Business Idea: एकदाच गुंतवणूक करून वर्षाला कमवा लाखो रुपये; जाणून घ्या या जबरदस्त व्यवसाय विषयी..

0

Business Idea: नोकरी (nokari) करणे अलीकडच्या काळात खूप मोठं आव्हान आहे. बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात असल्याने आता प्रत्येकाला नोकरी मिळेल, याची कोणतीही शास्वती राहिली नाही. साहजिकच यामुळे अलीकडच्या काळात व्यवसाय उपजीविकेचा सर्वोत्तम मार्ग बनला आहे. शिवाय व्यवसायामुळे कुटुंबातील इतर सदस्यांना देखील स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत होते. जर तुमच्याकडे शेती असेल, तर तुमच्यासाठी हा व्यवसाय सोन्याची अंदी देणारा कोंबडी सारखा आहे.

जर तुमच्याकडे शेती असेल, तर तुम्ही चंदनाची शेती (Sandal farming) करून वर्षाला लाखो रुपये कमवू शकता. चंदनाच्या शेतीला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यापासून अनेक सौंदर्यप्रसाधने बनवली जातात. चंदनापासून सुगंधी साबण, अगरबत्ती, परफ्युम यासारखे अनेक सुगंधित प्रसाधने बनवली जातात. देशातच नाही, तर जगभरात या व्यवसायाला मोठी मागणी आहे.

चंदनाची शेती करायला परवानगी नसली तरी देखील सरकारच्या परवानगीने तुम्ही चंदनाची शेती करू शकता. जगात सर्वात महागडे लाकूड म्हणून चंदनाकडे पाहिला जाते. तुम्हाला फक्त एकदा गुंतवणूक करायची आहे, नंतर तुम्हाला चंदनाच्या झाडापासून बक्कळ पैसा कमवता येऊ शकतो. चंदनाचे झाड तयार व्हायला दहा ते पंधरा वर्षे लागतात. मात्र एकदा तुम्ही लावलेली झाडे मोठी झाली, तर त्याच्या माध्यमातून तुम्ही खूप पैसा कमवू शकता. एका झाडापासून वर्षाला पाच लाख रुपये उत्पन्न मिळते.

चंदनाची लागवड कशी करावी?

चंदनाची लागवड करण्यासाठी तुम्हाला शेती तर आवश्यक आहेच. मात्र शेतीबरोबर तुम्ही चंदनाची दोन प्रकारे लागवड करू शकता. यामध्ये सेंद्रिय आणि पारंपरिक शेती पद्धतीचा समावेश आहे. जर तुम्ही सेंद्रिय पद्धतीने शेती केली, तर चंदनाचे एक झाड तयार व्हायला तुम्हाला दहा ते पंधरा वर्षे कालावधी लागतो. तर पारंपरिक पद्धतीने तुम्ही झाडाचे संगोपन केले, तर सुमारे वीस ते पंचवीस वर्ष इतका कालावधी लागतो.

सगोपणाची काळजी

चंदनाची शेती करण्यासाठी तुम्हाला संगोपनाची विशेष काळजी घ्यावी लागते. सुरुवातीचे आठ ते नऊ वर्ष या झाडांना कोणत्याही बाह्य संरक्षणाची गरज पडत नाही. नंतर या झाडांचा सुगंध दरवळू लागतो. साहजिकच यामुळे चंदन तस्करांपासून देखील संरक्षण करावे लागते. अशा लोकांकडून झाडे गुपचूप चोरून घेऊन जाण्याचे प्रकार देखील नाकारता येत नाहीत.

एक झाड 5 लाख उत्पन्न

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, मात्र एका झाडापासून तुम्ही पाच लाखांपर्यंत उत्पन्न घेऊ शकता. जर तुम्ही पंचवीस झाडांची लागवड केली तर तुम्हाला वर्षाला 25 लाख रुपये मिळतात. चंदनाचे रोप बाजारामध्ये शंभर ते दीडशे रुपयांना विकले जाते. मार्केटमध्ये चंदनाच्या एका किलोला तीस हजार रुपये भाव मिळतो. बाहेर मार्केटमध्ये चंदन विक्रीसाठी बंदी असली तरी सरकारच्या मदतीने तुम्ही चंदन विकू शकता.

हा आहे कायदा

चंदनाची शेती करण्यासाठी तुम्हाला सरकारची परवानगी लागणार आहे. चंदन विकण्यासाठी तुम्हाला बंदी आहे. 2017 मध्ये सरकारने चंदन विक्री संदर्भात कायदा केला आहे. चंदन विकण्यासाठी बंदी असली तरी देखील तुम्ही तुमचे चंदन सरकारला विकू शकता. अशा पद्धतीने चंदनाची शेती करून तुम्ही वर्षाला कोट्यावधी रुपये कमवू शकता.

हे देखील वाचा Onion Subsidy: एका क्विंटलसाठी 350 रुपये अनुदान; कांद्याच्या अनुदानासाठी असा करा अर्ज..

Marriage Tips: ..होय लग्नानंतर बदलतं आयुष्य; या गोष्टी माहीत असतील तरच संसाराचा गाडा चालेल व्यवस्थित..

Shikhar Dhawan: ..म्हणून मला करावी लागली होती HIV टेस्ट; शिखर धवनच्या खुलाशाने खळबळ..

Maruti Suzuki Jimny: मारुती सुझुकी Jimny चा चार दिवसांत नवा विक्रम; जाणून घ्या सविस्तर..

Weight lose Tips: पोट कमी करायचंय? या पदार्थाचं करा सेवन, चरबी वितळेल झटक्यात..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.