Physical relationship tips: ..म्हणून महिला शारीरिक संबंध ठेवण्यास नसतात तयार; धक्कादायक म्हणजे याला सर्वस्वी जबाबदार आहेत पुरुष..

0

Physical relationship tips: शारीरिक सुख हे प्रत्येक शरीराची गरज आहे. आपल्याला जर आनंदात जीवन जगायचे असेल तर शारीरिक सुख खूप गरजेचे आहे. लैंगिक आयुष्यामध्ये जर तुम्ही समाधानी आणि आनंदी नसाल, तर नैराश्येत देखील जाऊ शकता. त्यामुळे शारीरिक संबंध हा जीवनातला खूप महत्वाचा भाग आहे. परंतु संबंध ठेवत असताना तुमचा जोडीदार आणि तुम्ही दोघांच्याही इच्छेला खूप महत्व आहे. फक्त एकाची इच्छा असून चालत नाही. शारीरिक संबंध ठेवण्याची पुरुषांची आणि महिलेची देखील इच्छा असायला हवी. जर इच्छा महिलेकडून कोणताही रिस्पॉन्स येत नसेल तर असं का होतं हे देखील तपासून पाहणे गरजेचे आहे. महिला शारीरिक संबंध ठेवण्यास का तयार नसतात? जाणून घेऊया सविस्तर.

शारीरिक संबंधांमधील आणखी एक सामान्य समस्या म्हणजे कंटाळवाणेपणा. म्हणूनच त्यास सामोरे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. महिलांना कंटाळा का येतो? किंवा त्यांची तुमच्या सोबत शारीरिक संबंध ठेवण्याची अनेकदा इच्छा का नसते? याला महिला नाही, तर पुरुषांच्या काही चुका कारणीभूत असू शकतात. मात्र पुरुष या चुकांकडे कधी लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांचे लैंगिक जीवन हे सुखी, समाधानी कधीच नसते. तुम्हाला जर वाटतं असेल, आपल्या पार्टनरने सेक्स करताना आपल्याला रिस्पॉन्स दिला पाहिजे, तर तुमच्या पार्टनरची सेक्स करण्याची इच्छा का होत नाही. याबाबत तुम्ही जाणून घेतले पाहिजे. जेणेकरून तुमचे लैंगिक आयुष्य चांगले होईल. आपण खालील काही टिप्सच्या आधारे माहिती घेऊ, महिलांना नेमकी सेक्स करण्याची इच्छा का होत नाही.

लग्न झाल्यावर महिलांची जबाबदारी वाढत असते, त्यामुळे त्यांना अनेक गोष्टींचे टेन्शन असते. महिलांमध्ये टेन्शन हे एक सेक्सची इच्छा न होण्याचे कारण असू शकते. महिला या खूप भावनिक असतात. त्यामुळे त्या कोणत्याही गोष्टीचे खूप जास्त टेन्शन घेतात. आणि त्यांच मन जर स्थिर नसेल, तर त्यांची सेक्स करण्याची इच्छा होत नाही. आपण जेव्हा मनाने वाईट अवस्थेत असता, तेव्हा आपल्या मनावर अनेक विचारांचे ओझे असते. त्यावेळी आपण टेन्शन शिवाय कोणत्याही गोष्टीचा विचार करू शकत नाही.

शारीरक संबंध ठेवताना समाधान खूप महत्वाचे असते. तुम्ही समाधानी नसाल, तर त्या सेक्सला काही अर्थ उरत नाही. कधी-कधी पुरुष सेक्स करताना चांगला परफॉर्म देऊ शकत नाहीत. तेव्हा महिलांना शारीरिक दृष्ट्या समाधान मिळत नाही. यामुळे महिलांमधील सेक्स करण्याचा उत्साह कमी होतो. हे सारखे सारखे असेच होत राहिले, तर त्यांची सेक्स करण्याची इच्छा कमी होते. या गोष्टींना पुरुष अनेक वेळा जबाबदार असतात. मात्र काही पुरुष हे मान्य करत नाहीत.

दुर्गंधी ही कोणालाच आवडत नसते. कधी कधी आपल्याच शरीराची दुर्गंधी आपल्याला परेशान करते. आणि दुसऱ्या कोणाच्या शरीराचा वास येत असेल, तर आपण त्याच्या जवळ पण जात नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या जवळ कोणी यावे असे वाटत असेल, तर शरीर स्वच्छ ठेवणे फार गरजेचे असते. तुम्हाला जर खूप घाम येत असेल, तर तुमच्या शरीराचा वास येतो. अशा परिस्थितीत तुमच्या जोडीदाराने तुमच्या सोबत सेक्स करण्याची तुम्ही अपेक्षा ठेवत असाल, तर चुकीचे आहे. महिलांचे सेक्स न करण्याची इच्छा होत नाही, याचे हे कारण समोर आलं आहे.

शारीरिक संबंध ठेवताना जर वेदना होत असतील, तर तुम्ही त्या सेक्स लाईफचा आनंद घेऊ शकत नाही. त्यामुळे सेक्स करताना तुमच्या मनाची आणि शरीराची स्थिती चांगली असावी लागते. तुम्हाला सेक्स करताना जर त्रास होत असेल, तर मग शरीरात काहीतरी गडबड सुरु आहे, हे नक्की. यात पेल्विक फ्लोर डिसफंक्शन सामावलेले आहे. योनीच्या जवळील असलेले स्नायू शिथिल होत नाहीत. तेव्हा तुम्हाला सेक्स करताना वेदना होतात. टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनच्या या हार्मोनल बदलाच्या पातळीमुळे सेक्स करताना त्रास होतो.

सध्याच्या धावपळीच्या युगात व्यक्ती मानसिक तणावात नसेल तर नवलच आहे. आपण जेव्हा मानसिक तणावात असतो, तेव्हा आपले कोणत्याच गोष्टीकडे लक्ष लागत नाही. अशा परिस्थितीत सेक्स करण्याची तुमची इच्छा होणार नाही. त्यामुळे चांगले लैंगिक आयुष्य जगण्यासाठी तुम्ही मानसिक तणावरहित असणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा Sexual Relationship Tips: तुमच्यामध्ये या गोष्टी होत नसतील तर समजून जा तुमचे लैंगिक आयुष्य आहे खूपच खराब..

Electric bike: ८० रुपयांत ८०० किमी धावते ही E-Bike; ड्रायव्हिंग लायसन्सचीही गरज नाही..

business idea: शेतकऱ्यांनो या पिकाचे उत्पादन घ्याल तर व्हाल करोडपती..

Viral video: बहाद्दराने मगर टाकली खांद्यावर, अन् फिरू लागला रस्त्यावर; पुढे जे घडलं ते पाहून येईल चक्कर..

Pathaan: पठाणने मोडले सगळ्यांचे रेकॉर्ड, बाहुबलीलाही टाकले मागे; जाणून घ्या पठाणची कमाई..

Vastu Tips: तुमच्या घरात हे झाड असेल तर लक्ष्मी येईल धावत; सुख समाधानही राहील कायम दरवळत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.