Cash limit at home: घरात फक्त ‘इतकाच’ कॅश ठेऊ शकता; दिवसात कोणाकडूनही ‘या’पेक्षा जास्त रक्कम घेऊ शकत नाही..

0

Cash limit at home: डिजिटल व्यवहार (digital payment) सुरू व्हायच्या अगोदर भारतात पूर्वी घरात खूप मोठी रक्कम ठेवली जायची. आता डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असले तरी अद्याप काही कुटुंबीय अजूनही घरांमध्ये खूप मोठी रक्कम ठेवतात. जर तुम्हाला देखील घरामध्ये पैसे ठेवायची सवय असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सामान्य नागरिक घरामध्ये किती रक्कम ठेवू शकतात? त्या संदर्भात कायदा आहे? हे प्रत्येकाला माहीत असायला हवं. अन्यथा तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते.

पूर्वी डिजिटल पेमेंटच्या सुविधा नसल्यामुळे प्रत्येकाकडे मोठ्या प्रमाणात कॅश पाहिला मिळत होती. ऐनवेळी पैशाची कधी गरज भासेल, वेळ कधीही सांगून येईल हे माहीत नसल्याने साहजिकच प्रत्येक जण घरात मोठ्या प्रमाणात कॅश ठेवत होता. मात्र आता UPI मुळे कधीही, कोणालाही, आणि कुठेही अवघ्या काही सेकंदात पैसे ट्रान्सफर करता येतात. त्यामुळे जवळ कॅश बाळगण्याची फारशी तशी आवश्यकता भासत नाही. पण अजूनही काही जणांना घरात मोठ्या प्रमाणात कॅश ठेवायची सवय असते. अशा लोकांना आयकर विभागाचा नियम माहिती असणे आवश्यक आहे. जाणून घेऊया या नियमा विषयी सविस्तर.

प्राप्तिकर कायद्या अंतर्गत तुमच्या घरामध्ये किती पैसे असायला हवे, याला काही प्रतिबंध ठेवण्यात आला नाही. मात्र जर तुमच्या घरात प्राप्तिकर विभागाचा (Income Tax Department) छापा पडला, तर तुम्हाला या पैशाचा स्त्रोत कागदपत्रानुसार द्यावा लागतो. तुमच्याकडे असणारे पैसे हे बेहीसोबी उत्पन्नातून कमावलेले नसणे आवश्यक आहे. तुमचे उत्पन्न आणि कागदपत्र यांचा जर ताळमेळ लागत नसेल, तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तुमच्याकडे असणारी मालमत्ता देखील जप्त केली जाते. शिवाय एकूण रकमेच्या 137% पर्यंत तुम्हाला दंड केला जाऊ शकतो.

हे नियम माहीत असायला हवे

कुठल्याही कर्जाकरिता तसेच ठेविकरिता तुम्ही वीस हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम स्वीकारू शकत नाही. यामध्ये तुमच्या स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणबाबत देखील हाच नियम लागू केला गेला आहे. त्याचबरोबर एका आर्थिक वर्षांमध्ये तुमचे वीस लाखांपेक्षा अधिक रोखीचे व्यवहार बेहीशोबी असतील, म्हणजेच कोणत्याही स्त्रोताशिवाय तुम्ही व्यवहार केला असेल, तर तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या नियमानुसार एकाचवेळी तुम्ही ५० हजार रक्कम बँकेत काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी जात असाल, तर तुमच्याकडे पॅन क्रमांक आवश्यक आहे. तो तुम्हाला बँकेत द्यावा लागतो. या माध्यमातून तुमच्या अकाउंटवर प्राप्तिकर विभाग लक्ष ठेवून राहते. जर तुम्ही एका आर्थिक वर्षांमध्ये वीस लाख रुपये जमा केले, किंवा काढले तर तुम्हाला पॅन कार्ड आणि आधारची देखील माहिती दाखवावी लागते.

एका दिवसात फक्त इतक्याच रक्कमेची देवाण-घेवाण

जर तुम्ही क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या मदतीने एकाचवेळी एक लाख रुपयांपेक्षा जास्त पेमेंट भरल्यास तुम्हाला चौकशीला सामोरे जावे लागू शकते. त्याबरोबरच तुम्हाला नातेवाईक किंवा मित्र कंपनीकडून एका दिवसांत दोन लाख किंवा त्याहून अधिक रक्कम कॅशच्या माध्यमातून घेता येत नाही. दोन लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम घेण्यास कायद्याने मनाई आहे. यासाठी तुम्हाला बँकेच्या माध्यमातून व्यवहार करावा लागतो.

हे देखील वाचा PAN-Aadhaar Linking: जाणून घ्या PAN-Aadhaar Link आहे की नाही? नसेल तर लगेच जोडा या सोप्या पद्धतीने..

Delhi Capitals: IPL 2023 मध्ये Delhi capitals विजेता पदाची प्रमुख दावेदार; जाणून घ्या जमेच्या बाजू आणि प्लेइंग इलेव्हन..

UPI Payment Charges: Google pay, phone pay वापरकर्त्यांचा झाला सत्यानाश; 1 एप्रिपासून तब्बल इतके रुपये शुल्क आकारला जाणार..

Onion Subsidy: एका क्विंटलसाठी 350 रुपये अनुदान; कांद्याच्या अनुदानासाठी असा करा अर्ज..

Business Idea: एकदाच गुंतवणूक करून वर्षाला कमवा लाखो रुपये; जाणून घ्या या जबरदस्त व्यवसाय विषयी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.