Pushpa 2 Teaser: पुष्पाला शोधण्यासाठी धावाधाव, जाळपोळ; टीझरने प्रेक्षकांच्या मनात प्रश्नाचे काहूर, उत्सुकता शिगेला..

0

Pushpa 2 Teaser: गेल्या काही वर्षापासून टॉलीवूड चित्रपटाने (tollywood movie) भारतातच नाही, तर जगभरात आपला डंका वाजवला आहे. टॉलीवूड चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत. दाक्षिणचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) कमालीचा लोकप्रिय अभिनेता आहे. फक्त दाक्षिणमध्येच नाही, तर संपूर्ण भारतात त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या पुष्पा: द राइज’ (Pushpa) या चित्रपटाने तर अक्षशः सर्वांनाच वेड लावले. आता पुष्पा: द राइज’ २ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. (Pushpa 2 Teaser realise)

पुष्पा: द राइज’ २ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, या चित्रपटात अल्लू अर्जुनचा लूक समोर आहे. हा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्याने प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्नांचे काहूर माजले असून, आता या चित्रपटाची उत्सुकता आणखीन वाढली आहे. या टीचर मधून चित्रपटाविषयी कमालीचा सस्पेन्स ठेवला आहे.

पुष्पा: द राइज’ २ या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुनचा लूक पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता खूप मोठ्या प्रमाणात असतानाच, चित्रपट निर्मात्यांनी या चित्रपटाविषयी टीझरच्या माध्यमातून आणखीन उत्सुकता वाढवली आहे. खरंतर दिग्दर्शक सुकुमार (sukumar) यांनी पुष्पा या चित्रपटाचा टिझर अजूनही प्रदर्शित केला नाही, या चित्रपटाचा संपूर्ण टीझर सात एप्रिलला रिलीज करण्यात येणार आहे.

मात्र या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने या चित्रपटाचा टिझर कसा प्रतीक्षेत ठेवता येईल, याचा विचार केला असून, संपूर्ण टीझरची एक झलक दाखवली आहे. यामध्ये पुष्पा एका तुरुंगातून सुटून फरार असल्याचे दाखवण्यात आले आहे. पुष्पा नक्की कुठे गेला? याविषयी कोणालाही माहीत नसून, यामुळे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याचे देखील या टीचरच्या झलक मधून दाखवण्यात आलं आहे.

सात एप्रिलला रिलीज करण्यात येणाऱ्या टीचरची पहिली झलक आज दाखवण्यात आली आहे. पुष्पा तिरुपती तुरुंगामधून बुलेट घेऊन फरार झाल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. पुष्पा नक्की फरार झाला कुठे? असा प्रश्न लोकांना पडला असून, लोक रस्त्यावर उतरल्याचं देखील या टीचरच्या झलकमधून दाखवण्यात आलं आहे. पुष्पा तुरुंगातून फरार झाल्याने आता अर्थातच पुष्पा आणि पोलिसांमध्ये घमासा रंगणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. प्रेक्षकांना आता सात एप्रिलची प्रतीक्षा असणार आहे.

हे देखील वाचा PAN Card: पॅन कार्ड हरवलंय? सोडून द्या चिंता! घरबसल्या असा करा ऑनलाईन अर्ज मिळून जाईल पॅन कार्ड..

PAN Card Apply: सात दिवसात घरपोच मिळवा पॅन कार्ड; जाणून घ्या ऑनलाईन अर्ज करण्याची ही सोपी पद्धत..

SSC CGL Recruitment 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये निघाली मेगा भरती; जाणून घ्या सविस्तर अन् असा करा ऑनलाईन अर्ज..

Mobile Aadhaar linking: आता आधार कार्डला सिमकार्ड लिंक करणे अनिवार्य; जाणून घ्या सिमकार्ड आधारशी लिंक करण्याची प्रोसेस..

PAN-Aadhaar Linking: जाणून घ्या PAN-Aadhaar Link आहे की नाही? नसेल तर लगेच जोडा या सोप्या पद्धतीने..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.