Shikhar Dhawan: ..म्हणून मला करावी लागली होती HIV टेस्ट; शिखर धवनच्या खुलाशाने खळबळ..

0

Shikhar Dhawan: मिस्टर आयसीसी (ICC) म्हणून, परिचित असणारा आणि भारताचा स्टार डावखुरा सलामीवीर शिखर धवनने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये शिखर धवनने अनेक बडे खुलासे करत आपल्या खाजगी आयुष्याबद्दल देखील सविस्तर भाष्य केलं. एवढेच नाही, तर शिखर धवनने पत्नीसोबत घटस्फोट का झाला? याविषयी देखील भाष्य केलं. भारतीय क्रिकेट पासून खूप काळ दूर असला तरी शिखर धवनला आगामी विश्वचषकात भारतीय संघामध्ये संधी मिळण्याची आशा आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शिखर धवनने मला एचआयव्ही टेस्ट देखील करावी लागली होती याविषयी देखील भाष्य केले आहे.

शिखर धवन (shikhar dhawan) बिंदास खेळाडू आहे. आयसीसी टूर्नामेंटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्याला मिस्टर आयसीसी म्हणून देखील ओळखलं जातं. भारतीय क्रिकेट पासून खूप काळ दूर असला तरी शिखर धवन गेल्या वर्षभरापासून चांगला चर्चेत राहिला आहे. भारतीय संघातून तीनही फॉरमॅटमधून शिखर धवनला बाहेर करण्यात आले. शिखर धवनचा घटस्फोट देखील झाला. अर्थात या गोष्टीमुळे देखील शिखर धवन चर्चेत राहिला.

शिखर धवनने एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आपल्या खासगी आयुष्याविषयी देखील दिलखुलास गप्पा मारल्या. याबरोबरच आपल्या पाठीवर काढलेल्या टॅटू विषयी मोठा खुलासा केला. लहानपणी टॅटू काढण्याची आवड होती. मी जेव्हा 14 15 वर्षाचा होतो तेव्हा मनालीला मित्रांसोबत फिरायला गेलो होतो. एका रस्त्याच्या कडेला टॅटू काढणारी लोकं बसली होती. तेव्हा मी पाठीवर विंचूचे टॅटू काढले होते.

मी हे विंचूचे टॅटू घरच्यांना न सांगून काढलं होतं. जवळपास सहा महिने मी घरच्यांना सांगितलं नाही. मात्र एक दिवस अचानक त्यांना समजल्यानंतर, मला वडिलांनी खूप मारलं असं देखील शिखर धवन या मुलाखतीत म्हणाला. रस्त्यावरून टॅटू काढण्यासाठी बसणारी लोकं अनेकांना एकाच सुईने टॅटू काढत असल्याचं त्यावेळी मला समजलं. माझ्या देखील पाठीवर त्याच सुईने टॅटू काढला असेल, आणि कदाचित मला एचआयव्ही झाला तर नसेल ना, अशी देखील मला भीती होती. आणि म्हणून मला hiv टेस्ट करावी लागली. असा देखील खुलासा शिखरने या मुलाखतीत केला.

याविषयी बोलताना शिखर धवन म्हणाला, जेव्हा मला ही गोष्ट समजली तेव्हा मी प्रचंड घाबरलो होतो. या गोष्टीमुळे देखील एचआयव्ही होऊ शकतो, याची जाणीव मला झाल्यानंतर मी देवाकडे प्रार्थना केली. मला एचआयव्ही झालेला नसावा. सुदैवाने मी टेस्ट केली आणि मिनीगेटिव्ह आली. शिखर धवन हसत म्हणाला, तेव्हा मी निगेटिव्ह आलो, आणि आत्तापर्यंत निगेटिव्हच आहे.

हे देखील वाचा Marriage Tips: ..होय लग्नानंतर बदलतं आयुष्य; या गोष्टी माहीत असतील तरच संसाराचा गाडा चालेल व्यवस्थित..

Weight lose Tips: पोट कमी करायचंय? या पदार्थाचं करा सेवन, चरबी वितळेल झटक्यात..

Central Bank of India Recruitment 2023: सेंट्रल बँकेत पाच हजार पदांची मेगा भरती; या उमेदवारांना करता येणार अर्ज..

Maruti Suzuki Jimny: मारुती सुझुकी Jimny चा चार दिवसांत नवा विक्रम; जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.