमावला सामना..

Wedding viral video: स्टंटबाजीच्या नादात नवरीचा सुंदर चेहरा झटक्यात जळाला; पाहा व्हिडिओ..

CRPF Recruitment 2023: CRPF मध्ये तब्बल 1 लाख 30 हजार पदांची मेगा भरती; 10+12 पोरांनो लगेच जाणून घ्या अपडेट..

OnePlus Nord CE3 lite: OnePlus चा खतरनाक स्मार्टफोन लॉन्च; 108MP कॅमेरा असणारा फोन केवळ 20 हजारात..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.