fashion tips: जीन्स खरेदी करताय मग ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्या..

0

fashion tips: सध्या मुली आणि मुलांमध्ये जीन्सचा वापर वाढला आहे. बाजारात अनेक प्रकारच्या जीन्स उपलब्ध आहेत. मात्र अनेक वेळा आपण दुकानात गेलो, तर आपल्याला व्यवस्थित फिटिंगमध्ये जीन्स (jeans) मिळत नाही. आणि जीन्स फिटींगमध्ये नसेल तर आपला पूर्ण लूक चेंज होतो. त्यामुळे अनेक जणांना त्या जीन्समध्ये कम्फर्टेबल वाटतं नाही. त्याचबरोबर जीन्स खरेदी करताना आणखीनही गोष्टी तुम्हाला माहिती असाव्या लागतात तरच तुम्ही परफेक्ट जीन्स खरेदी करू शकाल. आपण नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे? हे आपण आज जाणून घेऊ. ज्यामुळे तुम्हाला परफेक्ट जीन्स खरेदी करायला मदत होईल, आणि तुमचा लूकही चांगला दिसेल. (Perfect jeans tips)

शरीराचे अचूक माप असणे गरजेचे: जीन्स घालताना तिची फिटिंग फार महत्वाची असते. जीन्सची फिटिंग जर व्यवस्थित नसेल, तर आपला पूर्ण लूक चेंज होतो. त्यामुळे जीन्स खरेदी करतानाच या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे दुकानात जायच्या आधी तुमच्या मांड्या, बस्ट आणि कंबर यांचे अचूक माप असणे गरजेचे आहे. दुकानात या मापावरूनच तुम्ही जीन्स खरेदी करा. जेणेकरून तुम्हाला जीन्स फिटिंगमध्ये बसेल.

जीन्सचे फॅब्रिक तपासणे: जीन्स खरेदी करताना जीन्सच्या कपड्याकडे लक्ष देणे गरजचे असते. एकतर खराब कपडा असेल, तर जीन्स लवकर खराब होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कपडा खराब असेल, तर तुम्हाला ऍलर्जी होण्याची शक्यता असते. कधी कधी स्ट्रेचेबल कपडा नसेल तर पायाची मुव्हमेंट करणे अवघड जाते. त्यामुळे कधीही जीन्स घेताना जीन्सचे फॅब्रिक तपासणे गरजेचे आहे.

जीन्स ऑफलाईन खरेदी करा: अनेक मुली ऑनलाईन खरेदीवर जास्त भर देतात. मात्र ऑनलाईन खरेदी करताना कपडा कसा आहे. हे आपल्याला समजत नाही. त्यामुळे जीन्स खरेदी करायची असेल, तर दुकानात जाऊन खरेदी करणे चांगले. खरेदी करण्यापूर्वी ती ट्राय करून मगच खरेदी करा. यावरुन तुम्हाला जीन्सच्या फिटींगचा अंदाज येईल. त्यामुळे कधीही जीन्स खरेदी करताना ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन खरेदीला जास्त प्राधान्य द्या.

लेबल पहावे: जीन्सची खरेदी करताना आपण तिचा कपडा, माप या गोष्टींकडे लक्ष देतो. मात्र अजून एक गोष्ट नेमही लक्षात घ्या, आपण जेव्हा जीन्स घ्यायला जाल, तेव्हा त्यावरील लेबल नेहमी पहावे. कारण यामुळे जीन्समध्ये किती प्रमाणात कॉटन वापरण्यात आले आहे, याची माहिती आपल्याला मिळू शकते. आणि आपल्याला जीन्स महाग आहे की स्वस्त हे यावरून समजेल. जीन्समध्ये कॉटन अधिक प्रमाणात वापरण्यात आला असेल, तर अशा प्रकारच्या जीन्सची किंमत अधिक असू शकते.

जीन्स घेण्याचा हेतू काय: जीन्स खरेदी करताना आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, आपण जीन्स नेमकी कशासाठी घेतोय? म्हणजे ऑफिसमध्ये घालण्यासाठी कि एखाद्या कार्यक्रमासाठी, पार्टीसाठी, कारण प्रत्येक ठिकाणी आपण एक जीन्स घालू शकत नाही. ऑफिसमध्ये घालायला कॅज्युअल कपडे लागतात. पार्टीला, समारंभात जात असताना वेगळ्या पद्धतीची जीन्स लागते. ऑफिशिअल वापरासाठी जिन्स साधी असावी. त्यामुळे जीन्स खरेदी करताना नेमका हेतू काय? हे आधी लक्षात घ्या.

हे देखील वाचा Healthy Physical Life: सेक्स करण्यापूर्वी आणि नंतर काय करायला हवं जाणून घ्या, अन्यथा होतील गंभीर परिणाम..

OnePlus: OnePlus चा तगडा स्मार्टफोन मिळतोय केवळ 13,500 रुपयांत; जाणून घ्या डिटेल्स..

couple romance viral video: कपलचा बाईकवर जबरदस्त रोमान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल; पोरीचं कृत्य पाहून धराल डोकं..

Bajaj electric scooter: बजाज कंपनीची ही इलेक्ट्रिक स्कूटर मिळतेय अवघ्या 15 हजारांत; ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड..

Shikhar Dhawan: सॉरी आपलं लग्न होऊ शकत नाही..,”हुमा कुरेशीने शिखर धवनला नकार दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ..

Shettale Anudan: आता शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी मिळतेय 100 टक्के अनुदान; जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.