Shettale Anudan: आता शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी मिळतेय 100 टक्के अनुदान; जाणून घ्या सविस्तर..

0

Shettale Anudan: राज्य सरकार (state government) शेतकऱ्यांसाठी विविध योजना (Yojana) आणत असते. त्या माध्यमातून राज्यातील शेती आणि शेतकरी सुधारावा, हा या मागचा उद्देश असतो. सरकारने आता शेतकऱ्याला विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. शेतीमध्ये चांगले उत्पादन निघावे, शेतकऱ्याला शेतीला जोडून काही जोडधंदा करता यावा. यासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील असते. शेतकऱ्यांना शेतीसाठी विहीर, शेततळे यांच्या माध्यमातून शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा स्रोत कायमस्वरूपी निर्माण व्हावा, यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. सरकारकडून शेततळ्यासाठी देखील आता शंभर टक्के अनुदान देण्यात येत आहे. जाणून घेऊया या योजनेविषयी सविस्तर.

आर्थिक परिस्थिती नसणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारच्या योजनांचा लाभ घेता येत नाही. सरकार अनेक योजनांना तब्बल पन्नास टक्के अनुदान देत असते. मात्र तरीदेखील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे या योजनेचा लाभ घेता येत नाही. मात्र जर तुमची आर्थिक परिस्थिती हालाखीची असेल, तर तुम्हाला सरकारच्या या योजनेचा लाभ घेता येणार आहे. कारण सरकार शेततळ्यासाठी तब्बल 100% अनुदान देत आहे.

आर्थिक परिस्थितीमुळे शेततळे पाडणे शक्य होत नसणाऱ्या शेतकऱ्यांना आता कोणत्याही अडथळ्याशिवाय शेततळे तयार करता येणार आहे. जाणून घेऊया शेतकऱ्यांना कोणत्या योजनेतून शेततळे तयार करण्यासाठी शंभर टक्के अनुदान मिळत आहे. सोबतच या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कसा अर्ज करायचा? याविषयी देखील आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर सर्वप्रथम तुम्ही समूह शेतकरी असणे आवश्यक आहे. जर तुम्ही समूह शेतकरी असाल तर ग्राम कृषि संजिवनी समितीने मान्यता दिल्यानंतर, तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र होणार आहात. या योजनेचे स्वरूप लक्षात घ्यायचं झाल्यास, तुम्हाला सामूहिक शेततळे पाडायचे आहे. दोन किंवा अधिक शेतकऱ्यांनी मिळून एक शेततळे तयार करणे आवश्यक आहे. तुमच्याकडे जेवढे क्षेत्र आहे, त्या क्षेत्राला पुरेसा पाणीसाठा निर्माण होईल, असे शेततळे निर्माण करून तुम्ही सामूहिक शेततळ्याचा लाभ घेऊ शकणार आहात.

सामूहिक शेततळ्यासाठी ज्या शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे, अशा शेतकऱ्यांना शेततळ्याच्या जमिनीबद्दल आपापसांमध्ये करार करून घेणे आवश्यक असणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हे संयुक्त कुटुंबातील नसणे आवश्यक आहे. अर्ज करणारा शेतकरी हा सामूहिक कुटुंबातील असणे आवश्यक आहे. मात्र जमीन त्याच्या स्वतःच्या नावावर असणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज

इच्छुक आणि पात्र असणारे शेतकऱ्यांना सरकारच्या योजनेचा शंभर टक्के लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील क्रोम वर जाऊन https://mahapocra.gov.in/ असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर अधिकृत वेबसाईट ओपन होईल. यानंतर तुम्ही ऑनलाईन नोंदणी आणि सविस्तर अर्ज करू शकता. त्यानंतर शेतकऱ्यांना आवश्यक असणारी कागतपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना सामुदायिक शेततळे नोंदणीच्या अर्जासह ७/१२ उतारा त्याचबरोबर ८अ प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा Relationship Tips: गोष्टी माहीत असायलाच हव्यात; अन्यथा नातं कधीच फार काळ टिकणार नाही..

Yojana: शेततळे बांधण्यासाठी 1 लाख 10 हजार अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय..

Healthy Physical Life: सेक्स करण्यापूर्वी आणि नंतर काय करायला हवं जाणून घ्या, अन्यथा होतील गंभीर परिणाम..

Smartwatch: जबरदस्त फीचर्स असणारे हे स्मार्टवॉच फ्लिपकार्टवर मिळतेय फक्त 1199 रुपयांमध्ये..

Malaika Arora Arjun Kapoor engagement: मलायका-अर्जुनचा साखरपुडा ठरला; या दिवशी पॅरिसमध्ये रंगणार सोहळा..

Chanakya Niti: लग्न करताना मुलीमध्ये हे गुण आहेत का पाहा; अन्यथा व्हाल बरबाद..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.