Pathaan: पठाणने मोडले सगळ्यांचे रेकॉर्ड, ‘बाहुबली’लाही टाकले मागे; जाणून घ्या पठाणची कमाई..
Pathaan: पठाण चित्रपटाला कमाईच्या बाबतीत थांबवणे आता अवघड झाले आहे. शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाचा जलवा महिना ओलांडून गेल्यावरही कायम आहे. शाहरुख खानने अनेक दिवसांनी मोठे रेकॉर्ड केले आहे. पठाण चित्रपट रिलीज होऊन महिना झाला. मात्र हे वादळ काही थांबायचे नाव घेत नाही. चित्रपटाची कमाई अजून सुरूच आहे. आता पठाणने १००० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आता शाहरुख खानच्या (shahrukh khan) पठाणने दंगल या हिंदी सिनेमा देखील मागे टाकले आहे. याआधी दंगल हा सर्वात मोठा चित्रपट राहिला होता. (Pathaan box office collection)
या चित्रपटाने अनेक अडथळे पार करून बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करून हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याने मोठे राजकीय वादंग पेटले होते. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने भगवी बिकीनी घातल्यावरून वाद निर्माण झाला होता. हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधानंतर वादग्रस्त सीन्स चित्रपटातून काढण्याचा निर्णय सेन्सॉर बोर्डाने घेतला. आणि त्यानंतर हा चित्रपट रिलीज झाला. या गाण्यावेळी अनेक ठिकाणी मोठी हाणामारी झाल्याचं ऐकायला मिळालं. मात्र आता अनेक ठिकाणी लोकांनी पठाण चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
पठाण हा चित्रपट रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर खूप चालला आहे. या चित्रपटाने खूप वेगाने १००० कोटींची कमाई केली आहे. आता या चित्रपटाने दंगलचे रेकॉर्ड तोडून इतिहासाच्या पानात आपला ठसा उमटवला आहे. गेल्या महिनाभरात पठाणने धमाकेदार कामगिरी करत एक नवा विक्रम रचला आहे. या चित्रपटाचा जलवा देशासहित जगभरात पाहायला मिळत आहे. १००० हजार कोटींचा टप्पा गाठणे म्हणजे, पठाणचे हे मोठे यश असल्याच मानलं जात आहे. रिलीज झाल्यानंतर एक महिन्याने ही याच चित्रपटाचा डंका वाजत आहे.
दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम आणि शाहरुख खान यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या पठाणने पहिल्याच दिवशी ५४ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाची परदेशातही मोठी क्रेझ पहायला मिळाली. १००० कोटींचा आकडा पार करून किंग खानने संपूर्ण जगत तो किंग असल्याचं दाखवून दिले आहे. पठाण या चित्रपटाने १००० कोटींचा टप्पा पार करून एक इतिहास रचला आहे. एका अहवालानुसार चित्रपटाच्या वाढत्या मागणीमुळे स्क्रीनच्या संख्येत वाढ झाली. तर निर्मात्यांनी वीकेंडला तिकिटांचे दरही वाढवले आहेत.
यापूर्वी आमिर खानचा दंगल हा चित्रपट खूप हिट ठरला होता. दंगल सगळ्यात मोठा चित्रपट होता. मात्र आता पठानने त्यालाही मागे टाकले असून, कमी काळात १००० कोटीचा टप्पा ओलांडणार हा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. दंगलने बॉक्स ऑफिसवर ३८७ कोटी रुपयांची कमाई केली होती. पण आता पठाणने १००० कोटींचा टप्पा पार केल्याने दंगलला ही मागे टाकले आहे. पठाण सध्या बॉक्स ऑफिसवर सगळ्यात जास्त कमाई करणारा एक यशस्वी चित्रपट ठरला आहे.
बेशरम रंग या गाण्यातील भगव्या बिकनीमुळे प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याने चांगली पसंती मिळवली. हे गाणे अनेकांनी युट्यूबवर सर्च केले आहे. सर्वसामान्यांपासून ते इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींपर्यंत सगळेच या गाण्यावर थिरकताना दिसले. ‘बेशरम रंग’ हे गाणे रिलीज झाल्यानंतर, अनेक रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. अशा प्रकारे हजारो अडथळे पार करून अखेर या चित्रपटाने जगभरात आपला डंका वाजवला आहे. आजही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे.
हे देखील वाचा Poco Smartphone: 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्या असणारा हा दमदार स्मार्टफोन मिळतोय केवळ 9 हजारात..
OnePlus: OnePlus चा तगडा स्मार्टफोन मिळतोय केवळ 13,500 रुपयांत; जाणून घ्या डिटेल्स..
fashion tips: जीन्स खरेदी करताय मग या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्या..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम