Samsung Smartphone: 9,500 रुपयात सॅमसंगचा 8 GB रॅम आणि 50 MP ट्रिपल कॅमेरा फोन; जाणून घ्या कुठे चालू आहे ऑफर..

0

Samsung Smartphone: प्रत्येकाला कमी किंमतीत दर्जेदार स्मार्टफोन हवा असतो. खासकरून दर्जेदार कॅमेरा ही प्रत्येकाची पसंत असते. जर तुम्ही देखील कमी किंमतीत दर्जेदार स्मार्टफोनच्या शोधात असाल, तर तुमचा शोध या ठिकाणी पूर्ण होणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सॅमसंगने बाजारात खूप मोठे नाव कमावले आहे. सॅमसंग हा स्मार्टफोन अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. जर तुम्ही देखील सॅमसंगच्या एका चांगल्या स्मार्टफोनच्या शोधात असाल आणि तुमचे बजेट कमी असेल, तर तुमचा शोध या ठिकाणी पूर्ण होणार आहे.

अमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) या दोन्ही ई-कॉमर्स वेबसाईटवर स्मार्टफोन खरेदीवर कमालीचा डिस्काउंट दिला जातो. अनेकजण या दोनच ई-कॉमर्स वेबसाईटवर स्मार्टफोन खरेदी करताना दिसून येतात. आता पुन्हा एकदा तुम्हाला Samsung galaxy M13 हा स्मार्टफोन केवळ साडेनऊ हजार रुपयात खरेदी करता येत आहे. 6000 mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा असणारा हा स्मार्टफोन अमेझॉन या वेबसाईटवर केवळ 9 हजार 699 रुपयात खरेदी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. जाणून घेऊया सविस्तर.

अशी आहे ऑफर

Samsung galaxy M13 या स्मार्टफोनची मूळ किंमत 14 हजार 999 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला 40जीबी रॅम आणि 64 gb स्टोरेज व्हेरीएंट मिळते. मात्र ॲमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटवर या फोन खरेदीवर तुम्हाला तब्बल 35 टक्के डिस्काउंट ठेवण्यात आला आहे. जर तुम्ही या ऑफरचा लाभ घेतला तर तुम्हाला हा फोन केवळ 9699 रुपयात खरेदी करता येणार आहे. याशिवाय जर तुम्ही एक्स्चेंज ऑफर्सचा लाभ घेतला, तर तुम्हाला तब्बल नऊ हजार दोनशे रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो.

फीचर्स

Samsung galaxy M13 या स्मार्टफोनच्या फीचर्स विषयी जाणून घ्यायचे झाल्यास, बजेटच्या तुलनेत हा फोन कमालीचा दमदार आहे. गेल्या वर्षभरात या फोनची विक्रमी ऑनलाईन विक्री झाली आहे. डिस्प्ले विषयी बोलायचं झालं, तर या फोनचा डिस्प्ले 6.6 इंच HD+LCD infinity O Display देण्यात आला आहे. जो सर्वोत्तम मानला जातो.

प्रोसेसर विषयी बोलायचं झालं, तर या स्मार्टफोनचा प्रोसेसर देखील दमदार आहे. Exynos 850 असा प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 12 आधारित काम करतो. हा स्मार्टफोन 4GB रॅम आणि 64 GB स्टोरेजचा असला तरी तुम्ही याला SD कार्डच्या माध्यमातून तब्बल 8GB आणि 1TB पर्यंत वाढवू शकता.

कॅमेरा

या स्मार्टफोनला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50 MP चा प्रायमरी कॅमेरा 5MPचा अल्ट्रावाइड सेन्सर, 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी या स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा 8MP देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या स्मार्टफोनची बॅटरी तब्बल 6000mAH असणार आहे. चार्जिंग सपोर्टसाठी 15w चार्जर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा PAN-Aadhaar Linking: जाणून घ्या PAN-Aadhaar Link आहे की नाही? नसेल तर लगेच जोडा या सोप्या पद्धतीने..

Aadhaar-Ration card linking: जाणून घ्या आधार कार्डला रेशन कार्ड लिंक करण्याची ही सोपी ऑनलाइन पद्धत..

UPI Payment Charges: Google pay, phone pay वापरकर्त्यांचा झाला सत्यानाश; 1 एप्रिपासून तब्बल इतके रुपये शुल्क आकारला जाणार..

Cash limit at home: घरात फक्त इतकाच कॅश ठेऊ शकता; दिवसात कोणाकडूनही या पेक्षा जास्त रक्कम घेऊ शकत नाही..

Delhi Capitals: IPL 2023 मध्ये Delhi capitals विजेता पदाची प्रमुख दावेदार; जाणून घ्या जमेच्या बाजू आणि प्लेइंग इलेव्हन..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.