Relationship Tips: गोष्टी माहीत असायलाच हव्यात; अन्यथा नातं कधीच फार काळ टिकणार नाही..

0

Relationship Tips: नवरा-बायको किंवा प्रियकर-प्रेयसी नाते म्हंटल तर त्यात चढ-उतार हे येतच असतात. कोणत्याही नात्यात ही फार कॉमन गोष्ट आहे. कोणतेही नातं खूप नाजूक असत. खासकरून पतीपत्नीचं नातं आपल्याला एकमेकांवरच्या विश्वासाने घट्ट करायचं असत. या नात्यात थोडे जरी गैरसमज झाले, तरी हे नातं तुटू शकत. त्यामुळे आपण या नात्याला नेहमी रिफ्रेश करत रहायला हवं. नात्यात ओलावा असेल तर आपले आपल्या जोडीदारासोबत नाते अधिक घट्ट होते. नवरा बायकोच्या नात्यात कधीच दुरावा असायला नको, हे प्रत्येक जोडप्याला वाटत असते. मात्र न कळत तुमच्या नात्यात कधी दरी निर्माण झाली याची तुम्हाला जराही खबर लागत नाही. तुम्हालाही जर तुमच्या नात्यात दुरावा नको असेल, तर खालील टिप्स फॉलो करा.

खोटं बोलणं टाळा: कोणतंही नातं असो, ते जर आपल्याला लॉंग टाईम टिकवून ठेवायचं असेल किंवा त्यातील गोडवा कायम ठेवायचा असेल तर आपल्याला आपल्या जोडीदाराचा विश्वास संपादन करणे फार गरजेचे असते. काहीजण आपल्या जोडीदारासोबत सहज खोटं बोलून जातात. गोष्ट मोठी नसली तरी खोटं बोलण्याने आपल्या जोडीदाराचा आपल्यावरील विश्वास कमी होतो. यामुळे नातं तुटण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्हाला नातं घट्ट करायचं असेल, तर आपल्या जोडीदाराशी कायम खरं बोला, प्रामाणिक रहा.

तुमच्या नात्याची इतरांशी तुलना नको- माणूस हा नेहमी अनुकरण करून जगत असतो. हे जरी खरं असलं तरी प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं असतं. त्यामुळे कधीही कोणासोबत तुलना करू नये. यामुळे तुमच्या चांगल्या नात्याची क्षणात वाट देखील लागू शकते. आपलं नातं कितीही चांगलं असलं, तरी काहींना दुसऱ्याच्या नात्याशी तुलना करण्याची विचित्र सवय असते. त्यांचं असं आहे, मग आपलं का नाही. पण तुम्ही जर विचार केला, तर तुमचं नातं त्यांच्या पेक्षाही चांगलं असतं. त्यामुळे इतरांशी तुलना न करता तुम्ही तुमच्या नात्याबद्दल पॉझिटिव्ह रहा. त्यामुळे तुमचा जोडीदार आणि तुमचं नातं नेमही बहरलेलं राहील.

नात्याला वेळ द्या: तुम्हाला जर तुमच्या जोडीदारासोबत नातं घट्ट करायचं असेल, तर तुम्ही आपल्या जोडीदाराला वेळ द्यायला हवा. एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण केली तर तर त्यातून तुम्हाला जोडीदाराच्या अनेक गोष्टी माहित होतील. एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड केल्यास तुमचं नातं अधिक घट्ट व्हायला मदत होते. यामुळे तुम्ही एक आदर्श जोडीदार होऊ शकता. त्यासाठी नात्याला वेळ देणं गरजेचं आहे.

कौतुक करा: कोणत्याही नात्यात आपल्याला समोरच्या व्यक्तीबद्दल एकंदरीत काय वाटतं? आपल्या जोडीदाराला आपल्या कोणत्या गोष्टी आवडतात. हे जाणून घेणं प्रत्येकाला आवडत असतं. किंवा जोडीदाराने आपल्याला अटेन्शन द्यावं, ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे आपल्या जोडीदाराच्या एखाद्या कामाचं कौतुक करा. असं केल्याने जोडीदारला आपल्याविषयी आपुलकी निर्माण होईल शिवाय तो नेहमी आनंद देखील राहील.

इमोशन अटॅचमेंट: सध्या प्रॅक्टिकल गोष्टींना जरी खूप महत्व असलं, तरी आपल्या जोडीदारासोबत नातं घट्ट करायचं असेल तर तुम्हाला भावनिकरीत्या देखील जोडलं जाणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जितके जास्त इमोशनली अटॅच होऊ शकता, तितकं तुमचं नातं अधिक बहरत. कोणत्याही नात्यांमध्ये संवाद फार महत्त्वाचा आहे संवादामुळे तुम्हाला एकमेकांच्या आवडीनिवडी समजतात. जोडीदारासोबत कायम बोला, मस्करी करा, थोडं खोडकर बोला. मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करा. यामुळे तुमच्या नात्यातील घट्टपणा कायम टिकून राहील.

हे देखील वाचा Physical relationship tips: लैंगिक सुखात परमोच्च आनंद मिळवण्यासाठी जाणून घ्या महिलांच्या शरीराचे हे हॅपी झोन अवयव..

Healthy Physical Life: सेक्स करण्यापूर्वी आणि नंतर काय करायला हवं जाणून घ्या, अन्यथा होतील गंभीर परिणाम..

Physical relationship tips: नियमित सेक्स केल्याने आरोग्यावर होतात हे परिणाम; जाणून बसेल धक्का..

Relationship Advice: बायको रागावली? झटक्यात राग दूर करण्यासाठी फॉलो करा या टिप्स..

​BOI Recruitment 2023: बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया..

Chanakya Niti: लग्नापूर्वी या तीन गोष्टी जाणून घ्या अन्यथा उध्वस्त होईल आयुष्य..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.