PAN Card Apply: सात दिवसात घरपोच मिळवा पॅन कार्ड; जाणून घ्या ऑनलाईन अर्ज करण्याची ही सोपी पद्धत..
PAN Card Apply: महत्त्वाच्या डॉक्युमेंट्स पैकी पॅन कार्ड (PAN Card) हे खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे. आर्थिक व्यवहार करण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. 50,000 पेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड असणे अनिवार्य करण्यात आले आहे. आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी सरकारने पॅन कार्डची निर्मिती केली आहे. आयकर विभागाकडून नागरिकांना पॅन कार्ड म्हणजेच, परमनंट अकाउंट नंबर दिला जातो. इन्कम टॅक्स भरण्यासाठी हा नंबर अनिवार्य असतो. जाणून घ्या PAN-Aadhaar Link आहे की नाही? नसेल तर लगेच जोडा या सोप्या पद्धतीने..
पॅन कार्ड हे फक्त आर्थिक व्यवहारासाठीच वापरले जाते, असे नाही. आता पॅन कार्डचा उपयोग महत्त्वाचं ओळखपत्र म्हणून देखील केला जातो. सरकारने नुकतेच पॅन कार्ड आपल्या आधारशी लिंक करण्याच्या सूचना केल्या होत्या. सुरुवातीला ही मुदत 31 मार्च देण्यात आली होती. मात्र आता सरकारने 30 जून पर्यंत ही मुदत वाढवून दिली आहे. अनेक जण आता आधार पॅन लिंक करत आहेत. मात्र अजूनही अनेकांनी पॅन कार्ड काढले नाही. तुम्ही देखील पॅन कार्ड काढले नसेल, तर या सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करून तुम्ही पॅन कार्ड बनवू शकता. जाणून घ्या आधार कार्डला रेशन कार्ड लिंक करण्याची ही सोपी ऑनलाइन पद्धत..
अर्ज करताना आवश्यक असणारी कागदपत्रे
अर्ज करताना तुमच्याकडे पॅन कार्ड काढण्यासाठी काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. यामध्ये तुमच्याकडे पासपोर्ट आकाराचे फोटो, आधार कार्ड, त्याचबरोबर मतदान ओळखपत्र, शाळेचा दाखला इत्यादी काही कागदपत्रे तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे. अर्ज करताना या कागदपत्रांना तुम्हाला स्कॅन करावं लागणार आहे.
असा करा घरबसल्या ऑनलाईन अर्ज
ऑनलाइन पॅन कार्डसाठी अर्ज करण्याकरता तुम्हाला सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील क्रोम वर जाऊन https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. आता तुम्हाला Application Type हा पर्याय निवडायचा आहे. नंतर तुम्हाला कॅटेगरी निवडायची आहे. समोर दिलेल्या पर्यायांमध्ये तुम्हाला तुमचं नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाकायचा आहे.
इथपर्यंत व्यवस्थित प्रोसेस झाल्यानंतर, तुम्हाला terms and conditions मान्य आहेत. यासाठी क्लिक करायचं आहे. तुम्ही ॲग्री केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर Captcha या रकान्यात कॅपच्या कोड टाकायचा आहे. कॅपच्या कोड टाकल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल. या पेजवर तुम्हाला “acknowledgement” क्रमांक पाहायला मिळेल. आता तुम्हाला यामध्ये सर्व कागदपत्रांची एक फोटोकॉपी सबमिट करायची आहे. याशिवाय तुम्ही National Securities Depository विभागला पोस्टाद्वारे देखील पाठवू शकता.
पॅन कार्ड काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, तुम्हाला पॅन कार्ड तुमच्या पत्त्यावर घरपोच मिळेल. यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षत घ्यायची आहे, पॅन कार्डसाठी आवश्यक असणारी सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित भरणे आवश्यक आहे. अर्जामध्ये काही त्रुटी असेल, तर तुम्हाला पॅन कार्ड मिळणार नाही. मात्र तुम्ही तुम्ही केलेल्या अर्जाची स्थिती तपासू शकता. यासाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला १५ आकडी एक्नोलेजमेंट क्रमांक देण्यात येतो. त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता.
हे देखील वाचा CSK vs GT: पहिल्याच सामन्याला गालबोट; म्हणून गुजरात विरुद्ध चेन्नई सामना होणार रद्द..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम