IND vs AUS: याला म्हणतात कॅप्टन; आपला त्याग करत रोहितने पुजाराची विकेट वाचवली, पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ..

0

IND vs AUS: दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये दुसरा कसोटी (IND vs AUS 2nd test) सामना नुकताच पार पडला. या सामन्यात भारताने चार कसोटी सामन्याच्या मालिकेत सलग दुसरा विजय संपादन करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. काल दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाकडे 65 धावांची आघाडी असल्यामुळे भारत या कसोटी सामन्यात पिछाडीवर पडला होता. मात्र रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि रविचंद्र अश्विन (Ravichandran Ashwin) या फिरकी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया फलंदाजांचे कंबरडे मोडत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

ऑस्ट्रेलियाने कालच्या एक बाद 61 धावांवरून आज तिसऱ्या दिवसाची सुरूवात केली. फिरकीपटूंना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर भारत चौथी इनिंग खेळणार असल्याने, ऑस्ट्रेलिया या कसोटी सामन्यात मजबूत स्थितीत होता. मात्र तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाल्यानंतर, भारतीय फिरकीपटूंनी अक्षरशः ऑस्ट्रेलिया संघाच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवलं. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक सात गडी बात करत सामनावीर पुरस्कार फटकावला. रवींद्र जाडेजाला रविचंद्र अश्विनी चांगली साथ देत ऑस्ट्रेलियाचे तीन प्रमुख फलंदाज बाद केले.

कालच्या चांगल्या सुरुवातीनंतर ऑस्ट्रेलियाचा आजचा डाव कमालीचा गडगडला. ऑस्ट्रेलियाने आज केवळ 52 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचे नऊ फलंदाज केवळ 52 धावात गारद झाले. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 115 धावांचे आव्हान ठेवले. विजयासाठी 115 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणाऱ्या भारतीय संघाला देखील सुरुवातीला केएल राहुलच्या रूपात मोठा धक्का बसला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या आणि आपल्या कारकीर्दीतील शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराने मात्र नाबाद 31 धावांची खेळी करत भारताला दुसरा कसोटी सामना जिंकून दिला.

भारताने दुसरा कसोटी सामना दिमाखदार पद्धतीने जिंकला असला, तरी या सामन्यापेक्षा अधिक चर्चा झाली ती रोहित शर्माच्या रन आऊटची. रोहित शर्मा आज भलताच फॉर्ममध्ये पाहायला मिळत होता. अगदी टी-20 स्टाईलने फलंदाजी करत होता. मात्र दुसरी धाव घेण्याच्या नादात रोहित शर्मा धावबाद झाला. दुसरी धाव घेण्याचा निर्णय रोहित शर्माचाच होता. मात्र रोहित शर्माकडे लक्ष न देता, पुजारा खेळपट्टीवर धावत सुटला. रोहित शर्माने आपल्या दोघांपैकी आता एकजण धावबाद होणार हे माहीत असतानाही, पुजाराला माघारी पाठवलं नाही, आणि स्वतः धावबाद झाला.

कर्णधार म्हणून रोहीत शर्माचे नेक जण कौतुक करत असतात. खेळाडूंकडून बेस्ट काढून घेण्यात तो मातब्बर आहे. असं देखील बोललं जातं. आपल्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाला रोहित शर्माने तब्बल पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे. रोहित शर्माला कॅप्टन म्हणून जास्त महत्व दिलं जातं. असा देळ आरोप होतो, मात्र आज पुन्हा एकदा कर्णधार कसा असावा, याचे उत्तम उदाहरण त्याने घालून दिल्याचे पाहायला मिळालं. जबरदस्त खेळ करत असताना देखील त्याने कॅप्टन असल्याचा फायदा न उचलता स्वतःचा त्याग केला. आणि पुजाराला जीवदान दिले.

भारताने दुसरा कसोटी सामना जिंकला तरी देखील दुसऱ्या कसोटी सामन्यायापेक्षा अधिक चर्चा सोशल मीडियावर रोहित शर्माच्या त्यागाची होत आहे. कॅप्टन कसा असावा? याचे उत्तम उदाहरण रोहित शर्माने पुन्हा एकदा घालून दिलं असल्याचं सोशल मीडियावर बोलत जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे.

हे देखील वाचा Sara Tendulkar: शुभमन गिल नाही, हा आहे सारा तेंडुलकरचा बॉयफ्रेंड; नाव जाणून व्हाल चकित..

Physical Relationship Tips: या वयात महिलांची सेक्स करण्याची इच्छा असते सर्वाधिक; जाणून बसेल धक्का..

Marriage Tips: लग्न न करण्याचे गंभीर परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन; समाजाचा दृष्टिकोनही बदलतो..

Sexual Tips: सेक्सपूर्वी या गोष्टी केल्या तरच महिला होतात संतुष्ट; असा मिळावा तिचा प्रतिसाद..

Relationship tips: पुरुषांमध्ये या प्रकारची देहबोली असेल, तर स्त्रिया होतात आकर्षित..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.