Chanakya Niti: लग्न करताना मुलीमध्ये हे गुण आहेत का पाहा; अन्यथा व्हाल बरबाद..

0

Chanakya Niti: आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) हे अतिशय विद्वान व्यक्ती होते. त्यांनी अर्थशास्त्र, विज्ञान, नातेसंबंध याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा आपण आपल्या आयुष्यात उपयोग केला, तर माणूस जीवनात यशस्वी होऊ शकतो. आचार्य चाणक्य म्हणतात, लग्न हा माणसाच्या आयुष्यातील फार महत्वाचा निर्णय असतो. त्यामुळे तो निर्णय आपण खूप विचापूर्वक घेतला पाहिजे. आपण लग्न करताना कोण-कोणत्या गोष्टी तपासाव्यात? या बाबत आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीति (Chanakya Niti) या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलं आहे. सकाळी सेक्स करण्याचे हे फायदे जाणून बसेल धक्का; महिलांसाठी प्रचंड फायदेशीर..

ज्याप्रमाणे लग्न करताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो, खास करून मुलीचे आई-वडील मुलगा हा कर्तृत्ववान आहे का? घरची संपत्ती? स्वभावाने कसा आहे? यासारख्या अनेक गोष्टींचा विचार केला जातो. त्याच पद्धतीने लग्न करताना मुलांना देखील मुलीमध्ये कोणत्या गोष्टी असायला हव्यात या विषयी माहिती असायला हवं. आचार्य चाणक्यांनी याविषयी सविस्तर सांगितलं आहे. आज आपण तेच जाणून घेणार आहोत. सेक्स करण्यापूर्वी आणि नंतर काय करायला हवं जाणून घ्या, अन्यथा होतील गंभीर परिणाम..

मुलीमध्ये कोणते गुण पाहावेत: अनेक मुलांना वाटत आपल्यालाही सुंदर मुलगी मिळायला हवी. साहजिकच यामुळे प्रत्येकजण सुंदर मुलीच्या शोधात असतो. पण चाणक्य सांगतात, मुलांनी मुलगी फक्त सुंदर आहे, म्हणून तिच्याशी कदापिही लग्न करू नये. कोणीही असो, सौंदर्य फार काळ टिकत नाही. मात्र तुमची बौद्धिक क्षमता हीच आयुष्यभर सोबत राहते. आणि वैवाहिक जीवनामध्ये बौद्धिक क्षमतेला खूप महत्त्व आहे बौद्धिक क्षमतेच्या जोरावर तुम्ही तुमच्या आयुष्याला आकार देऊ शकता. चाणक्य यांच्या मते, मुलगी सद्गुणी असायला हवी. सद्गुणी मुलगी तुमच्या आयुष्याचे सोने करू शकते. लग्नापूर्वी या तीन गोष्टी जाणून घ्या अन्यथा उध्वस्त होईल आयुष्य..

धार्मिक: घरात जर धार्मिक वातावरण असेल, तर सुख, शांती, समृध्दी या गोष्टी नांदत असतात. घरातील समाधान आणि आनंदी वातावरण ठेवणं ही स्रीच्या हातात असते. घरातील स्त्री समाधानी असेल तर लक्ष्मीचा वास होतो असा आचार्य चाणक्य सांगतात. स्रीजर धार्मिक असेल, तर तिच्यात नम्रता आणि प्रामाणिकपणा हे गुण असतात. त्यामुळे ती कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्यास मदत करते. या गोष्टीमुळे मुलांनी आपला जोडीदार निवडताना मुलगी धार्मिक आहे का? हे तपासून पाहिले पाहिजे.

राग न येणारी: राग हा कधी कधी माणसाचे जीवन उध्वस्त करून टाकतो. रागामुळे सुंदर आणि प्रेमळ नातं ही क्षणात उध्वस्त होऊ शकतो. खर तर राग हा आपला मोठा शत्रू आहे. त्यामुळे चाणक्य म्हणतात, की मुलांनी लग्नासाठी कधीच जास्त रागीट मुलीची निवड करू नये. कारण अशा मुली ना कधी स्वतः आनंदी रहातात, ना तुम्हाला आनंदी ठेऊ शकतात. यांच्या रागाने घरातील वातावरण अशुद्ध होते. त्यामुळे मुलांनी रागीट मुलीशी कधीच लग्न करू नये.

आंतरिक गुणांना महत्व: मुलांनी मुलगी पाहताना, नेहमी तिच्या बाह्य गुणांपेक्षा आंतरिक गुणांना महत्व दिले पाहिजे. कारण बाहेरचा देखावा हा क्षणिक असतो. पण जे आंतरिक गुण असतात, ते कायमचे असतात. व्यक्ती मधील गुणवत्ता ही कायम रहात असते. त्यामुळे मुलीचे सौंदर्य किंवा अजून काही बाह्य गुण न पहाता तिच्या आंतरिक गुणांना महत्व दया. आपल्याला थोडा वेळ कोणाशी संवाद साधला, तर ती व्यक्ती विश्वासू आहे की नाही समजते. त्यामुळे मुलांनी जोडीदार निवडताना या गोष्टींकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. तुम्ही जर कोणावर विश्वास ठेवू शकत नसाल, तर त्या व्यक्ती सोबत पूर्ण आयुष्य काढणे, तुम्हाला कठीण होईल. आणि ती व्यक्ती तुमची चांगली जोडीदार बनू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला विश्वासू मुलगी शोधणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा Chanakya Niti: वैवाहिक जीवनात या चुका केल्या तर कोणीही वाचवू शकणार नाही तुमचं नातं..

Malaika Arora Arjun Kapoor engagement: मलायका-अर्जुनचा साखरपुडा ठरला; या दिवशी पॅरिसमध्ये रंगणार सोहळा..

Relationship Tips: गोष्टी माहीत असायलाच हव्यात; अन्यथा नातं कधीच फार काळ टिकणार नाही..

Poco Smartphone: 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्या असणारा हा दमदार स्मार्टफोन मिळतोय केवळ 9 हजारात..

Shivsena: या मुद्द्यांच्या आधारे ठाकरेंना शिवसेना आणि चिन्ह पुन्हा मिळणार; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या होणार सुनावणी..

Tips For Married Couple: पती पत्नीच्या नात्यात कायम ओलावा ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.