SSC CGL Recruitment 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये निघाली मेगा भरती; जाणून घ्या सविस्तर अन् ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज..

0

SSC CGL Recruitment 2023: जर तुम्ही सरकारी नोकरी (government job) करण्यासाठी इच्छुक असाल, आणि त्यासाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत (SSC CGL) बारावी आणि पदवीधर उमेदवारांसाठी मेगा भरती निघाली असून, या संदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 3 मे 2023 निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. जाणून घेऊया सविस्तर.

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत केल्या जाणाऱ्या भरतीसाठी अद्याप पदांची संख्या निश्चित करण्यात आली नाही. मात्र काही हजारांपेक्षा जास्त पदसंख्या भरण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे, एकूण 20 पदांसाठी ही पद भरती केली जाणार आहे. आता आपण कोण-कोणत्या पदासाठी ही भरती केली जाणार आहे? पदानुसार पात्रता काय निश्चित करण्यात आली आहे? उमेदवाराची शैक्षणिक पात्रता? निवड प्रक्रिया कशी असणार? हे सविस्तर जाणून घेऊ.

 या पदासाठी केली जाणार भरती

असिस्टंट ऑडिट ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर,आयकर निरीक्षक, असिस्टंट, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, एक्झिक्युटिव असिस्टंट, इस्पेक्टर, सब इंस्पेक्टर, असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर, अकाउंटेंट, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, डिविजनल अकाउंटेंट,

सब-इंस्पेक्टर, रिसर्च असिस्टंट वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, कर सहाय्यक, ऑडिटर, पोस्टल असिस्टंट, अकाउंटेंट, ज्युनियर अकाउंटेंट, उच्च श्रेणी लिपिक, वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक, सॉर्टिंग असिस्टंट, आता आपण पदानुसार शैक्षणिक पात्रता काय असणार आहे? जाणून घेऊ.

शैक्षणिक पात्रता

कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी” या पदासाठी उमेदवाराची पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच उमेदवार 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर गणितामध्ये उमेदवाराला किमान 60% गुण असणे आवश्यक आहेत. याशिवाय उमेदवाराने सांख्यिकीमध्ये कोणत्याही विषयात पदवी संपादन केलेली असणे आवश्यक आहे. इतर पदांसाठी उमेदवारांनी कोणत्याही शाखेमधून पदवी संपादन केलेली असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया: 

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत” केल्या जाणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया टियर १) टियर २) अशी परीक्षा पार पडणार आहे. यामध्ये टियर १) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, उमेदवारांना टियर २) परीक्षा द्यायची आहे. टियर १) परीक्षेची उत्तीर्ण यादी लावण्यासंदर्भात अद्याप तारका जाहीर करण्यात आल्या नाहीत.

अर्ज शुल्क

ओबीसी तसेच सर्वसाधारण प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रुपये परीक्षा शुल्क आकारले जाईल. मात्र अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती त्याचबरोबर दिव्यांग/ पीडब्ल्यूडी कर्मचारी/ माजी सैनिक आणि महिलांसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

वयोमर्यादा/ नोकरीचे ठिकाण

स्टाफ स्टाफ सिलेक्शन कमिशन” अंतर्गत केल्या जाणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा जाणून घेऊ. एक ऑगस्ट 2023 रोजी उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. एससी/ एसटी या उमेदवारांसाठी पाच वर्षाची अतिरिक्त सूट मिळणार आहे. तर ओबीसी प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना तीन वर्षाची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये नोकरी करावी लागणार आहे.

असा करा ऑनलाईन अर्ज 

या विभागाअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2023 संध्याकाळी 11 पर्यंत ठेवण्यात आली आहे. Tier-I ची परीक्षा जुलै २००२३ मध्ये होणार आहे. या परीक्षेचा निकाल आणि Tier-II साठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक नंतर सूचित करण्यात येणार आहे.

उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://ssc.nic.in/ असं सर्च करायचं आहे. त्यानंतर या विभागाची अधिकृत वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर, तुम्हाला सविस्तर अर्ज करता येणार आहे. या परीक्षेची जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

हे देखील वाचा Mobile Aadhaar linking: आता आधार कार्डला सिमकार्ड लिंक करणे अनिवार्य; जाणून घ्या सिमकार्ड आधारशी लिंक करण्याची प्रोसेस..

PAN Card Apply: सात दिवसात घरपोच मिळवा पॅन कार्ड; जाणून घ्या ऑनलाईन अर्ज करण्याची ही सोपी पद्धत..

PAN-Aadhaar Linking: जाणून घ्या PAN-Aadhaar Link आहे की नाही? नसेल तर लगेच जोडा या सोप्या पद्धतीने..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.