Wedding viral video: स्टंटबाजीच्या नादात नवरीचा सुंदर चेहरा झटक्यात जळाला; पाहा व्हिडिओ..

0

Wedding viral video: लग्न (marriage) हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप आनंदाचा आणि महत्त्वाचा क्षण असतो. प्रत्येकाला आपलं लग्न हे इतरांपेक्षा वेगळं आणि ऐतिहासिक व्हावं असं प्रत्येकाला वाटत असते. संपूर्ण लग्नात सर्वात आनंदी आणि समाधानी कोण असेल तर ते अर्थात नवरा-नवरी असतात. मात्र सोशल मीडियावर (social media) एका लग्नातला असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हाला धक्का तर बसेलच. मात्र या नवरा नवरीच्या आयुष्यात लग्न पूर्ण होत नाही, तोवरच अंधार पडला आहे.

अलीकडे लग्नाची व्याख्या विस्तृत होताना दिसत आहे. लग्नापूर्वी नवरा नवरी प्री-वेडिंग शूट (Pre wedding shoot) मोठ्या प्रमाणात करतात. आपलं लग्न हे ऐतिहासिक व्हावं, अविस्मरणीय क्षण आनंदाच्या माध्यमातून टिपता यावेत, यासाठी अनेक जण व्हिडिओग्राफीवर जोर देताना दिसून येतात. वेगवेगळ्या पोज आणि स्टंट देखील केले जातात. हे देखील अलीकडच्या काळात वारंवार पाहायला मिळत आहे. मात्र एका लग्नात नवरा-नवरीला हा एक स्टंट चांगलाच महागात पडला असून नवरीचा थेट चेहराच जळाला आहे.

सोशल मीडियावर (social media) नवरा नवरीचा स्टेज वरचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. फोटोशूट करण्याच्या नादात नवरा नवरी दोघेही हातामध्ये स्पार्कल गन घेऊन पोझ देत होते. फोटो काढण्याच्या नादात दोघेही दंग होते. मात्र या दोघांना पुढच्या काही सेकंदांमध्ये आपल्यावर काळाचा असा काही घाला येणार आहे, याची कल्पनाही नव्हती.

काय घडलं नेमकं?

सोशल मीडियावर एक नवरा नवरीचा व्हायरल झालेला व्हिडिओ महाराष्ट्रातील असल्याचं सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, नवरा-नवरी स्टेजवर प्रचंड आनंदामध्ये फोटो काढण्यासाठी पोज देत आहेत. दोघांनीही हातामध्ये स्पार्कल गन घेतली आहे. दोघांनीही एकमेकांच्या विरुद्ध दिशेने तोंड करत स्पार्कल गन चालू केली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, स्पार्कल गन चालू केल्यानंतर काही सेकंदामध्ये नवरीच्या हातातील स्पार्कल गनमध्ये बिघाड झाला. स्पार्कल गनमध्ये बिघाड झाल्यामुळे, स्पार्कल गनमधून आग थेट नवरीच्या चेहऱ्यावर उडाली. आणि क्षणात आनंदी सोहळ्याचे रूपांतर एका काळ्या सोहळ्यात झाले.

स्पार्कल गनमधून आग थेट नवरीच्या चेहऱ्यावर आल्याने, क्षणात काय झालं हे कोणालाही कळाले नाही. नवरीने हातामधील स्पार्कल गन फेकून दिली. नवऱ्याने लगेच नवरीच्या मदतीसाठी धाव घेतली. मात्र हा व्हिडिओ काही सेकंदातशचा असल्याने पुढे काय झालं? हे काही कळले नाही. हा व्हिडिओ आतापर्यंत दीड लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी नवरी विषयी हळहळ व्यक्त केली आहे. तर काहींनी लग्न करणाऱ्या लोकांसाठी हे एक चांगलं उदाहरण असल्याचे म्हंटले आहे.

हे देखील वाचा Delhi Metro kiss: भर मेट्रोतच सुरू केला इम्रान हाश्मी स्टाईल kiss; एक मिनिट किस करूनही थांबायचं नाव घेत नव्हतं कपल..

OnePlus Nord CE3 lite: OnePlus चा खतरनाक स्मार्टफोन लॉन्च; 108MP कॅमेरा असणारा फोन केवळ 20 हजारात..

PAN Card: पॅन कार्ड हरवलंय? सोडून द्या चिंता! घरबसल्या असा करा ऑनलाईन अर्ज मिळून जाईल पॅन कार्ड..

Pushpa 2 Teaser: पुष्पाला शोधण्यासाठी धावाधाव, जाळपोळ; टीझरने प्रेक्षकांच्या मनात प्रश्नाचे काहूर, उत्सुकता शिगेला..

SSC CGL Recruitment 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये निघाली मेगा भरती; जाणून घ्या सविस्तर अन् असा  करा ऑनलाईन अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.