​BOI Recruitment 2023: बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया..

0

BOI Recruitment 2023: बँकिंगमध्ये करिअर करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. बँकेची नोकरी मिळवण्यासाठी लाखो तरुण क्लासेस देखील लावतात. खासकरून राष्ट्रीयिकृत बँकेत नोकरी मिळवणे, हे अनेकांचे स्वप्न असते. अशा सर्वांसाठी बँक ऑफ इंडियाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. बँक ऑफ इंडियामध्ये एकण ५०० रिक्त पदांची भरती होणार आहे. या संदर्भातली अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँक ऑफ इंडियाच्या bankofindia.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचे आहेत.

bankofindia.co.in या साईटवर जाऊन उमेदवारांनी अर्जाची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रांची यादी तपासणे आवश्यक आहे. नोकरीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२३ ठेवण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही दिवसच उरले आहेत. साहजिकच यामुळे उमेदवारांनी गडबड करावी लागणार आहे. एकूण ५०० रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. कोण कोणत्या पदासाठी किती जागा निश्चित करण्यात आले आहेत. याविषयी जाणून घेऊया सविस्तर.

सविस्तर सांगायचे झाल्यास, या ५०० जागांपैकी ३५० जागा या सामान्य बँकिंग स्ट्रिममध्ये क्रेडिट ऑफिसरच्या पदासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. स्पेशालिस्ट स्ट्रिममधील IT ऑफिसरच्या पदासाठी १५० जागा असणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्य़ासाठी उमेदवारांचे वय हे २० ते २९ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.  तर सरकारी सवलती नुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेची सवलत दिली जाणार आहे. यामध्ये एससी आणि एसटी उमेदवारांसाठी पाच तर ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षाच्या अतिरिक्त सूट दिली जाणार आहे.

बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळवण्यासाठी अर्ज भरताना तुम्हाला अर्जाचे शुल्क सुद्धा भरावे लागणार आहे. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून अर्ज करू इच्छित असाल तर तुम्हाला ८५० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर EWS आणि OBC उमेदवारांसाठी देखील ८५० अर्ज शुल्क आकारले जाणार आहे. ते SC/ST/PWD या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क मात्र १७५ रुपये असणार आहे.

असा करा अर्ज

बँक ऑफ इंडियामध्ये जर तुम्ही नोकरी करू इच्छित असाल, तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. यासाठी तुम्ही सर्वप्रथम तुमच्या मोबाइलमधील क्रोमवर जाणून bankofindia.co.in असं सर्च करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर पेजवर जायचं आहे.

नंतर ‘करिअर टॅब’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर  “Recruitment of Probationary in JMGS-I upon passing Post Graduate Diploma in Banking & Finance(PGDBF) Project No. 2022-23/3 Notice dated 01.02.2023” या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर ‘Fregsiter’ वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फी भरायची आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अर्जाला जोडून अर्ज सबमिट करायचा आहे. सोबतच अपलोड केलेल्या अर्जाची एक प्रत आपल्याकडे प्रिंट काढून ठेवायची आहे.

हे देखील वाचा IDBI Bank Recruitment 2023: IDBI बॅंकेत या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी; जाणून घ्या डिटेल्स..

IPPB Recruitment 2023: इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये मोठी भरती; या उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी..

Physical Relationship Tips: या वयात महिलांची सेक्स करण्याची इच्छा असते सर्वाधिक; जाणून बसेल धक्का..

Shiv jayanti: ..म्हणून या छोट्याश्या गावात साजऱ्या झालेल्या शिवजयंतीची होतेय सर्वत्र चर्चा..

Yojana: शेततळे बांधण्यासाठी 1 लाख 10 हजार अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय..

IND vs AUS: याला म्हणतात कॅप्टन; आपला त्याग करत रोहितने पुजाराची विकेट वाचवली, पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.