Sara Tendulkar: शुभमन गिल नाही, हा आहे सारा तेंडुलकरचा बॉयफ्रेंड; नाव जाणून व्हाल चकित..

0

Sara Tendulkar: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) नेहमीच त्याच्या उत्तम कामगिरीसाठी चर्चेत असतो. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही सचिन कोणत्या ना कोणत्या कारणाने बातम्यांमध्ये झळकत असतो. मात्र आता त्यांची कन्या सारा तेंडुलकर सुद्धा बरीच चर्चेत आहे. सध्या साराचं नावं टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिलसोबत जोडलं जात आहे. इतकेच नाही, तर सोशल मीडियावर सारा आणि शुभमनच्या अफेअरच्या चर्चा सुद्धा गेल्या काही वर्षापासून रंगल्या आहेत.

मात्र आता वेगळीच माहिती समोर आली आहे. सारा तेंडुलकरचा बॉयफ्रेंड शुभमन गिल नसून दुसराच असल्याचं समोर आले आहे. साराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये सारा एका अनोळखी मुलासोबत पार्टी करताना दिसत दिसत असल्याचे एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो सारा टेन्शन सोबत हा मुलगा कोण आहे असा प्रश्न देखील चाहत्यांना पडला आहे.

सारा आणि शुभमनचे नाते

टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिलने  क्रिकेटच्या मैदानात आतापर्यंत अनेकदा रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. २०२२ च्या झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेत त्याने चमकदार कामगिरी केली होती, आणि  कारकिर्दीतील पहिले एकदिवसीय शतक झळकावून क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला होता. या कामगिरीनंतर शुभमन गिल आणि सचिनची मुलगी सारा तेंडुलकर यांची नावे पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागली. सोशल मीडिया यूजर्सनी वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स बनवायला सुरुवात केली. दोघांच्या अफेअरच्या वेगवेगळ्या बातम्या येऊ लागल्या.

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या अफेअरच्या बातम्या अनेकदा समोर आल्या आहेत. मात्र आतापर्यंत ती केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे. दोघांनीही याबाबत कधीही कोणतेही वक्तव्य केलेले नाही. किंवा कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 2019 च्या आयपीएलमध्ये दोघांचीही पहिल्यांदा दखल घेण्यात आली होती होती.

सारा शुभमनला नाही, तर याला करतेय डेट?

क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी लंडनमध्ये शिकत आहे. आजकाल सारा तिच्या लंडनमधील फोटो पोस्ट करत असते. ज्यात कॉलेजमध्ये जाणे, खूप वेळ काम करणे, शहरात फिरणे, कॉफी ब्रेक आणि जिममध्ये जाणे असा तिचा दिनक्रम ती सोशल मिडीयाद्वारे तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. साराने नुकतेच पोस्ट केलेल्या फोटोमधील मिस्ट्री बॉयचे फोटो पाहून साराचे चाहते अचंबित झाले आहेत. हा मिस्ट्री बॉय कुणी अनोळखी नसून, त्याचे नाव ओरहान अवत्रामनी असे आहे. तो औरी या नावाने मित्रांमध्ये प्रर्सिद्ध आहे. व्हायरल झालेल्या फोटोंबाबत असा दावा केला जात आहे, ही पार्टी लंडनमध्ये होती.

औरी हा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा जवळचा मित्र आहे. अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण, जान्हवी कपूरसोबतचे देखील पार्टीचे फोटो व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता औरीसोबतच्या पार्टीतील फोटोंनी साराच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. साराने पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये गळ्यात हात टाकून सारा या मित्रासोबत पार्टी करताना दिसतेय. दरम्यान हा फोटो फार जुना असल्याचा अंदाज लावण्यात येतोय.

हे देखील वाचा Relationship Tips: ती हे इशारे करत असेल तर समजून जा तुमच्या प्रेमात झालीय पागल..

Vastu Tips: घरामध्ये चुकूनही या 3 वस्तू आणू नका, अन्यथा रस्त्यावर याल..

pregnancy tips: गर्भधारणेसाठी महिलांचे योग्य वय त्वरित जाणून घ्या, अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम..

Samsung galaxy S22: सॅमसंगची विशेष ऑफर, २७ हजारात खरेदी करा ८६ हजाराचा हा स्मार्टफोन..

Valentine: यंदा व्हॅलेंटाईनला गुलाब नाही, या वस्तुची झाली रेकॉर्डब्रेक विक्री; जाणून तुम्हीही व्हाल हैराण..

Chanakya Niti: लग्नापूर्वी या तीन गोष्टी जाणून घ्या अन्यथा उध्वस्त होईल आयुष्य..

Prithvi Shaw: पृथ्वी शॉवर जीवघेणा हल्ला, दांडक्याने दोन गटात मारामारी, गाडीचाही चुरा, पाहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.