Maruti Suzuki Jimny: मारुती सुझुकी Jimny चा चार दिवसांत नवा विक्रम; जाणून घ्या सविस्तर..

0

 

Maruti Suzuki Jimny: मारुती सुझुकी Jimny गेल्या वर्षभरापासून कमालीची चर्चेत राहिली आहे. लॉन्च होण्यापूर्वीच या गाडीने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या गाडीने लॉन्च होण्यापूर्वीच, आपला जलवा दाखवून दिला आहे. महिंद्र थारला आव्हान म्हणून, कंपनीने ही गाडी मार्केटमध्ये उतरविण्याचा निर्णय घेतला. आगामी काळामध्ये ही गाडी थारच्या ग्राहकांना आकर्षित करणार असल्याचं बोललं जात आहे. लॉन्च होण्यापूर्वीच या गाडीने आता अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. जाणून घेऊया या SUV विषयी सविस्तर.

मीडिया रिपोर्टनुसार, एका आठवड्याच्या आतमध्ये maruti suzuki Jimny या गाडीचे तब्बल 5000 युनिट्सचे बुकिंग झाले आहे. हा एक रेकॉर्ड बनला आहे. जर तुम्हाला देखील ही गाडी बुकिंग करायची असेल, तर तुम्हाला देखील 25,000 रुपये रक्कम भरून नेक्सा डीलरशिपवर 5 डोअर असणारी मारुती Jimny बुक करू शकता. जाणून घेऊया, या गाडीचे फीचर्स, लूक्स किँमत आणि वैशिष्ट्ये.

किंमत

Maruti Suzuki Jimny पुढच्या महिन्यामध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. या SUV ची संभाव्य किंमत 10 लाख रुपयांपासून सुरू होईल असं मीडिया रिपोर्ट नुसार, सांगण्यात येत आहे. यामध्ये Zeta तसेच Alpha सारखे प्रकार पाहायला मिळतील. नुकतीच महिंद्राने 10 लाख रुपये किंमतीची रियर व्हील ड्राइव्ह थार लाँच केली आहे. साहजिक या थारशी स्पर्धा म्हणून, Jimny देखील याच किंमतीत लॉन्च केली जाऊ शकते.

इंजिन आणि पावर

मारुती सुझुकी Jimny ही गाडी निष्क्रिय स्टार्ट/स्टॉप फंक्शनसह मिळत आहे. यामध्ये 1.5L K15B पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित केली आहे. या ऑफ-रोड एसयूव्हीमध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सेस असणार आहेत. इंजिन 104.8 PS आणि 134.2 न्यूटन मीटरचे पीक टॉर्क जनरेटमध्ये मिळणार आहे. जिमनी सुझुकीच्या AllGrip Pro 4X4 तंत्रज्ञानासह सादर केली गेली आहे. इतर एसयूव्हीपेक्षा ही गाडी मायलेजच्या तुलनेत सर्वात पुढे असणार आहे.

आकर्षण लूक आणि डिझाईन

मारुती सुझुकी Jimny ची लांबी 3.98 मीटर तर रुंदी 1.64 मीटर असणार आहे. उंची 1.72 मीटर दिली गेली आहे. Jimny मध्ये व्हीलबेस 2590mm त्याचबरोबर ग्राउंड क्लीयरन्स 210mm असणार आहे. या SUV ला ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स असणार आहे. सोबतच फोल्डेबल साइड मिरर देखील दिला आहे. हेडलॅम्प वॉशर तसेच एलईडी हेडलॅम्प देखील आहे.

जबरदस्त फीचर्स

मारुती सुझुकी Jimny या गाडीमध्ये 9-इंच स्मार्टप्ले प्रो प्लस टचस्क्रीन देखील असणार आहे. इन्फोटेनमेंट सिस्टम सोबतच लेदर-रॅप्ड स्टीयरिंग व्हीलही आहे. प्रीमियम साउंड सिस्टम तसेच ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलही असणार आहे. इलेक्ट्रिकली फोल्डेबल साइड मिरर देखील असणार आहे. सेफ्टी साठी ग्राहकांना सहा एअरबॅग दिल्या आहेत. त्याचबरोबर ESC, हिल होल्ड यासारखी l वैशिष्ट्ये देखील असणार आहेत.

हे देखील वाचा Maruti Jimny 7 Seater उठवणार आहे Mahindra Thar चा बाजार, गाडी एवढी नादखुळाय की..

Marriage Tips: ..होय लग्नानंतर बदलतं आयुष्य; या गोष्टी माहीत असतील तरच संसाराचा गाडा चालेल व्यवस्थित..

Weight lose Tips: पोट कमी करायचंय? या पदार्थाचं करा सेवन, चरबी वितळेल झटक्यात..

Physical relationship tips: ..म्हणून महिला शारीरिक संबंध ठेवण्यास नसतात तयार; धक्कादायक म्हणजे याला सर्वस्वी जबाबदार आहेत पुरुष..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.